आज भारत पाक मैच

॥श्री॥

आज भारत पाक मैच
काय हाइप आहे चायला...
'आपण वर्ल्डकप मैचेस मध्ये एकदाही पाकाड़याँकडून हरलो नाही'
आणि पाकिस्तानी 'एकूणच आपापसात झालेल्या मैचेस मध्ये पकिस्तान जास्त मैचेस जिंकलाय'
ह्या कारणावर जोर देऊन आपआपली बाजू मांडतायत! नुसता आटापीटा चालुए.. व्हाट्सअप / ऍफ़बी / ट्वीटर
नुसते #indvspak फुल ऑन शिवगाळ...शेवटी जो चांगले खेळेल तोच जिंकेल, लक फैक्टर पण हवेच... भूतकाळाचा आणि लाईव्ह गेमचा काहीच संबंध नसतो.. भारतीय संघाची सद्धयाची परिस्थिती काही ठीक नाहीये... पाकिस्तानची परिस्थिती पण काही वेगळी नाहीये!
म्हणजे आज दोन्ही टीम्सचे वजन अगदी सेम आहे! मी आणि बाकी कोणी कितीही काहीही बोम्बल्लो तरी
...त्या अफ्रिदीच्या...फूल्या फूल्या फूल्या...
#सशुश्रीके

ऑफिस मधला एक पाकी म्हणाला
क्या भइ तुम लोग जीत गये!
मी आदबीने म्हणणार की… हार जीत तो होती रेहती हें
पण तोंडातून आलं
हा यार, तुम लोग नही सुधरोगे!

#भयाणशांतता #अतीवआनंद #सशुश्रीके

आज ओफ्फिसमधून निघताना म्हणालो
जरा पाकी लोकांना बघुन जावें... हाय बाय टाइप्स
पण नाही पाहता आलं...सगळ्यांची तोंडं खाली होती...
कोणी वर बघायला तयार नाय!!!
मैन भी उनको उनके हाल पे छोड़ दीया!
#बडामजाआया #सशुश्रीके

गेले अर्धा तास मी पाकी न्यूज़ चैनल सर्फ करतोय... एकाही चैनल वर आजच्या मैचची न्यूज़ नाही!
#आवरा #सशुश्रीके १५-०२-२०१५






Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...