रंग अजुनही ओलाच आहे!
रंग अजुनही ओलाच आहे!
पाचवी सहावीत असेन...
नीट आठवत नाही
गणेशोत्सव... मी काढलेले नेताजींचे पोर्ट्रेट नेहमी मागायचे मंडळात लावायला,
दर वर्षी प्रमाणे त्या वर्षीही आमच्या नेताजी नगरमध्ये चित्रकला स्पर्धा ठेवलेली, विषय होता देशप्रेम...
मी मस्त प्रसंग रेखाटला...
स्वातंत्र्य सैनिक झेंडा घेऊन ब्रिटिशांशी लढतायत,
मला आणि इतर सर्वांनाच मला पारितोषिक मिळणार ह्याची ग्यारेंटी होती.

पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला..
पहिला नाही, दुसरा नाही... तीसराही नाही!
शेवटी एक स्पेशल पारितोषिक जाहीर केले माझ्यासाठी...
का तर प्रसंग छान रंगवलेला पण
पण झेंडा उलटा रंगवलेला...
हीरवा रंग वर आणि भगवा खाली!
खुप अपमानास्पद वाटलं...
स्वतःचा इतका राग आलेला म्हणून सांगू!
त्यात स्पेशल पारितोषिक जाहीर करून...
अजुनच अपमानस्पद वाटायला लागलेलं!
त्या उलट पालट झालेल्या दीवसानंतर जेव्हा जेव्हा आपला तिरंगा बघतो तेव्हा तो दीवस आठवतो.
चूक अजूनही सुखली नाहीये... रंग अजुनही ओलाच आहे!
#सशुश्रीके | २६ जानेवारी २०१५ | रात्रीचे ११.०६

असे ओले रंगच आयुष्य रंगीत बनवतात...आणि डोकं खांद्यावर ठेवायला मदत करतात
ReplyDelete