निवेदिता उर्फ़ गायत्री गानू... पार्ट २

निवेदिता उर्फ़ गायत्री गानू... पार्ट २
जनरली एक पार्ट मध्ये लिहिता नाही आलं की २रा पार्ट वगैरे लिहायला लागतो आणि १ल्या पार्ट मध्ये शेवटी 'क्रमश' असे लिहायचा नियम... तसलं काही मी लिहिलं नाही... याचा अर्थ लेख पूर्ण आगे बढ़ो..
मग हां पार्ट २ का बुआ!?

सांगतो... मी लोकांबद्दल लिहायला सुरुवात केली तेव्हापासून प्रत्येक लेखाला 'मस्त' 'छान' वगैरे रिप्लाय + तळटीप 'माझ्यावर कधी लिहिणार आहेस!?' शेवटी वैतागुन मी लिहिलं तिच्या बद्दल... पण ही हावरट, पहिल्या लेखावरून तीचं १०ग्रामचं पोट नाही भरलं... आता म्हणते पार्ट २ लिही! मग काय... आज ही तेच... मझ्यावरचा २रा पार्ट कुठाय!

मागच्याच आठवड्यात ती आणि काका काकू येऊन गेले १०दीवस... घर मस्त भरलेलं... आई, अन्वया, अमृता, गायत्री आनंद काका, ऐश्वर्या काकू, शुभदा काकू... आणि मी!

दुबई दर्शन, गप्पा, किस्से आणि त्यात अन्वया रोज काय ना काय तरी नवीन शब्द तीला उमगायचे... आणि ह्या सर्वाला गायत्रीची  फोडणी, असला हास्यक्लब झालेला! एकतर ती इंग्रजी मीडियमची त्यामुळे शुद्ध मराठीत बोललं की डोक्यावरून जायचं, आणि तीचं मराठी आम्हाला हसवुन (फसवुन) सोडायचं, कुठल्याही वाक्याचं स्वागत 'फम्बल'नीच करायचं हां नियमच जणू! आणि मग स्वत:च फीदीफीदी सुरुवात... मग जे सांगायचं ते राहीलं बाजुलाच, पुढची ५ मिनीटें तीची लोळालोळ बघण्यातच जायची... मग काका किव्वा काकू तीला नाजुक दम द्यायचे..बस्स झालं वगैरे! पण मी पीना मारायचो... मग तीचा हास्य फुगा परत फुटायचा... परत सुरु! डोळ्यात पाणी, अगदी पोटात दुखे पर्यंत ख्या ख्या ख्या... चाल्लूच, फुगा फुटूनही त्यातली हवा कायम!

पण ह्या १० दीवासात तीची इतकी सवय झालेली... कामात अक्खा दीवस जायचा पण घरी आलो की हीची बडबड आणि फीदीफिदी + अन्वया आणि हीचं गणित! अन्वया ला गाणी गाउन दाखवणे, तीला एव्हेरेजली ३मिंटाला एक घास भरवुन जेवण भरवणं, तीला वेडे चाळे करवुन लक्ष्य वेधुन घेणे... सॉलिड जमलेलं प्रकरण!

हे सगळं झालं आत्ताचं, ह्याआधी २दा येऊन गेल्ये इथे... आता 'नेक्स्ट टाइम' आली की इकडचे लोकल लोक ओळखायला लागतील असा डायलॉग मारून ख्या ख्या ख्या चालू... मुंबई प्रमाणे दुबईत ही उशिरा यायचो, त्यामुळे 'चित्र झाली का काढून... बास झाली आता... किती चित्र काढशील... बॉस ला दे आता चित्र काढ़ायला!' असले टोमणे चालूच... यावेळी ही आणि गेल्या २ही ट्रीपांत पण! त्यामुळे कितीही लांब राहत असलो तरी असं कधी वाटतच नाही... फ़क्त तो शेवटचा क्षण अवघड जातो!

टाटा बाय बाय चा ... रुमाल हलले गाडी सुटली वाला क्षण... त्या १०दीवसात नेमकं इतकं काम होतं, फारच कमी वेळ घरी होतो. आणि बाहेर पडलो की फिरवण्यात वेळ जाइ, दुबई दर्शन... त्यामुळे गायत्रीला काही छोटी भेट द्यायला नाही हे लक्षात आले, काय करावे कळेना... मग पाकिटातली नोट काढून तीच्या हातात ठेवली, तीने झटकन हात बाजूला केला, म्हणाली मी नाही मी नाही घेणार वगैरे, मी म्हणालो आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या हातात पैसे टेकवतोय खाऊ साठी, गपचुप घे...अपेक्षे प्रमाणे डोळ्यातुन गंगा जमुना... आधीचे २दीवस तीला छळत तीला आठवण करून द्यायचो... परत जाण्याची वेळ जवळ आली आहे वगैरे, ते सगळं आठवून मला ही रडू यायला लगलेलं... पण मस्त हसायचा अन जगायचं असा मंत्र ना आपला!

आता परत कधी येईल माहीत नाही... पण जेव्हा कधी येईल, हसायचा अणुबॉम घेऊन येईल नी आमचं घर 'नेस्तनाबूत'करेल ह्यात शंका नाही!

जियो बेहेन...
तू हसाती है सबको...
तू रुलाती भी है सबको...
याद आएगी हमको...
जब जाओगी अपने घर को!

तेरा बडा भाय...
#सशुश्रीके


८.२.२०१५ | रात्रीचे २.०८


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...