'माठ'

।। श्री ।।

१ ऑक्टोबर २०१४

'माठ'

कधी कधी नकळत टायामींग जमतं…
म्हणजे बोलणं आणि हात वारे सगळच कसं आधी तालीम वगैरे करून नाटकात घडवल्या सारखं
प्रत्यक्षात असं काही घडलं की मात्र मन हसतं आणि टाळ्या पण ऐकू येतात!

कसं घडतं… एक किस्सा...

रविवार दुपार
मी घरी टीव्ही पहात होतो
आईची मैत्रीण आलेली
जाम बोर मारायची
तो दिवस काही अपवाद नव्हता
अचानक मला आवाज आला स्वयंपाक घरातून
'अग्ग शुभदा, ए शुभदा, पाणी कुठे गं… '
आता आई नेमकी घरात नव्हती,
म्हणजे बाहेर अंगणात वगैरे गेलेली असेल,
त्यामुळे तीला काही ऐकायला न आल्यानी
आईची मैत्रीण परत तेच…
'अग्ग शुभदा, अए शुभदा, पाणी कुठे गं… '
माझी सटकली…
तेवढ्यात आई पण आली आत
मी हॉल मधूनच,
"अग्ग… माठ…" ह्या वाक्याला माझा हात आईच्या मैत्रिणी कडे
… "तिथे आहे तुझ्या समोर" ह्या वाक्याच्या वेळेला हात माठाकडे (नेला) होता!
नशीब दुसऱ्या वाक्याला तिने पाहिलं
पण आईने दोन्ही वेळेला पाहिलं!

शिट्ट्या टाळ्या हास्यकल्लोळ… आईच्या मनात न माझाही!

प्रयोग हौसफुल! अर्थातच मनातल्या मनात!

- सशुश्रीके




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!