डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी!
डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी!
डाणेदार... त्यकारीता ते जाडे दणकट पिवळे डबे! त्यावर गडद हिरवे झाकण,
स्वयंपाक घरात नेहमी दिसायचे पूर्वी आणि ऐवज संपला त्यातला की ते बाथरूममध्ये दीसायचे डीटर्जन्ट पावडर साठी, कधी दिअसायचे स्वयंपाक घराच्या कपाटांत, तांदूळ, बेसन वगैरे साठी! माझी आजीतर त्यात दागिने/पैसे ही ठेवायची! त्यालाच कापून दोन भोकं पडून 'डब्याला' ही वापरलेले पाहिले आहे!
आजकाल प्लास्टिकच्या त्या पिशव्या असतात, यांना साफ करून काही लोक रद्दीतही विकतात म्हणे! नाहीतर टीन मिळतात, पण ती मजा नाही! काय मस्त होते ते डबे!… डालडाचा पाहिजे तो (मला जो आठवतो तो) आकार गुगल वर ही मिळाला नाही! उमदाचा पण मस्त होता डबा, जरासा बारीक डालडा पेक्षा, आणि फॉन्टपण स्लीम ट्रीम
आता लिहीता लिहीता लक्षात आलं! पूर्वी प्रिंटींग संदर्भात मर्यादा असल्यानी खूप गोष्टी कमीत कमी रंग वापरून केलेली असायची! त्यामुळे सहाजिकच कमी खर्चात आणि 'मिनिमल' लूक असलेली असायची! आता तो ट्रेंड परत येतोय!
मध्ये मध्ये ४रंग काय!? - स्पेशल प्रिंट काय... पार लैंडस्केप असायचं प्रौडक्टवर!
असो…
जुने ते सोने! आणि ते कधीच कालबाह्य होणार नाही…
आता कोणी डालडा-उमदा वापरत नसेल म्हणा पण त्यांचे डबे झकास होते!
#साशुश्रीके । १९ ऑगस्ट २०१५ दुपारचे ३.०१
Comments
Post a Comment