आधी लिहायला शीकलो...

॥श्री॥

आत्ताच एक ३ मिनिटांची कविता ऐकली गुलज़ारजींची... विषय होता 'किताबें'... पुस्तकं...
हल्लीच्या कॉम्पुटर युगात पुस्तकांची ओढ कशी कमी होत गेली आहे... पुस्तकांशी कसं नातं असायचं आणि आता काय परिस्थिती आहे वगैरे! सुंदर छान मांडणी... नेहमीप्रमाणे... बाजूलाच जगजीतजी बसलेले... टक लाऊन पहात... मनापासून ऐकताना दीसले! असो...

मग मी विचार केला... नेहमीच करतो म्हणा!
की मी 'असा घडला...सचिन तेंडुलकर' आणि  ए.आर.रेहमान 'द म्यूजिकल स्टॉर्म' ही २पुस्तकं सोडली तर कुठलीच पुस्तकं वाचली नाहयेत! मुळातच नाही आवडत वाचायला... आणि हे कळल्यावर लोकांना आश्चर्य वाटतं... "अरे तू इतकं छान काय काय लिहीत असतोस (त्यांचं म्हणण आहे हे मनाला लाऊन घेऊ नका) आणि म्हणतोस तुला वाचायला आवडत नाही!" मग मी हल्ली खरं ते सांगतो... म्हणतो आहो मी स्वतःच काय लिहिले आहे ते पण वाचत नाही... पण हल्ली -पालहाल- सांभाळायला वाचतो एकदा तरी!

मुंबईत असे पर्यन्त पेपर पर्यंतच मजल होती माझी... ते पण आधी मागचं पान... क्रीडा-क्रिकेट, डायरैक्ट मधलं पान नाटक-सिनेमे... आणि मग शेवटी मुख्य पान... हे इतकेच आमचे शब्दांना दान!

आता मात्र वाचतो... हौशी... काही 'प्रो' मित्रांनी लिहिलेले मूवी-रिव्युज, कविता, लेख... त्यांचे विविध अनुभव... सुंदर मांडणी... कल्पक... लघुकथा... मस्त मजा येते वाचायला...
----------------------------------
लोग कहते है जो पढा वही आगे बढा...
पर हजूर... पीछे मुड के देखें तो ज़रा
जिसने लिखा उसी को तो आपने पढा!
-----------------------------------
सांगायचा मुद्दा असा की...
आधी लिहायला शीकलो... मग वाचायला...
वाचायला शिकलो जरी असलो तरी मनापासून वाचीनच असे नाही पण लिहायची मजा काय औरच! हल्ली एकच प्रार्थना असते अधुन मधून... की ही जी काही मनापासून लिहिण्याची इच्छा आहे... ती शेवटच्या श्वासपर्यंत टीको.

#सशुश्रीके । १३ मे २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!