राहुल शरद भाटलेकर.

राहुल शरद भाटलेकर.
राहायचा दादरला... हिन्दू कॉलोनी...
मस्त गोरा, कुरळे केस मस्त गुटगुटीत लहानपणापासून, अत्या आणि काकांचं परफेक्ट कॉम्बो! मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला राहुल दादाचं सॉलिड आकर्षण... तो त्याच्या मित्रांमध्ये मला घेऊन जायचा...
दादरच्या त्या छोट्या गल्ल्यांपासून मैंन रस्ता, पुण्यात यायचा तेव्हा रिक्षानी फीरवायचा, एकदा तर मला राहुल 70mm मध्ये 'जॉस' नावाचा पिच्चर दाखवलां, खुप लाड करायचा, खरच खुप आवडायचा मला राहुल दादा!

त्याचे बाबा शरद भाटलेकर... माझी सक्खी आत्या शोभा भाटलेकर...
काय मस्त मोठं घर होतं, घरी पामेरियन होतं एक, त्याच्याशी खुप खेळायचो, राहुल दादा बहुतेक वेळा घरी नसेच, तो होस्टेल ला राहयचा, बेळगाव ला... घरचे ज़रा 'फ़ॉरवर्ड' होते... म्हणजे ड्रिंक्स वगैरे... काका त्यांचं चालू असायचं, मी खुपच लहान होतो. में महीना कीव्वा इतर सुट्टीच्या दिवशी आम्ही जायचो त्यांच्याकडे. तो असला की मला बाहेर घेऊन जायचा... त्याचा मित्रांचा अड्डा होता एक, पान पट्टी वाला. तो मला कोल्ड्रिंक कीव्वा चॉकलेट्स घेऊन द्यायचा... मी खुश. मग मित्रांना भेटून झाल्यावर आम्ही परत घरी यायचो.

एक दिवशी अचानक आम्ही दादर ला भाटलेकरांकडे...
काहीतरी गडबड होती, घरी पोहोचल्यावर मला कळालं की राहुल दादा सिरिअस आहे, आयसीयू मध्ये, बाबा आई तिथे गेले, मी थांबलेलो घरी,
दुसऱ्या दीवशी कळालं राहुल दादा 'देवा घरी गेला'

घरी त्याची 'बॉडी'आली... आत्या काका... आणि सर्वच...
काय लिहावे तेच कळत नाहिये आत्ता
मी शांत, काय कसे वागावे काय बोलावे काहीच कळत नव्हतं,
काही क्षण मनात इतके राहतात तसाच तो क्षण
मी बाल्कनी मधून दादा ला एम्बुलैंस मध्ये नेताना पाहात होतो
अक्खी कॉलोनी आलेली... त्याचे मित्र... आम्ही नातेवाईक.
खुप डिस्टर्बिंग प्रकार घडत होता.

त्याचा मृत्यु कसा झाला...
त्याला होतं व्यसन... दारू आणि बाकी अजुन काही
त्यानी रूम बंद करून बेगोंन प्यायलं होतं...
२४ तास त्याची मृत्युशी झालेली झुंज अपुरी पडली...
जाता जाता वडलांना म्हणाला
'बाबा मी तुम्हाला खुप त्रास दीला... अजुन द्यायचा नाहीये'

पण त्यानंतर भाटलेकर काका आणि आत्या त्यांच्या शेवटच्या श्वासा पर्यन्त कसे जगले त्यांनाच् माहीत, आत्या शिक्षिका होती, काका रीटायर्ड..
दादर घर विकले, पुण्यात पाषाण रोड ला घर घेतले... आत्या वारली... काका एडमिट झाले... ते ही गेले...
किती वाइट घडले... कोणाची नजर लागली!?

काका कारणीभूत होते का!?
की होस्टेल... त्याचे मित्र!?
की दोन्ही!??

संस्कार घडवावे लागतात... वाइट गोष्टी लवकर आत्मसात होतात...
अशी बडबड / चर्चा राहुलचा विषय निघाला की होते.

जे काही घडले त्याचे खुप वाइट वाटते.
राहुल गेला तेव्हा त्याचे वय अवघे २३होते!
तो आदर्श नसला तरी त्यानी त्याच्या मित्रांचे डोळे उघडले असतील.
आई अजुन ही मध्येच कधीतरी त्याचं उदाहरण देऊन काय करू नये ह्याची आठवण करून देते.

चुकीचा रस्ता कितीही मोहक असला तरी 'यू टर्न' साठी इंडिकेटर वर हात नक्की असावा... 
नाहीतर उशीर होतो. आणि शिक्षा तुम्हालाच नाही तर इतरांना पण भोगावी लागते.

दादा... तू चुकलास. खुप चुकलास.


#सशुश्रीके | ३१ जानेवारी २०१५ | संध्या. ७.५७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...