पंकज रामनाथकर.
॥श्री॥
पंकज रामनाथकर.
२००७ साली दूबईत 'द क्लास्सिक पार्टनरशिप एडवरटाइजिंग' मध्ये जेव्हा रुजू झालो तेव्हा पासूनची ओळख, तसा त्या एजेंसी मध्ये ग्रुप वगैरे प्रकार नव्हता तेव्हा त्यामुळे मी काय सर्वच त्याच्या बरोबर काम करायचे... मी केलेले काम आवडले की 'आगे बढ़ो' नाही तर... नाहीच जमतय मला असं वाटत असेल तर तो स्वतःच नवीन लेआउट सुरु करायचा आणि मला संगायचा की असं काहीतरी कर! म्हणजे उगाच आपलं 'मजा नहीं आया यार' असं बोलून सोडून द्यायचं, अश्यातले नव्हते साहेब!
असो... त्याच्या बद्दल बोलायचं झालं तर... माझा आदर्श! त्याच्या पासून जित्कं शिकायला मिळालं तीत्कं कोणाकडून नाही, सकाळी वेळेत येणं, दीलेल्या वेळेत काम जित्कं होईल तीत्कं चांगलं पूर्ण करून देणे, कामातले बारकावे, ज्यूनिअर्सना सांभाळून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे वगैरे सर्व 'लीडरशिप क्वालिटीस' ह्या माणसात.
आणि ओफ्फिसच्या बाहेर... फूल ओंन टाइम पास :) मला अजुन ही आठवतं... माझ्याकडे गाडी नव्हती... मी देवराज आणि अखिल अश्या ३घांना तो घ्यायला ययचा सकाळी... आणि जाताना 'त्याच्या वेळेत' निघालो तर सोडायचा ही!... कैरम/पूल मस्त खेळायचा.. एकदा तो बसला की कधी कधी बोर्ड संपूर्ण खल्लास पण करे...असला क्लास! स्केचेस वगैरे पण सॉलिड... एकूणच कला-क्रीडा चौफेर फटकेबाजी, त्याला नॉन-वेज खुप आवडायचं...स्पेशली कबाब रोल्स वगैरे खतरनाक आवडायचे...एकदा आम्ही सगळे फॅमिली फॅमिली वगैरे एका मॉल मध्ये गेलेलो... तिथे आम्ही वेज लोकांनी अपपलं जेवण आणलं, हे महाशय एका अरेबिक ग्रिल्ड कबाब आउटलेट च्या लाईनीत जवळ जवळ अर्धा तास, पण नंतर डॉक्टरांकडून तंबी मिळाली, नॉन वेज बंद! तेव्हा पासून बायकोनी दीलेलं किवा बाहेरचं शाकाहारीला त्याला पर्याय नाही!
मुळचा दादर, मुंबइचा त्यामुळे वडापाव आणि साबूदाणा वडे यांचा दीवाना... दादरला गेला की पहिली भेट 'प्रकाश'ला देतो आणि परत ओफ्फीस वर आल्यावर गप्पा मारताना आवर्जून सांगतो ही!
सहेबांचं दादर ला शिवाजी पार्का समोर घर आहे... 'माझं अर्ध आयुष्य सफल झाले' अशी भावना नेहमी त्याच्या बोलण्यातुन जाणवते! खरच... शिवजी पार्कासमोर घर!!! भल्या भल्यांना नाही जमत हो!
त्याला एक मुलगी आहे, दूर्वा... त्यावरून आठवलं... उजव्या खांद्या पासून दंडा पर्यन्त एक 'एपिक'टैटू पण आहे, स्वतःचं नाव बायको आणि मुलीचं नाव गोंदवुन घेतलय, कड़क आहे डिज़ाइन! फारच कमी लोकांच्या कडे असा जबरदस्त टैटू पाहिलाय... त्यात उंची मस्तच, आयुष्यात कधी टक्कल पडणार नाही ह्या क्याटेगिरीतले केस, कायम तूळतुळीत दाढी... थंडीत मस्त ज्याकेट्स... त्याला शोभतील असे बूट्स, एकूणच मस्त स्टाइल वाला, आणि स्वभावानी तेवढाच साधा.
त्याच्या घरी टीवी सोडून सगळं पांढरं... सोफा फर्नीचर पडदे डाइनिंग सगळं सगळं... जेवायला जायचो तेव्हा पण कल्याणी (त्याची बायको) असला सॉलिड लेआउट करून ठेवायची ताट! बास रे बास... १००% 'आर्टिस्ट' फॅमिली!
मी जॉब सोडला त्याला एकमेव कारण म्हणजे पंकज रामनाथकर... कारण त्यानी जॉब सोडला, मला त्याच्या बरोबर काम करायची इतकी सवय झालेली... जाम समजून घ्यायचा, 'प्रो' असला तरी... माझं फास्ट-वेंधळं बोलणं-वागण त्याला कळायचं... त्यामुळे कामत कधी व्यत्यय यायचा नाही... यूनिक वाटायचा मला तो त्या मुळे!
आता भेटतो २-३महिन्यातून एकदा कधीतरी... फोन आणि मेसेजेसच्या बाबतीत उदासीनता असते त्यामुळे, भेटल्यावरच जो काय स्वछंद वार्तालाभ!
ओ झी पंकझ
वड्डे मिस होते हो झी आप
कभी वापस काम करेंगे साथ साथ
याद आते है झी पुराने किस्से
कैरम हो या पूल दा गेम
नॉन वैज से वेज तक
कल से लेके आज तक...
हांजी पंकझ... ओ झी पंकझ!
#सशुश्रीके | ७.२.२०१५ | संध्याकाळ ७.२०

Comments
Post a Comment