आय जस्ट हेट धिस ड्याम फ्रायडे...

॥ श्री ॥

३० ऑक्टोबर २०१४ दुपारचे २.३३

आय जस्ट हेट धिस ड्याम फ्रायडे...

कारण मला घरी जायची घाई… 
मुंबईत कामाला होतो पण पुण्यात वीकेंड!
सकाळी सकाळी आल्यावरच बॉस्स ला म्हणालो... 
काम दे रे... लवकर 
साधारण १२वाजता वगैरे ब्रीफिंग झालं, लोगो करायचा होता... 
कुठला तरी खोब्र्याच्या तेलाच्या ब्रांडचा लोगो करायचा होता... 
मी आणि माझा सहकारी काम करत होतो...
४-५ ऑप्शन्स झाल्यावर मी बॉस्सला दाखावय्चो, 
त्याचं काही समाधान होत नव्हतं. 
संध्याकाळ झाली... 
अजुन काम चालूच, 
मुद्दाम करतोय की काय असं बडबड करत मी चालू ठेवलं काम... 
शेवटी त्याला एक लोगो आवडला
मी निश्वास सोडला... 
पण म्हणाला की 'ह्या लोगो मध्ये ही दांडी ज़रा जास्त वाटत्ये... 
ती काढून बघ', मी लगेच म्हणालो.. 
अरे हो थांब... असं म्हणत मी कण्ट्रोल झेडचं बटण दाबलं! 
आणि जे नको व्हायला ते झालं....

बैक टु फ़्लैशबैक...

७-८ लोगोज ना पसंत पडल्यावर माझी सटकली, 
मी विचार केला वेळेत निघायचं असेल अणि प्रमाणिक प्रयत्न असफल ठरणार असतील… 
तर गेला उड़त प्रामाणिक पणा.. 
मी थेट लोगो उचलला एका लोगो विकणाऱ्या वेबसाईट वरून...
तो कोरेल-ड्रा मध्ये इम्पोर्ट करून जशाचा तसा पण एक एक्स्ट्रा मॉडिफिकेशन करून ठेवला.. 
ते एक्स्ट्रा मॉडिफिकेशन नेमकं बॉस्स ला खटकलं..
'ह्या लोगो मध्ये ही दांडी ज़रा जास्त वाटत्ये...
ती काढून बघ' अणि तो कण्ट्रोल झेड महागात पडला! 
खरा लोगो दिसला त्याला १०-१२ स्टेप्स मागे गेल्यामुळं! 

तात्पर्य… 
दर शुक्रवारी जसा व्हायचा तसा ह्या शुक्रवारीही मी घाई केली नसती किव्वा  
 केली असती, जी मी केली... उशीर तर होणारच होता... 

अहो कधी कधी तर मी पेपर वाल्याबरोबर पुण्याच्या घरी पोहोचलेलं आठवतंय!
ड्याम फ्रायडे… 
म्हणून आय जस्ट हेट धिस ड्याम फ्रायडे

#साशुश्रीके

Comments

  1. अगदीच सुरेख लिहितोस रे मित्रा..
    तसं बघायला गेलं तर मी तुला पर्सनली ओळ्खत नाही..
    पण तुझ्या 'रूटीन' लिखाणाचा मी फेन झालोय..
    अगदी तुझ्या दुबयित्ल्या घरातील फैन सारखा..
    पुलेशु..
    माझं फेसबुक वर एक मराठी पेज आहे..
    चंपक मराठी म्हणून..सहजच काढलं होतं.. पण आता जवळ जवळ लाखभर लाइक्स आहेत बघ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!