मौला
॥श्री॥
मौला
२००७-०८ची वेळ, आम्ही ओफ्फिस मध्ये लंच
टाइमला कैरम खेळायचो, साइड बाय साइड गाणी वाजवत बसायचो मी, नाही आवडलं की
जाऊन बदलायचो... जामच रंगात असेल गेम तर असतील ती गाणी वाजत राहायची, असो
तर... असाच एक दिवस होता... सगळे मस्त कैरम खेळण्यात / बघण्यात मग्न, त्यात
गाणं लागलं कुठलं तरी... 'मौला मेरे मौला मेरे...' होतं बहुतेक,
हल्ली ऑलमोस्ट सर्वच गाणी बऱ्यापैकी हीट होतात असा विषय निघाला... ह्यावर आमचा मानस नंदा म्हणाला..
स्ट्राइकर हातात घेऊन... बोटानी सीजन बॉल फीरवल्या सारखा... शॉट वर एम घेत...
"आज कल गानों मैं सौ ग्राम मौला या रब्बा डाल दो गाना हीट भाय लोग"
हे वाक्य म्हणून...क्वीन मगोमाग सोंगटी घेत 'वाह क्या शॉट खेला है मैने... म्हणत 'खुदखुशी'पण केली!
तो सौ ग्राम वाला मौलाचा डायलोग अजुन ही लागू पड़तोय! मानस भैया तुस्सी छा गए थे... तुस्सी आज भी ग्रेट हो... ग्रेट राहोग्गे!
#सशुश्रीके | ८.२.२०१५
Comments
Post a Comment