'वाह...क्या सीन है...'
॥श्री॥
'वाह...क्या सीन है...' भाग - १
लहानपणी काही मालिका चित्रपट इतके पाहिले की जन्मभर विसरणे अशक्य
आमच्या कडेVCR होता त्यामुळे रात्री किव्वा संध्याकाळी वगैरे चित्रपट / नाटक / मालिका लागल्यास टाइमर वर सेट करून बाबा रेकॉर्ड करायचे... मग आरामत वेळ झाला की तो सह परिवार पहायचा असा कार्यक्रम असायचा!
शांती, स्वाभिमान, राउ, स्वामी सारख्या मलिका... दीवार, विधाता, चार्ली च्याप्लिन, रोजा, होम अलोन, टॉम एंड जेरी असली भेळ असलेली पर्सनल VDO पार्लर जणू होतं घरच्या घरी.
आणि वेळ मिळाला की त्याच त्याच कैस्सेट्सची पारायणं करायचो, त्यामुळे अजुन ही टी.व्ही. वर त्या जुन्या गोष्टी लागल्या की जुने 'VDO लायब्ररी'चे दिवस आठवतात.
तसं पाहिलं तर खाली नमूद केलेल्या सिनेमा पैकी कोणाला काय आवडेल हे फार व्यक्तिसापेक्ष असेल पण मला भावलेल्या सीनचे तुकडे जरा थोडक्यात मांडतोय...
सीन होता 'दीवार' मधला...
अमिताभ आणि शशी कपूर देवळाबाहेर निरुपा रॉयची वाट बघत उभे असतात, माय येते दोन्ही लेकरांकडे बघत हातात प्रसाद देते, अमिताभ नास्तिक, शशी त्याला समजावतो, आई प्रसाद समजून देत्ये तू गोड समजून खा भावा, आणि दोघे आपापल्या 'रस्त्यावर' चालू पडतात.
आता सीन 'होम अलोन'...
बिचारा तो मुलगा... घरी एकटा... घर कुठे चांगला मोठा आलीशान बंगला... कपडे धुवायला तळघरात वाशिंग मशीन मध्ये येतो...आणि तीथल्या मोठ्या शेकोटीचे दर्शन होते आणि त्याची जी फाटते! धावत धावत थेट त्याच्या खोलीत डायरेक्ट बेडच्या खालीच!
'छोटीसी बात' मधला हा सीन तर एक नंबर होता!
अशोक कुमार समजावत असतो अमोल पालेकरला की आयुष्यात कसे 'पुढे' जायचे तुम्ही कुठे मागे पड़त आहात, उदाहरण देण्यासाठी तो एका काळ्या पुस्तकावरती एक उभी रेघ व त्यावर एक आडवी लांब रेख मारतो म्हणतो तू आहेस ह्या उभ्या रेषे सारखा., आणि तेच पुस्तक तो उलटं करतो आणि म्हणतो तुला इथे पोहचायचे आहे,
"जिंदगी को एक जबरदस्त मोड़ देना...एक घुमाव देना है.."वगैरे बोलून तो अमोल पालेकरला यशस्वी जीवनाच्या टिप्स देत असतो.
'गोलमाल' तर इतके वेळा पाहिलाय... वाक्य नी वाक्य पाठ आहे...
सगळ्यात धम्माल सीन तो आहे जेव्हा उत्पल दत्त अमोल पालेकरची मिशी निघालेली पाहतो.. आणि तेव्हा उत्पलचा जो काही पारा चढतो, आणि ते जे काही मांडले आहे! निरनिराळे पदार्थांची रांग लावत..."खाओ बेटा.. खाओ... और खाओ... वरना जेल मैं मार कैसे खाओगे बेटा..."
कह्हर सीन!
'अशी ही बनवाबनवी' मधला "शंतनु.... शंतनुऊऊऊऊऊ..." दारू पिउन आलेले अशोक सराफ, सचिन आणि लक्ष्या... तो सीन मी इतका वेळा रिवाइंड करून करून पाहिला की रीळ तूटलं हो कैस्सेटचं!!!
