'Hollywood पूर्वी सारखं राहीले नाही हो!'
॥श्री॥
१९९३-९४...
बाबा मला घेउन डाईनॉसरच्या चित्रपटाला घेउन गेले... संध्याकाळचा शो असेल..
प्रभात टॉकिज, बाहेर पड़े पर्यन्त रात्र झालेली, आणि डोक्यात नुसता डाईनॉसर
डाईनॉसर... त्यात ज़रा बौद्धिक खाज म्हणून स्कूटर वर उलटा बसलो, इमेजिन
करायला... इथून असा आला तर कोण कसं गल्पटेल वगैरे! नुसता थैमान!
आणि
आता कितीही गोंधळ घाला त्या स्क्रीन वर...
'बरा होता मूवी अजुन चांगला करता आला असता'
वगैरे बोलुन टिकिट फेकून देणे ह्या पलीकडे...
'Hollywood पूर्वी सारखं राहीले नाही हो!'
असा पुणेरी तड़का जोडीस कोबरा स्टाइल -
'गप्प घरी पाहिला असता तर पैसे वाचले असते... कसे!?'
#सशुश्रीके
Comments
Post a Comment