अन्वया उवाच!

'लास्ट टाईम'
अन्वयाला कुठलीही गोष्ट १दा नाही २दा नाही ३दा वगैरे हवी असते
उदा. - चोकॉलेट, ग्रेपस, बेबी टीव्हीचे कार्टून्स
मग अमृता तिला अट घालते की आता बस हं, आता हे लास्ट टाईम
आता अन्वया लास्ट टाईम ३ दा म्हणते. 
feeling आम्ही हरलो!
-----------------------------------------------------

आजी ला 'ठकसा' लागलाय म्हणून ती औषध शाप्पिंग करायला गेल्ये!
-----------------------------------------------------

अन्वया समोर चहा आणि चिप्स चोपत होतो
म्हणते कशी… ते छी छी आहे म्हणून तू खातोयस ना! 
-----------------------------------------------------

इंटरव्यू होता आज...माझा नाही,अन्वयाचा!
अन्वयाचा पहीला इंटरव्यू.

ऐकलं होतं, की लहान मुलांचा पण इंटरव्यू असतो आजकाल...
आज पाहिलं,
'नाव काय?' पासून सुरुवात...
रंग मग आकार ओळख...
मग हाताची पकड कशी आहे खडू/पेंसिल वर वगैरे...
सगळ उत्तम, इंग्लिश बोलता येत नसलं तरी शब्द येतात...
त्यामुळे जमत होतं अन्वयाला,
शेवटचा प्रश्न, नर्सरी राइम्स येतात का...
पण अन्वया काय त्या प्रश्नाला भीक घालेना,
आधीच नवीन चेहरा दिसला की अन्वया बघुन न बघितल्या सारखं करते!
मग आम्हीच म्हणालो येतात तीला नर्सरी राइम्स...
थांब आता असं म्हणावा लागतं कधी कधी,
तरी प्रयत्न चालू होते...
ती काय म्हणायला तयार नाही, समोर असलेल्या खेळण्यां मध्ये गुंग!
मी ज़रा प्रयत्न करत होतो तीला आठवण करून द्यायला...
हे गा ते गा...
त्यात व्हील्स ऑन द बस गो राउंड राउंड च्या ऐवजी
'पीपल' ऑन द बस गो राउंड राउंड...असं बोल्लो...
अम्रुताने लगेच माझी चूक सांभाळत 'कवर अप' केलं, असो...
आता काय बोलून उपयोग...
एकदा बाहेर आलेले शब्द थोडीच परत घेता येतात!
मग शाळा दाखवली... प्लेइंग एरिया...
म्यूजिक रूम... वगैरे सर्व झालं. अन्वया खुश होती,
तीला मूलं दीसत होती अखंड खेळताना... बघू आता पुढे काय...
शेवटी तुमची मुलगी आमच्या शाळेत शिकण्याच्या
लायकीची आहे ह्याचं प्रमाणपत्र मिळालं ते घेऊन
बाहेर पडताना माझा शाळेतला पहिला दीवस आठवला!
भोकाड पसरुन खिडकीच्या गंजांना डोकं टेकवुन आई आई करत होतो tongue emoticon
आता बघतो अन्वया काय दीवे लावणारे!
-----------------------------------------------------

काकड़ी टोमेटो चमच्यानी देत होतो....
एक घास चुकून हातानी दीला...
तर ही मला 'वा' करून... "कोणी हातानी देतं का वा!!!"
-----------------------------------------------------

सकाळी अमृता सुरश्री च्या ड्राइविंग क्लास टेस्ट साठी सुरश्रीला ड्राइविंग स्कूलला घेऊन गेली.
मग काय सकाळी सकाळी आई बाजूला दिसली नाही मग अन्वया उठली नी राडारड सुरु ... १० मिनिटंअखंड टाहो! कसाबसा तीला स्वेटर घालून दात घासुन आइकड़े जाऊ सांगत चॉकलेट आणि बेबी टीवी ऑन करून दीले... बसल्ये बघत आणि मध्येच म्हणते 'आपल्याला आई कडे जायचय'
-----------------------------------------------------

ऊऊऊ...चहा चिडला!!! (चहा ऊकळतोय) 
-----------------------------------------------------

अमृतानी अन्वयाचे कान साफ केले आज,
तर तिला मिनी चे करायचे होते,
म्हणते… "मिनीचे कान कुठे गेले?"
-----------------------------------------------------

Morning news.... Anvaya saw our honourable PM Mr.Modi...
And she says... मोदी काका मोदी काका
-----------------------------------------------------

अन्वया आज सकाळी उठली
नेहमी प्रमाणे काहीनाकाहीरी मागणी असते
बाबा टीव्ही लाव
बाबा गम गम पापा दे
बाबा हे दे बाबा ते दे
आज मागितली शोकेस मधली खेळणी
मी उगाच आपलं गम्मत म्हणून सांगितलं
रडून सांग ना… तीने लगेच रडवेला चेहरा करून रडण्याचा आभिनय… 'बाबा गाडी दे ना…'
मग अजून लांबवला मी प्रकार… आता हसून सांग!…
तीने लगेच हसरा चेहरा करून हसायचा आभिनय… 'बाबा गाडी दे ना…'
मला मग राहवलं नाही…
खुल्जा सीम सीम करून तो खजाना हातात घ्यायला ईतकी सैरभैर झालेली,
ही गाडी घेऊ की ती!
आणि गाडी सोडून क्यालीडोस्कोप उचलला!
खरच त्या क्यालीडोस्कोप सारखं असतं आपलं कधीकधी…
मागतो एक पण प्रत्यक्षात घेतो भलतच!
-----------------------------------------------------

