धन्यवाद गानू…
"संध्याकाळची वेळ... ७.१० झाले असतील...
पूर्वी जमीनीवर राहून आकाश दाखवायचे,
एक माणूस बॅंकेत आला... गार्ड म्हणाला बैंक बंद झाली आहे ७ वाजताच, आता उद्या या, तो माणूस काय ऐकायला तयार नाही.
गार्ड आला माझ्याकडे म्हणाला एक माणूस आलाय, म्हणतोय अर्जन्ट आहे, पैसे काढायचेत...
मी म्हणालो, ठीके पाठव आत..
शटर अर्धवट उघडून गार्डनी पाठवलं त्या माणसाला आत... मी विचारलं चेक आहे का उत्तर नाही, पासबुक आणले का उत्तर नाही... डिमांड ड्राफ्ट आहे पण त्यावरून कॅश देणे जमणार नाही... कैशियर नाही, दिवासभराचा लेखाजोखा सम्पलेला आहे, उद्या या... हे ऐकून तो माणूस भडक्ला... अहो परिस्थिती समजून घ्या, मला पैसे हवेत हॉस्पिटलसाठी, तुम्हाला कळत नाही का... कसली ही सहकारी बैंक तुमची... मी नाही देऊ शकत पैसे, उद्या या हे त्यांना मी परत सांगितले... शिव्या शाप देऊन तो माणूस निघुन गेला.
दुसऱ्या दीवाशी सकाळी सकाळी एक म्हातारं जोडपं आलं बँकेत, आणि काहीतरी चौकशी केली... गार्डनी माझ्याकडे बोट दाखवलं, मनात बोललो.. आता माझ्यावर आरोप करणार वाटतं, पण मी काय चुकीचं केले नाहीये, माझ्या हातात जेवढ शक्य तेच केलं!
ते दोघे मझ्यापाशी आले, काल पैसे घ्यायला आमचा जावई आलेला त्याला पैसे द्यायला नकार दीला ते तुम्हीच का!?
मी म्हणाली हो हो.. मीच
ते आता नंतर सांगीनच! शेवटी माझ्या डोळ्यावरची झोप आनावर झालेली पाहुन काकानी गुडनाईट केलं, पण त्या 'गुडनाईट' मध्ये किस्से आठवत बसलो, न झोप कधी लागली कळलच नाही.
अहो, खुप धन्यवाद... मी काल एडमिट होतो ते खरे पण सकाळीच मिळाला डिस्चार्ज, आमचा जावई आमच्या पैशावर डोळा ठेऊन आहे हो, तुमच्या मुळे वाचले पैसे! खुप धन्यवाद. मग मी त्यांना सुचवले की तुम्ही एक वेगळं अकाउंट उघडा, ज्यानी तुम्हालाच पैसे काढता येतील."
पण काय रे.. कसले असतात लोक!
असं म्हणताना गानु काकांनी हात आणि भूवइ वर करत आश्चर्य व्यक्त केलं!
गानू काका... अनुभवांचा असा खजाना दर वेळी उघड़तात, आणि सांगायची पद्धतही इतकी साधी, पण डोळ्या समोर प्रसंग उभा राहतो!
ह्या कीस्श्या नंतर अजुन २ किस्से सांगितले...
लहानपणीच्या गोष्टी आणि आत्ताच्या गोष्टींमध्ये काय जमीन आस्मानाचा फरक!
आता आकाशातून जमीन दाखवतात!
#सशुश्रीके | २३ जानेवारी २०१५ सकाळचे ११.२२
Comments
Post a Comment