हैप्पी जर्नी ( Movie Review )

।। श्री  ।।

हैप्पी जर्नी

माझा हल्लीचा आवडता मराठी नट अतुल कुलकर्णी (निरंजन) आणि आवडती नटी प्रिया बापट (जानकी) हे दोघे आहेत मुख्य कलाकार, बाकी कास्ट ही मस्तच आहे! पल्लवी सुभाष (Alice नाव असलेल्या ख्रिस्ती मुलीचा रोल मस्तच साकारलाय) तर Alice आहे निरंजनची प्रेयसी आणि जानकी बहीण.

जरा पचायला अवघड पण तितकाच छान हाताळलाय दिग्दर्शकानी (सचिन कुंडळकर) ही जरी प्रेमाची गोष्ट असली तरी भाऊ-बहिणीच्या नात्यातले प्रेम हा प्रमुख पाहुणा आहे! ह्या सिनेमात एक ओळखीचा चेहरा पण दिसला मला! तेजस मोदक, मी त्याला मोदक म्हणायचो… तसं त्याचं नाव तेजस मोडक, पुण्यात असताना कार्टून्स करायचा, कथा वगैरे लिहायचा, आता गाणी लिहितो हे पहिल्यांदाच कळालं! आणि त्याचा छोटा रोल ही आहे, बिल घ्यायला येतो दारावर आणि निरंजनशी २-३ वाक्य बोलतो असा सीन आहे.

चित्रपटाच्या कथानकाला आत्ता उजेडात आणलं तर काही फरक नाही पडणार कारण बर्यापैकी दिवस उलटून गेलेत, लोकांच्या समीक्षा पण आत्ता पर्यंत बाहेर पडल्या असतील, सहजा सहजी माझ्या आईला सिनेमे (मराठी असो वा हिंदी) आवडत नाहीत, मग आईनेही रेकमेंड केलाय म्हणल्यावर मी पाहिलाच! आता ही कहाणी कशी वेगेळी आहे हे
सिनेमा पाहूनच कळेल, रहावत नाही, सांगूनच टाकतो एका वाक्यात… प्रिया बापट (जानकी) भूत असते! हाहाहा… ऐकायला विचित्र वाटत असलं तरी ईत्कं सहजतेने मांडलय सर्व! ते ही विजुअल एफ्फेक्टस न वापरता, मुळीच नको ते सीन्स, उगाच घुसवलेली गाणी नाहीयेत,जमेची अजून एक बाजू म्हणजे करण कुलकर्णी याचे संगीत! बैकग्रोउंड स्कोर तर खूपच जमलाय! मराठी सिनेमात बैकग्रोउंड स्कोर अप्रतीम असणे फारच भारी गोष्ट आहे माझासाठी तरी!

ह्या सिनेमात काही मजेशीर किस्से आहेत त्यातल्या २तर फारच आवडल्यात… पहिली अशी की  अतुल कुलकर्णी (निरंजन) अरबीत बोलत असतो फोने वर, कारण तो दुबईत काम करत असतो आणि ऑफिस संदर्भात सहकाऱ्याचा कॉल आलेला असतो, कदाचित माझासरख्या दुबईत राहणाऱ्या मारठी माणसाला तो सीन जरा जास्तच आवडेल,मस्त सहज सुंदर अरेबिक हाणलय साहेबांनी! दुसरी गोष्ट म्हणजे, अतुल कुलकर्णी (निरंजन) आणि प्रिया बापट (जानकी)ह्यांच पल्लवी सुभाष (Alice) बद्दल बोलणं चालू असतं 'Alice तर Alice नाही तर गेली उडत' आणि अश्या प्रकारचे हलके फुकले जोक्स!
एकूणच मस्त वाटतं… ह्या सिनेमाचा प्रवास आनंद देऊन जातो. 
3 Stars fro me :)

गुड जोब टीम 'हैप्पी जर्नी'

#साशुश्रीके । १७-०२-२०१५


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...