ARE YOU?

आज आमच्या ऑफिस मध्ये हेल्थ चेकप होतं… लहानपणी असं उभं राहिलेलं आठवतंय, शाळेत व्हायचं…

तर गम्मत आज काय झाली… ब्लड चेकिंग च्या इथली मुलगी हातात टाचणी युक्त
काहीतरी छोटसं साधन घेऊन ते एका मशीन मध्ये टाकून शुगर चेक करत होती.
मी लाइन मध्ये होतो, माझ्या आधीच्या माणसाला १४० शुगर डीटेक्ट झाली… मग तिने
समजावलं की जास्त आहे पण अन्शापोटी परत करून पहा, तेव्हा ही इतकच असेल तर
डॉक्टरना नक्की भेटा. तो गंभीर चेहरा करून पुढच्या चेकअप साठी (ब्लड
प्रेशर) पुढे गेला, मी गेलो बोटाला थंड काहीतरी लावलं तीने आणि हे सर्व
करताना विचारलं Are you feelin nervous? मी झटकनी उत्तरलो… ARE YOU? काय
लाजल्ये सुबक ठेंगणी!

मग ते बोट कापसानी पुसलं, आणि टुचूक… १०५
शुगर. ब्लड प्रेशर १२०-८० आणि वजन ७२.६० जे माझ्या उंचीला जरा जास्त आहे
१-२ किलोंनी. उतना चालता है…

असो… हेल्थ चेक-अप झाला. आता पगाराची वाट बघतोय. तो एसएमएस आला कि कसं हलकं हलकं वाटतं!

#सशुश्रीके | २५ मे २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!