मला मी पाहिलं

॥ श्री॥


४ ओक्टोबर २०२४
 



दुपारच्या झोपेला टांग देत आज जागी होती अन्वया
७ नंतर तीची विकेट पडायला सुरुवात झाली
अमृता म्हणाली अन्वयाला ज़रा फीरवुन आण
आणि झोपू देऊ नको
अजुन जेवण व्हायचय
सगळ उलटं सुलटं होण्याच्या आत हीला फीरवुन आण

मी निघालो...
सुरुवातीला चालत होती...
मग 23४... (पायऱ्या) 23४ करत करत
अजुन १०मिनिटं चालली
पण मग़ रैंडम बडबडीमधून अचानक
'बाबा पाय दुख्तो'
मी कडेवर घेतलं... १०मिनिटं झाली
ही कड़ेवर सिग्नल पार केले दोन
तीथे सिग्नलची बटणं दाबण्याात टीपी झाला
अखेर ५ मिनिट़ा वर घर आलं
मी म्हणालो "चल चाली चाली करतेस का!?"
अन्वया - "नको नको बाबा, पाय दुखतात... पाय चेप... चेप पाय"
मी जवळ जवळ खाली ठेवणार तीला...
तोच हात वर घेत परत कडेवर घेउन एका हटानी तीचा डावा मधेच उजवा पाय चेपाय्ला लागलो

तीने छान स्माइल देत "बाबा अन्वयाचे पाय चेपतो..."

आता हां प्रसंग काय चवदार किव्वा मसालेदार
किव्वा अजब गजब काही नाहीये

पण ह्यात दडलेला मी आठवला मला

आई अशीच न्यायची... मी आईकडे बघायचो

आज तसच पाहिलं अन्वयानी

बापातल्या आईने पाहीलं

मी पाहिलं

मी अन्वायत मला पाहिलं

मी पाहिलं

मला मी पाहिलं


© सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!