चहा
त्यात सपटचा चाय टाइम - मुम्बई टापरी चाय फ्लेवर चहाचा अर्धा चमचा
आणि २कप पाणी...
अगदी चीडचीड होइ पर्यन्त उकळवायचा
मग ताजचे २चमचे आणि साखर ४चमचे...
अगदी भरभरून नाही...
सपाट... आय लेवल ला पाहिल्यावर चमच्यावर न दिसेल इतके,
मग महाग दूध...'महाग' म्हणजे कमी दूध!
कड़क लागतो चहा आपल्याला...
ते चिखला सारखं नाही पण अगदी गहुवर्णीय पण नाही,
मग धीम्या गतीनी त्याला चिड़वायचं...
मस्त बुडबुड्यांचा छळ!
मग हळूच गैस शांत करून मोबाइल वर टाइम पास...
ठरलेले २कप्स घ्यायचे...
गाळणं शोधावं लागतच, आणि साणशीही...
त्या प्रचंड भांड्यांच्या गादारोळात नेमके लपून बसलेले असतात...
त्यात परत आवाज करायचा नाही! अन्वया उठली
तर शांत चहा प्यायला मिळणार नाही ह्याची धमकी!
हे सर्व झाल्यावर ५मिनट मुरलेला तो चहा गाळायचा...
चमचा घेऊन दाबायचा त्या चहा पत्तीवर
म्हणजे अर्क काढून अजुन कड़क चहा!
मग स्लो मोशन मध्ये हळूच कप फरशीवर टेकवून...
जोरात गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत ढुंगण टेकवाचं बीन बैगवर...
नी हा मेसेज सोडायचा खर्डेघाशीत... सुख!
वीकेंडचा परमोच्च आनंदी क्षण... तो हाच!
अन साथीला ऐस.डी.बर्मन हिट्स... खोया खोया चाँद!!!...
बस बस! ~सुपर हैप्पी~
Comments
Post a Comment