महाग झालय का सगळं!?

।। श्री ।।

११ ऑक्टोबर २०१४ सकाळचे ९.३०

• महाग झालय का सगळं!? •

हो हो महाग झालच आहे!
हॉटेलिंग… ट्रेव्हलिंग… राहाणीमान, आणि मित्र ही! :/

पूर्वी मुंबईत होतो तेव्हा शनिवार / रविवारी पुण्यात आलो…
की सगळ्यांना घाटावर बोलवायचो…
८ पैकी ५ जणं जरी जमले तरी अक्खा आठवडा मस्त जायचा!

सध्या वर्षातून २-३दाच भेटतो!
२-३ आठवडे मी जरी सुट्टीवर असलो तरी ईतरांना काम धंदे असतात,
सर्वांना शनिवारी / रविवारी वेळ मिळतो त्यामुळे,
तेव्हाच भेटतात सगळे…
परत वरच्या प्यारेग्याफ़चं वाक्य कॉप्यी प्येस्ट मारतो!
८ पैकी ५ जणं जरी जमले तरी अक्खा आठवडा (आता अक्खं वर्ष) मस्त जायचा!
अख्खं वर्षाचं .zip वोपन करायला मजा येते!
ओनलाईन किती ही असलो तरी लाइव्ह .zip ला तोड नाय!

खाली एक फोटो टाकतोय… तसा सीन असतो…
कोणालाच जमत नसेल तर,
एकटाच येतो कधी कधी मी घाटावर…
सगळे नवीन चेहऱ्यांत आपले चेहरे शोधतो, चहा मारतो… निघतो!

सांगायचं असं की मी बोलावलं की'च' भेटतात,
ह्याचं 'कन्फेशन' पण होतं!
खरच •महाग झालय सगळं!•

- सशुश्रीके


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!