पूर्वीची गाणी!

पूर्वीची गाणी! 
मग ती मराठी असोत हिंदी...
ते स्टीरियो नसलेलं...
काही छेडछाड़ काही इफेक्ट्स नसलेलं रिकॉर्डिंग!
ब्लैक एंड व्हाइट ते एस्टमनच्या आधीच्या काळ,
गाण्याच्या सुरुवाती पासूनच ज़रा खरखर...
काय सुंदर असते ती,
ती गाणी कितीही एकली तरी बोर नाही होत... उलट त्या जमान्यात नेउन सोडतात ज्या जमान्यात आपले आजोबा वगैरे तरूण होते...
त्यांचे किस्से वडीलमंडळींकडून ऐकायला जाम मजा... असो... आमचे ससरेबुआ,
त्याना जुन्या गाण्यांची इतकी माहिती असते की विचारुच् नका, ठरावीक काही जुनी गाणी लागली की ते कुठे चित्रित केले पासून त्या गाण्या वरचे किस्से कोणी गायले कोणाला गायचे होते कोण गाणार होते वगैरे वगैरे... मग मजा येते ऐकायला!

तसा मी काही पूर्वीच्या गाण्यांना कोळून वगैरे प्यायलो नाहीये, पण 'भूले बिसरे गीत' लागलं की कान टवकारतोच,
आत्ता लिहिता लिहिता
•'दम भर जो उधर मु फेरे...ओ चन्दा.. मैं तुमसे प्यार कर लूंगा...'
• 'लाखो है निगाह में जिंदगी की राह में...'
• 'ओ नीले गगन के तले... धरती का प्यार...'
अश्या जुन्या गण्यांचा ज्यूकबोक्स वाजतोय मनातल्या मनात... रेडियो किवा वॉकमन वगैरे पाहिजेच ऐकायला असं थोडीच आहे! आणि त्यात शांत सकाळी तर मनातली प्लेलीस्ट उत्तम प्लेलीस्ट!
पूर्वी मुम्बई अलीबाग रेवदंडा / पुणे मुम्बई पुणे किव्वा बाहेरगावी प्रवास करताना समोरच्या कोणा काकांच्या ट्रांज़िस्टर वरचा जुन्या गण्यांचा आवाज आणि धुकं हातात गरम कॉफीचा तो थर्माकॉलचा कप असेल तर त्या सारखा सुखी क्षण नाही!

टिंग... वज्रदंती वज्रदंती विको वज्रदंत...विको पाउडर विको पेस्ट... टिंग... विविधभारती गीतमाला
वगैरे ईतकं कमाल आवड़तं ना की मग अचानक कोणीतरी रेड एफएम / रेडियोमिर्ची वगैरे लावलं की आपण वर्तमानात येतो आणि मग मूडच जातो!

मध्येच एकदा डीबेट (सुसवांद म्हणा) झालेलं माझ्या मित्राचं नी माझं की 'तुम्हाला आवड़णारी ४-५ गाणी सांगा' (स्टेटस उपडेट)
मी ५ही गाणी रहमानची ओतली...
तो म्हणाला तू आयुष्यात काहीतरी -मिस- करतोयस लेका!
त्याचं बरोबर ही होतं आणि चूक ही...
५गाणी सांग म्हणल्यावर जे सांगितलं ते होतं 'प्रेम' पण आत्ता जे कही तुम्ही वाचलं ते 'अमर-प्रेम'

‪#‎सशुश्रीके‬ | ११ जानेवारी २०१५ सकाळचे ५.२२

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...