चिक्कीय... चिक्कीय
चिक्कीय - चिक्कीय चिक्की घेऊन यायचे पूर्वी लोक, काही जणं आइसक्रीम, बिस्कीटं, चोकॉलेट्स, पण लोणावळा चिक्की, वेगळीच मजा होती त्याची! खास करून तो 'मगनलाल' चा लोगो बघुन डोळे मोठे व्हायचे! लाळ सुटायची लाळ, त्यात मिक्स चिकी पैक असेल तर डाळ आणि नारळवाली नालायक चिक्की सोडून, बाकी सर्व अर्ध्या दिवसभरात फस्! एका मागोमाग एक, काजू नंतर बदाम नंतर आपली रेग्युलर शेंगदाणा, परत चक्र चालू! आत्ता तीच खातोय, डेस्क वर कोणीतरी आणून ठेवलेली माझ्या, विकत घेऊन खाणे बहुतेक ते सगळ्यांनाच जमतं, मागवून मिळणं ते पुण्य! न मागता अश्या गोष्टी मिळणं! महा-पुण्य! चिक्कीय - चिक्कीय ओरडणारा तो घसा ट्रेन ते एसटी ते ह्या डोक्यात - परत चक्र चालू! आठवणींची चिक्की! #सशुश्रीके । २४/०२/२०१५ । २.३१