'विनायक म्हणे... जय कठोर परिश्रम'




'विनायक म्हणे... जय कठोर परिश्रम'


प्रत्येक माणसात मी स्वतःला शोधतो
कधी कोणी १०% कोणी ७०%.
कायना कायतरी जूळतच... शेवटी काय इतरांना ज्यानी घडवलं त्यानीच मला पण ना! पण ह्याचा ज्यानी घडवलं 'त्या' वर विश्वास नाही, नास्तिक म्हणतो ना आपण तोच प्रकार, (आपण म्हणजे आस्तिकांच्या बाजुनी लिहितोय असं समाजा) पण 'जय कठोर परिश्रम' अशी व्याख्या देतो तो... 'घरच्यांसाठी' नव्या घरी सत्यनारायण पूजा पण करतो... म्हणजे तुमच्या साठी असेल बुआ... माझ्यासाठी 'कठोर परिश्रम'च भारी! आणि फोन लावला किंवा आला त्याचा तर पहिला शब्द 'हैल्लो' नसतो...'जय कठोर परिश्रम'नी सुरुवात होते संभाशणाला!

असा हा 'विनायक' कामत.

वयोमानाच्या मानाने १०वर्ष आधीच पीकलेला... म्हणजे... केस पीकलेला! ६५%केस अक्षरशः पांढरे
चेहऱ्यावर एक कायमचं हास्य चीकटवलेला...
खळी का काय ते... ती पण पडते, ओव्हरऑल छान दीसतो. प्लस बायको लै स्मार्ट... मॉडल टाइप्स! मस्तच जोडी. दोघे भेटायला आलेले अन्वया १वर्षाची असताना, १सोडून २गिफ्ट्स आणलेले...का तर म्हणे कंफ्यूज झाला!
पण ते सांगायला तयार नाही..शेवटी मीच उलगडा करायला लावला. 

अहो पण पहिली ओळख कुठे झाली ते सांगितलच नाही, दुबइत ओळख झाली. मी जिथे काम करायचो त्याच ठिकाणी मी सोडल्यानंतर ज्वाइन झाला, मग तीकडच्या गप्पा, अनुभव वगैरे देवाण घेवाण... चालू होतं, एके दीवाशी वीकेंडला घरी बोलावलं, मनसोक्त गप्पा. नवीन ओळख म्हणून काही बैकफूट वगैरे काय नाय. अगदी माझ्या सारखं बिंदास! काय जमतं काय जमत नाही, 
काय झेप्तं काय नाही... आणि कोणाशी पटतं कोणाशी नाही... या सर्व बाबतीत एकमत... असं कोणी आपल्यासरखं भेटलं की मजा येते.
क्रिकेट, गाडी वेड ख्याख्यिखुखु सेम टू सेम!

दुबईत असून ही जास्त नाही भेटता येत कारण बोरीवली-दादर सारखं अंतर आणि बिझी जाहिरात क्षेत्रातलं जीवन, काय करणार! घरच्यांनाच द्यायला वेळ मिळत नाही पण व्हत्साप जीटॉक फेब चैट चालू असतं. 

श्रीराम लागू तसच ह्याच्या नामातच विनायक... त्यात 'कठोर परिश्रम' सारखं अजब कॉम्बो घेऊन आलेला माझ्या आयुष्यातला पहीला मित्र! 
आस्तिक नास्तिक काय का असेना, 

हे असे मित्र, मित्र असतात... स्वतःला पाठवलेली पत्र असतात. लिहिताना पेनावर बसतात, खोडताना गळा आवळतात, गीतेवर हात ठेऊन खरं सांगीन खोटं लपवणार नाही अशी शपथ घालतात... मित्र मित्र असतात... स्वतःला पाठवलेली पत्र असतात. 


#सशुश्रीके




Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...