अजूनही स्वप्न पडतं, 'टायटल' असतं… अभ्यास

।। श्री ।।

'अभ्यास'

तो पहिला दिवस शाळेतला
ते आत्ता पर्यंत
आलेख वर- वर- वर - खाली - खाली - खाली
आजून ही स्वप्नं पडतात
पूर्वी गणिताची आणि…
आज,
आजपण गणिताचीच!
.
.

२री पर्यंत म्हणे ९५% वगैरे मिळायचे मला
आणि वागणूक 'बरी'
नंतर जी काही उतरती कळा लागल्ये आयुष्यात
अभ्यासाचा आदर असावा,
पण माझ्या बाबतीत अभ्यासाचा 'आधार' घेऊन,
चित्रकलेच्या भिंतीवर कसाबसा चढलो!
ती 'भिंत' माझ्या शिक्षक / पालकांमुळे मला 'दिसली'
जन्मभर आभारी आहे मी त्यांचा!
.
.

लहानपणी आई सारखी ईतर 'स्कॉलर' मुलांचं नेहमी उदाहरण द्यायची
पण एका बाजूने माझ्या 'बौंड्रीज' तिने ओळखलेल्या
त्यामुळे माझा कल हा अभ्यासात नसून चित्रकलेत आहे हे तिला समजले होते.
सर्व विषयांचे प्रश्न - उत्तरे तिने ध्वनिमुद्रित करून ठेवलेल्या!
रोज सकाळी ४ वाजता उठ आणि ऐक!
तेवढं तरी कर, आणि मी काराय्च्यो,
कधी कधी झोपायचो ही!
.
.

पण माझा अभ्यास करण्याची पद्धत जरा फारच अजीबो-गरीब होती!
पद्धत नव्हतीच ती नेमकं काय म्हणावं तेच कळत नाही!
.
.
उदा. - सकाळी सकाळी मी काही वाचत असेन किव्वा ते ध्वनीमुद्रण ऐकत असेन
तेव्हा परीसारातील भूंकलेला कुत्र्याचा आवाज किव्वा आईने मारलेली हाक
असे आवाज आणि अगदी त्याच वेळी वाचलेला / ऐकलेला तो भाग लक्षात ठेऊन…
प्रश्न - त्याचे उत्तर आठवायचो! आणि परीक्षेत नेहमी असाच पास होत आलो!
अगदी बिजगणीतांच्या 'स्टेप्स' लक्षात रहायच्या नाहीत,
म्हणून अक्खी गणितं लिहून पाठ करायचो,
पण प्रत्यक्ष परीक्षेत एखादा X - Y पुढे मागे असायचा,
त्यामुळे त्या 'स्टेप्स' चे तरी गुण मिळायचे!
नशीब म्हणजे अजून एकदा ही कुठल्याही इयत्तेत…
'नापास' नावाची पदवी नाही मिळवली!!
.
.
दहावीत ५६% मिळवले
त्यात बीजगणित आणि भूमिती मिळून असलेल्या परीक्षेत…
१५० पैकी ५८ मिळवून जो काही आनंद मिळाला!…
पेढे वाटले हो!
खरच,
तेव्हा जर नापास हा ठपका लागला असता तर आज कुठे असतो देवास ठाऊक!
त्याच काळात सकाळ तर्फे झालेल्या स्पर्धांमधून महाराष्ट्रात २रा पुणे विभागात १ला…
असली पारीतोशिकं पटकावून मी कला क्षेत्रात जाणार ह्यावर शिक्कामोर्बत झालेले!
.
.
पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश मिलवायला
६०% + इंटरमिजिएट मध्ये A ग्रेड लागते!
आणि मुंबईच्या JJ मध्ये तर ८०% +  A ग्रेड,
अश्या दोन्ही कला महाविद्यालयाचे द्वार बंद दिसल्यावर
भारती विद्यापीठ ला २५हजारांची 'देणगी' देऊन माझं कला शिक्षण सुरू झाले!
अजून ही त्या २५हजाराचं मनात कर्ज आहे,
परिस्थिती वाईट नसली आमची तरी पैसे घालून प्रवेश मिळवणं,
अजूनही मनाला काही पटत नाही! असो…
.
.
तसा मेडीकल आणि ईतर खर्चिक विषयांपेक्षा
जरा कमी खर्चिक क्षेत्रात होतो त्याचं समाधान,
१ल्या वर्षानंतर मला अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला,
निरनिराळे पेपर्स, रंग, ब्रशेस वगैरे चा खर्च सोडला तर
अभिनवची फी अगदी माफक होती!
दर वर्षीचा 'प्रोजेक्ट' आणि 'असाईन्मेनट्स' ही वेळेत
आणि दर्जा राखून पूर्ण करायचो!
कारण तो 'अभ्यास' वाटायचा नाही! :)
.
.
सुरुवात अभ्यासानी झाली
तरी 'कॅरीयर'चा प्रवास 'अभ्यास' नं करता सुरू झाला
कॉल्लेज करता करता नोकरीही करायचो
.
.
ह्या अभ्यासानी १०वी पर्यंत पीडलं
पण कलेनी अगदी वेळेत जामीन दिल्यानी माझी योग्य वेळी सुटका झाली,
पण अजूनही स्वप्न पडतं,
'टायटल' असतं…
अभ्यास



#सशुश्रीके | १४ ऑक्टोबर २०१४





































Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!