दुपारी भुई चाल्लोय... अव्यया बलोबल!
निघता निघता मी बाथरूम ला गेलो
लगेच अन्वया ओरडून...
*ऐ बाबा आत्ता कुठे अंघोळीला चालाय!?*
-----------------------------------------------------

हल्ली सगळ्या गोष्टी आपापल्या करायच्या असतात...
अगदी नळ चालू केलेला असेल तो पण बंद करून तो
परत चालू किव्वा चालू असलेला बंद... नुसती गड़बड़!
-----------------------------------------------------

तू डांस मी पण डांसत्ये!
- Anvaya to Surashreeटेंटू

-----------------------------------------------------

गेला महिनाभर ताके झाके हे गीत अन्वयाला खुप आवडतं
क्वीनचं
उठल्या बसल्या गाडीत सगळीकड़े तेच गाणं
अत्ता वाजलेत १०.३६ तीच्या झोपायची वेळ
गाणं लावलं
संपायला आलं
म्हणाली
बाबा लास्ट टाइम लाव बाबा... परत लाव बाबा
अपॉआप लाव बाबा
लूप वर लागलेलं त्यामुले २सेकंदानंतर आपोआप लाग्लच
म्हणते कशी
बाबा बाबा आपोआप लागलं ताके झाके
थंक यू बाबा...
आणि चालू गायला तीच्या स्टाइल मध्ये...
सैम सायकल चालू आता झोपे पर्यन्त!!!
निरागस झटके!
-----------------------------------------------------

हल्ली मी गाणी गायला लागलो की...
(तीच्या काकुला उद्देशून)
अन्वया मला रागावते...
"बाबा गाउ नको...
पोटातलं बेब्ब्यी घाब्रेल!"

-----------------------------------------------------

नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी डोळ्यासमोर मोबाइल
घेउन मी बीन बैग मध्ये लोळत होतो...
अन्वया खेळत होती
माझ्याकडे बघून...
"बाबा मोमाइल ठून दे ना.. ठेंनदे मोमाइल!!"
"आआआ ठूंन्दे नाआआआ!!!"

-----------------------------------------------------  
अन्वया वेर्जन २.३
प्रसंग... तीच्या आईचा वाढदिवस...
केक कापण्यासाठी माझी बायको हातात सुरी घेउन रेडी...
ती सुरी दमदाटीने स्वत:च्या ताब्यात घेत अन्वया...
आई - आज कोणाचा बर्थडे आहे... माझा!
अन्वया - नाही नहीं माझा.. माझा हेप्यी बडे..
मला केक कापायचा... माझा हेप्यी बडे.
मी - अग्ग आज आईचा बर्थडे आहे आज!!
अन्वया - आsssssss... नायी.... 
माझा हाप्प्यी बडे केक्क्क्क... मला...
ओ_ओ
----------------------------------------------------- 
अन्वया /// वय २
जागा गाडी
वेळ रात्रीचे ११
मित्राच्या घरातून आमच्या घरी आलो...
३मिनीटं लागतात
झोपेत अन्वया

'सुद्धा-घरी-आलो-पण'
-----------------------------------------------------  
बाबा उठ
बाबा बाजुला बश...
बाबा पेन दे...
बाबा पेन देsssssss
बाबा ब्लू पेन दे...
बाबा नवीन दे...
बाबा ग्रीन दे...

-----------------------------------------------------    

अन्वया /// वय - २
आमची अन्वया जो प्रश्न तीला आपण विचारावा असं वाटतो
तो प्रश्न ती बोलते...
आई पोट भरलं का
मग आई तो प्रश्न तीला विचारणार
'अन्वया... पोट भरलं का?'
मग अन्वया म्हणणार 'ओके'
-----------------------------------------------------    

Finally.. the day we were waiting for has come... Anvaya says... मला स्कूल मध्ये जायचय!
रात्रभर खोकुन झाल्यावर आज नको पाठवायला शाळेत ह्या पालकधार्जिण निर्णयावर गदा!
feeling confused with Shubhada Ketkar and Amruta Gogate Ketkar.
-----------------------------------------------------    

काल रात्री नीलमसाठी अमृता आणि सुरश्रीने सरप्राइज म्हणून बर्थडे केक आणला, तो पाहुन अन्वया जाम खुश झाली!

अमृता आणि सुरश्रीने समजावलं की हा केक नीलम काका साठी आहे, आणि तो आला की आपण रात्री कापू... तो आला की त्याला सांगू नकोस हं!

८च्या आसपास नीलम आला... बेल वाजवली, अन्वयानी नेहमीप्रमाणे दरवाज्याचं लॅच धडपड करत उघडले, नीलम पूर्ण आत येतोय, तेवढ्यात... दबक्या आवाजात म्हणते कशी...
"नीलम काका तुझ्या साठी केक आणलाय!"

20May2015

----------------------------------------------------- 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...