आणि हा माझा बायको पार्वती / इस्राइलला असतो मित्र माझा / मी दररोज ३कप चहा पितो / बीडीचे डोहाळे वगैरे अजरामर सीन्सचा खजानाच तो!
'विधाता' नामक चित्रपटाची VHS ही होती... पारायणं...
'तकदीर है क्या में क्या जानू...' 'सात सहेलिया खडी खडी फर्याद सुनाए घडी घडी' ही गाणी खुप वेळा एकली! तसा सिनेमा बराच होता पण एक वेगळ स्थान होतं माझ्या आयुष्यात त्याचं!
प्रसीद्ध डॉन 'शोबराज' असं नाव होतं दिलीप कुमारचं... त्याला घ्यायला अमरीश पूरी विमानात भेटतो, दोघेही एकमेकांचे शत्रु... दीलीप कुमार स्वतःच्या गाडीत जाणार तितक्यात अमरीश पूरी दिलीप कुमारला स्वतःच्या गाडीत आमंत्रण देतो...
दोघांत गप्पा चालू होतात... अर्थात अमरीश पूरीच जास्त बड़बडत असतो... म्हणतो 'देखो ना... हमारी दोस्ती आपको हमारी गाडी में ले आई... वरना आप अपने गाडी में होते और हम ये बटन दबाते और...' मागून येणाऱ्या एका गाडीचा स्फोट होतो.... दिलीप कुमार हसतो... म्हणतो 'आपके इस हरकत से दोस्ती की महक नहीं दुश्मनी की बू आती है...ड्राईवर ला सांगतो की जरा गाडी बाजूला थांबव.. इथे बजुलाच नारळ पाणी वाला आहे जरा डोकं थंड करू आणि प्रकृतिलाही चांगलं असतं नारळ पाणी... आणि नारळ पाणी पीता पीता अमरीश पुरीला सांगतो की तुझ्या गाडीत माझी काठी आहे... त्या काठीत एक 'बम'आणि माझ्या कड़े आहे हे छोटं रिमोट, आणि ह्या रिमोट वरचं हे छोटं बटण मी दाबणार हे असं... आणि अमरीश पुरीच्या गाडीचा स्फोट होतो... मागुन एक गाडी येते... दिलिप साहेब म्हणतात, अमरीश भाऊ तुम्ही मगाशी कोणा निरपराध व्यक्तीचा बळी दीलात... माझी गाडी ही आली, मी चाललो... पुढच्या वेळी नीट तयारी करून या :) आणि असले खुप छोटे मोठे किस्से आहेत ह्या सिनेमात!
आता थांबतो...
आवडते सीन मालिका भाग २ मध्ये अश्या माझ्या आठवाणितल्या सीनची मैराथॉन चालू राहील...
#सशुश्रीके | २१/०२/२०१५ | ४.३६
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

'वाह...क्या सीन है...' भाग २
लहानपणी काही मालिका चित्रपट इतके पाहिले की जन्मभर विसरणे अशक्य, त्यातले काही सीन्स,
आज 'कथा' आणि 'चश्मे बद्दूर' बद्दल...
• 'कथा' सई परांजपे दिग्दर्शन...
