खुप नाचायला आवडायचं मला
खुप नाचायला आवडायचं मला
९४साली... हमसे है मुक़ाबला, उर्वशी उर्वशी...
माझी ही दोन एकदम फेवरेट गाणी...
बाकी जेंटलमनचं चिकबुकरैले...
बॉम्बेचं हम्मा हम्मा... वगैरे ही तर होतीच भन्नाट!
घरी मोठा आवाज करून,
जितकं परफेक्ट करता येईल तितकं नाचायचो...
प्रभुदेवा अंगात यायचा...
त्याच्यासारखीच ब्यागी पैंट..
टीशर्ट त्यावर बटण न लावलेला आणि बाह्या वर केलेला शर्ट...
दातात ओठ दाबत वाकडे तिकडे चेहरे...
पायला झीणझीण्या येई पर्यन्त धिंगाणा,
मंडळातल्या गणपती समोर ही नाचलोय,
मला बघुन ज्यांना लाज वाटायची ते पण नाचायचे...
"ओले ओ... ओले ओ ओ... "
ती कैस्सेट आणि तो जोश खतरनाक होता प्रकार,
आताही ती गाणी एकली की २दशकं उलटून गेली
त्या गोष्टीला हा विचारच नाचवतो!
२-२तास अखंड नाचायचो... हाहाहा
आता अन्वयाबरोबर २०मिनट नाचलो की दम निघतो!
तीचं नाचणं म्हणजे उड्या मारणं...
अजुन बाकी काही जमत नाहीये...
अजुन १ वर्षानी सॉलिड नाचेल ती...
आणि मला ही नाचवेल ह्यात शंका नाही.
हल्ली ते क्लब वगैरे मध्ये ठरावीक जागेत आपलं,
पाय पुढे मागे हात वर खाली केले की झालं...
तो बिंदास्त 'हम से है मुक़ाबला' वाला धमाका...
त्याला तोड़ नाय! गेले ते दीन...
#सशुश्रीके | २९ जानेवारी २०१५ | दुपारचे ३.३३
Comments
Post a Comment