मेरा भोला साई ॥ बाबा साई ॥
माझं खुप आवडतं भजन!
राग - जोगिया
ताल - केरवा
मेरा भोला साई ॥ बाबा साई ॥
दे दे लगन दिल की ॥ तू मनसे भजले साई ॥ध्रु॥
मनका अंधेरा तेरा ॥ दूर करे साई ॥
जीवनकी आस तेरी ॥ पूरी करे साई ॥
उसकी शरणमे जाना ॥ पार करे साई ॥१॥
श्रध्दा रख दिलसे ॥ तेरा खुश रहे साई ॥
जीवनमे सबुरी रखना ॥ राह देखे साई ॥
तनमन तू झौक दे ॥ चिंता करे साई ॥२॥
करमगती छोड दे उसपे ॥ क्रिपा करे साई ॥
मिलेगा सबसे छुटकारा ॥ साथ रहे साई ॥
लाज तेरी जाने ना देगा ॥ दौडे तेरा साई ॥३॥
खुप आठवण येते हे भजन जेव्हा जेव्हा ऐकतो.. शनीवरची भजनं, शनिवार वाड्याच्या जवळच्या आमच्या खळीकर अण्णांच्या घरातली... 'शनिवारची भजनं', गानू काका तबल्यावर, राजेन्द्रकाका व्हायोलिन... आणि खुद्द खळिकर आण्णा पेटी! आणि मी... मी झांजा वाजवायचो! तल्लीन व्हायचे सर्व, मनात शुद्ध भाव, डोळ्यात भक्ती रस, कानात जणू स्वरांचे चुंबक ठेवल्या सारखे वाटायचे!
काही गोष्टी परत होत नाहीत... त्यापैकीच एक! ती 'शनिवारची भजनं'
देवानी ४-५ रिवाइंड सीन्स देऊ केले तर नक्की जाईन परत!
सर्वांच्या पाया पडीन, सर्वांना मीठी मारीन, आणि एकदा आण्णांना सांगीन 'भोला साई... बाबा साई' गायला!
बस बस... कल्पनाच इतकी जीवघेणी-सुखदायक! प्रत्यक्षात अनुभवलं तर काय होईल!?
त्या पेटिवरच्या भजनाच्या डायरीच्या प्रत्येक जीर्ण पानाच्या मधल्या प्राणवायुचा अनुभवीन कण नी कण ... काय होते ते क्षण!
कुठायत ती शनिवारची भजनं...
ती देवाची वचनं!
#सशुश्रीके । ५ ऑगस्ट २०१५ रात्रीचे १.४५
Comments
Post a Comment