प्रमुख भूमिका नसरुद्दीन शाह ( सरळ माणूस )
फारुख शेख ( हरामी मित्र ) दीप्ती नवल ( नाईका )
असो... तर सीन असा आहे की 'जबरदस्तीनी आलेल्या पाहुण्या' फारूख शेखला भूक लागते... तो म्हणतो नसरुद्दीनला की चल आपण जेवायला बाहेर जाऊ... दोघेही छान महागड्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातात... नसरुद्दीन त्याचं ठरलेलं (त्याच्या ऐपतीला परावडेल असं) अंडा कर्री वगैरे मागवतो, फारूख मात्र 'शाही' पनीर शाही हे शाही ते अशी सरबत्ती लावतो, नसरुद्दीनला घाम फुटतो.. कारण त्याच्याकडे तीतके पैसे नसतात... फारूख कडे ही पैसे नसतातच, तो जेवण वगैरे झाल्यावर काउंटर पाशी जाऊन 'एक फोन करू का पैसे देतो' असं वगैरे सांगून मैनेजेर समोर एक फोन लावतो आणि असा आव आणतो की जणू तो फूड इंस्पेक्टर आहे आणि इथले जेवण उत्तम आहे वगैरे... फोन ठेऊन झाल्यावर मैनेजरला किती पैसे झाले असे विचारणार त्यात मैनेजेर... त्यांचे जेवण फुकट असल्याचे सांगतो व परत या कधीही वगैरेची ऑफर ही देतो... हे सर्व पाहुन नसरुद्दीनचा चेहरा बघण्यालायक झालेला असतो! ह्या सिनेमात अश्याच प्रकारचे खुप सीन्स आहेत ज्यात फारूख बाजी मारून जातो पण नसरुद्दीनचे जे काही हावभाव आहेत... फार वाइट वाटतं त्या क्यारेक्टरचं! आणि त्यातच अगदी बरोबरीची बाजी मारली आहे नसरुद्दीन(जीं)ने!
• 'कथा' सिनेमाच्याच आसपास आलेला 'चश्मे बद्दूर'
सुरुवातच असला संथ पण जब्राट सीन आहे ना, भिंतींवर टिपिकल बैचलर रूम मध्ये असलेल्या अर्धनग्न मुलींचे पोस्टर्स... पसारा, सिगारेटीचा धूर, क्लोजअप पायांवर, पायांच्या अंगठ्या आणि त्याच्या बाजूच्या बोटा मध्येएक संपायला आलेली सिगारेट (पायांच्या बोटांची बेचकीच् जणू!) तो पाय दुसऱ्या पायाकडे जाताना दाखवलाय,दुसरा पाय अगदी सहजतेने ती सिगरेट पकडतो आणि एक हात येतो फ्रेम मध्ये, झूम आउट... फारूख शेख ती सिगारेट हातात घेऊन लास्ट कश मारतो, कमाल जमलाय तो सीन! नंतर ही खुप सीन्स आहेत सिनेमात ज्यात असले बारकावे बखूबीने चित्रित केलेत, यझदी नावाच्या बाइकला लावलेल्या 'कीका', पानवाल्याला उधारी साठी लावलेला मस्का, दीप्ती नवलच्या घरात शिरण्यासाठी मारलेल्या 'काल्पनीक'थापा... दीप्ती नवल जेव्हा 'चमको' नावाची डीटर्जंट पावडर विकायला येते तो सीन, एकूणच सगळे सीन्स अगदी साधे सरळ असूनही कमालीचे वाकडेतिकडे आहेत, नसेल बघितलात हा सिनेमा तर जरूर पहा!
#सशुश्रीके | २२/०२/२०१५ | ८.४२

'वाह...क्या सीन है...' भाग ३
लहानपणी काही मालिका चित्रपट इतके पाहिले की जन्मभर विसरणे अशक्य... त्यातले काही सीन्स... आज 'बावर्ची' आणि 'आनंद'
दोन्ही हृषिकेश मुखर्जीचे, दोन्हींमध्ये राजेश खन्ना आणि गुलजार यांचा अमूल्य वाटा!
• सुरुवात करतो 'बावर्ची'ने
Its so simple to be difficult but its so difficult to be simple...
राजेश खन्नानी जेव्हा हां डायलॉग मारला तेव्हा काही कळालं नाही, लहानपणी इंग्रजी चा भोज्ज़ा होताच, असो नंतर अर्थ कळाला तो पर्यन्त सगळ 'डिफीकल्ट' झालेलं! असो,
सीन नंबर एक, राजेश खन्ना एका कुटुंबाकडे बावर्ची म्हणून येतो,
त्या घरात एक आजोबा ३भावंड २कुटुंब एक मुलगी असा लवाजमा असतो, प्रत्येक जण आपापल्या विश्वात, त्यात ए के हंगलला संध्याकाळी ओफ्फिस वरुन आल्यावर प्यायची सवय असते, हां प्रकार कोणालाच आवडत नसतो, सगळे जण ते प्यायला बसले की नाक मुरडत असत, हे सर्व पाहुन राजेश खन्नाला वाइट वाटलं... आणि एक कोल्ड्रिंक आणि 'चकणा' आणून दिला, म्हणे एवढे थकुन भागून येता पण मग रोज पाण्याबरोबर दारू... छे छे... आजपासून मी तुम्हाला रोज असाच पुरवठा करणार, हे ऐकून हंगल साहेब जाम खुश... अश्या प्रत्येक व्यक्तीला खुश करत 'बावर्ची' त्या सिनेमात अगदी आदर्श हीरो होतो.
