अन्वयाचा पहीला इंटरव्यू!

इंटरव्यू होता आज...माझा नाही, अन्वयाचा!अन्वयाचा पहीला इंटरव्यू.

ऐकलं होतं, की लहान मुलांचा पण इंटरव्यू असतो आजकाल...
आज पाहिलं,
'नाव काय?' पासून सुरुवात...
रंग मग आकार ओळख...
मग हाताची पकड कशी आहे खडू/पेंसिल वर वगैरे...
सगळ उत्तम, इंग्लिश बोलता येत नसलं तरी शब्द येतात...
त्यामुळे जमत होतं अन्वयाला,
शेवटचा प्रश्न, नर्सरी राइम्स येतात का...
पण अन्वया काय त्या प्रश्नाला भीक घालेना,
आधीच नवीन चेहरा दिसला की अन्वया बघुन न बघितल्या सारखं करते!
मग आम्हीच म्हणालो येतात तीला नर्सरी राइम्स...
थांब आता असं म्हणावा लागतं कधी कधी,
तरी प्रयत्न चालू होते...
ती काय म्हणायला तयार नाही, समोर असलेल्या खेळण्यां मध्ये गुंग!

मी ज़रा प्रयत्न करत होतो तीला आठवण करून द्यायला...
हे गा ते गा...
त्यात व्हील्स ऑन द बस गो राउंड राउंड च्या ऐवजी
'पीपल' ऑन द बस गो राउंड राउंड...असं बोल्लो...
अम्रुताने लगेच माझी चूक सांभाळत 'कवर अप' केलं, असो...
आता काय बोलून उपयोग...
एकदा बाहेर आलेले शब्द थोडीच परत घेता येतात!

मग शाळा दाखवली... प्लेइंग एरिया...
म्यूजिक रूम... वगैरे सर्व झालं. अन्वया खुश होती,
तीला मूलं दीसत होती अखंड खेळताना... बघू आता पुढे काय...
शेवटी तुमची मुलगी आमच्या शाळेत शिकण्याच्या
लायकीची आहे ह्याचं प्रमाणपत्र मिळालं ते घेऊन
बाहेर पडताना माझा शाळेतला पहिला दीवस आठवला!
भोकाड पसरुन खिडकीच्या गंजांना डोकं टेकवुन आई आई करत होतो :P
आता बघतो अन्वया काय दीवे लावणारे!

#सशुश्रीके | १४ जानेवारी २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...