त्या घरात लपलेली प्रत्येक कला, माणुसकी, नाती राजेश खन्ना 'बावर्ची'च्या रूपाने उलगडत असतो.
• 'आनंद' मरा नहीं...'आनंद' मरते नहीं... हे चित्रपटातलं शेवटचं वाक्य... मला अजुनही आठवतय... मी मावशीकडे होतो राहायला...
टीव्ही वर आनंद लागलेला, मावशी म्हणाली बघ हां सिनेमा, मी पहात होतो, आवडत होता सिनेमा, संपायला येतो तेव्हा अर्थात, 'बाबूमोशाय... बाबूमोशाय बाते करो मुझसे... बोल बोल के सर खा गए हो मेरा...' हा अमिताभचा डायलॉग येत, तेव्हा मावशी राडायला लागते, मी विचारतो 'काय झालं मावशी!?' ती काहीच न बोलता मान हलावते आणि साडीला डोळे पुसते, पुढे मी हा सिनेमा निदान २०-२१ वेळा तरी नक्कीच पाहिला असेन... मी तर डायलॉग्स आणि गाणी एकत्र असलेली ऑडियो कैस्सेट पण घेतलेली... आणि नंतर बोलण्या बोलण्या तुन असं ही कळालं की माझ्या आईने थीएटर मध्ये पाहिलेला हां पहिला सिनेमा! दादरच्या प्लाझा चित्रपट गृहात, अश्या खुप आठवणी आहेत 'आनंद' बद्दल! त्यामुळे अक्खा सिनेमाच खुप अमूल्य सीन्सनी भरलेला आहे! पण सर्वात आवडता सीन म्हणजे 'मुरालीलाल' अमिताभला प्रेमाची जाणीव करून देण्यासाठीचा आनंद नी मारलेला हुकमी एक्का! रासत्यावरच्या कुठल्याही माणसाला, 'ओ मुरालीलाल...' अशी हाक मारत, मग त्याची ओळख करवुन घेऊन, लोकांमध्ये ट्रांसमीटर बसवलेला असतो आणि आपण फ्रीक्वेंसी असतो वगैरेचे उदाहरण देऊन जे काही अमिताभला समजावतो! अप्रतिम सीन! हा सिनेमा दर्जेदार सीन्सनी ओतप्रोत भरलाय, त्यामुळे इथेच राजा घेतो, कारण हा चित्रपट 'अमर' आहे!
#सशुश्रीके | २३/०२/२०१५ | १.३७

'वाह...क्या सीन है...' भाग ४
लहानपणी काही मालिका चित्रपट इतके पाहिले की जन्मभर विसरणे अशक्य... त्यातले काही सीन्स... आज जाने भी दो यारों... अह्हो तसं नाही... सिनेमाचं नावच आहे हो 'जाने भी दो यारों'
नसरुद्दीन, सतीश शहा, रवी बासवानी, भक्ती बर्वे, ओम पूरी, पंकज कपूर, सतीश कौशिक, नीना गुप्ता, राजेश पूरी... अश्या (तेव्हाच्या) नवीन कलाकरांचा खजीना असलेला हा वास्तववादी धमाल विनोदी चित्रपट! सीन सांगण्यापेक्षा नुसत्या डायलॉग्सनीच अक्खा सीन डोळ्यासमोर येतो, मी अती कामात असेन... आणि गाणी ऐकण्याचा पण कंटाळा आला असेल (असं होत नाही बहुदा) तर मी 'जाने भी दो यारों' आणि 'गोलमाल' हे दोन सिनेमे 'ऐकतो'
• थोडा खाओ थोडा फेको!
• देश की उन्नती की पहचान अगर किसी से होती है... तो वो है... गटर!
• शराब्बी ही शराब्बी की मदद नाय करेगा तो कौन करेगा!?
• Draupadi is just not yours ... we are all shareholders
• नालायक, अधर्मी, दुराचारी, मामाचारी, भ्रष्टाचारी... बोल सॉरी!
• मैंने चीरहरण के प्रोग्राम को रद्द कर दीया है
आणि माझा सर्वात आवडता... • शांत गदाधारी भीम... शांत
सुरुवातीलाच नरसरुद्दीन आणि रवीची स्टूडियो मधली मादक फोटोग्राफी... ती फोटोग्राफी जेव्हा 'जासूसी' रूप घेते तेव्हा त्यांच्या भीत्रटपणाला दीलेली तडफदार फोडणी... आणि शेवटी त्याच फोडणीवर मारलेले समाजकंटकी निर्दयी बर्फ! पण एकूणच अक्ख्या सिनेमात काय काय सीन आहेत एक से एक... यूनिक! पूलाखालच्या शवपेटी-स्पोर्ट्सकार पासून महाभारता पर्यंत... सतीश शहानी मूडद्यात जीव आणलाय त्या प्रत्येक सीन मध्ये! ओम पूरीचे शराबी फटाके तर प्रत्येक सीन मध्ये खणखणीत वाजतात... साथीला पंकज कपूरचे खवट दाणे... आणि त्याच्या चमच्यांची किटीरपीटीर! भक्ती बर्वे काय दीसल्ये साडीत... त्यात नसरुद्दीन प्रेमात पागल... भक्तीने ऐंन वेळी दीलेला धोका त्यामुळे होणारी चिडचीड. शेवटी महाभारत सीन, द्रौपदी, वस्त्रहरण... 'ये क्या हो रहा है!?' ह्या ओळीचा रिपीट टेलीकास्ट!
अपेक्षे प्रमाणे अ-सत्य-मेव-जयते नी घेतलेला निरोप! नसरुद्दीन आणि रवी चालत असतात मागे गेट वे ऑफ़ इंडिया... आणि खेल खल्लास!
केवळ अप्रतीम... असा सिनेमा परत होणे नाही!
#सशुश्रीके । २५/०२/२०१५ | १२.१२

'वाह...क्या सीन है...' भाग ५
लहानपणी काही मालिका चित्रपट इतके पाहिले की जन्मभर विसरणे अशक्य... त्यातले काही सीन्स...
आज 'गोट्या' नावाच्या मराठी मालिकेबद्दल! हो हो तीच ती...

"बीजा हवी निगराणी
हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ
त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात"
हे शीर्षक गीत असलेली!
आठवडा भर वाट बघायचो... त्यात तेव्हा फ़क्त दूरदर्शन, बातम्या आणि 'आमची माती आमची माणसं' न उरलेल्या २तासात मालिका नाहीतर व्यत्ययची पाटी... असो.
मला ह्या मालिकेतले कुठलेच एपोसोड्स आठवत नाहीत मात्र एक एपिसोड होता जेव्हा गोट्याकडे तिच्या बहिणीला देण्यासाठी पैसे नसतात... त्याला कुठून तरी कळते की मध काढून देणाऱ्याला अमुक अमुक पैसे मिळतात, हा पुढे मागे न विचार करता मध काढ़ायला झाडावर चढतो आणि मधमश्या त्याच्यावर... आधी हसु यायला लागलं.. पण नंतर त्याची अवस्था पाहुन मला झोप लागेना... अजुन ही तो प्रसंग आठवल्यावर खुप वाइट वाटते!
लहानपणी एखादी गोष्ट मनात राहिली की शेवटपर्यंत पीच्छा सोडत नाही... तसलाच होता हां सीन!
#सशुश्रीके | २५/०२/२०१५ । ५.३१

Comments
Post a Comment