झागदार!

साबण हा माझा शारीरिक स्वच्छता व्यक्त करणारा झाग आहे आणि तो मी करणाराच! 

आज पर्यंत अनेक साबण वापरले पण मोती साबण! दिवाळीत घेऊन जातो, तो गोल गुळगुळीत, अंघोळ करताना १०वेळा हातातून सटकणारा, ५व्या ६व्या दिवशी तोच साबण दुसऱ्या साबणाच्या अंगाशी एकरूप होऊन 2इन1 अनुभव! 

नंतर आठवण ती पीयर्स साबण, 
घरी कोणी लहान मुल असेल तर हमखास पीयर्स साबण सापडतोच घरी, मग ती जाहिरात आठवते, एक लहान मुलगी एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्या समोर तो साबण ठेऊन आइला बोलावते! हा साबण भसाभसा संपटो, हतातून सटकायचे प्रमाण इतर कुठल्याही साबणापेक्षा अतीउच्च!

मग आठवतो नीमा रोज - नीमा रोज, 
हा साबण आयुष्यात कधी कोणाच्या घरी किंवा कुठेच् पाहिलेला नाही! अगदी वाण्याकडे की नाही, प
ण जाहीरातीचा भडीमार आसायचा एकेकाळी!

मला खुप आवडायचा तो 'हमाम'
इतर सबणांना समाजा ३दा घासून जो फेस/झाग येईल तो ह्याला नुसता बघुनच येईल इतका झागदार! 
आक्षीला विहीरीवर जेव्हा अंघोळ करायचो तेव्हा इतका झागमय व्हायचो की कोण अंघोळ करतय ओळखता येणार नाही, हीममानाव टाइप पांढरा झाग आंगभर... आणि त्या झागाचा जड पाण्यामुळे 'साका' उरायचा!

मग आठवतो 'लाएफब्वाय'
संडासा साठी वापरला जाणारा नेशनल साबण म्हणजे 'लाएफब्वाय'! 
तो ना धड लाल ना धड गुलाबी, चौकोनी वीटच चायला! 
तो चुकून वगैरे पडायचा तेव्हा उडी मारून परत हातात येईल की काय असं वाटायचं!

अजुन एक दगड साबण म्हणजे 'मार्गो!' हीरवा विलेन वाटायचा, 
चुकून तोंडात गेला तर कडु साला! 
नरक चथुर्दशी च्या दीवशी ह्यानी अंघोळ करावी, अगदी २इन१ अनुभव!

'लक्स' तर काय... सौंदर्य असो नसो, लक्स देता है बोलीवुड का झाग! पूर्वी पिंक लक्स, आता त्यात काय काय प्रकार आलेत, भारतात सर्वात जास्त खप असेल लक्सचा, नो डाउट! पाण्याची बिस्लरी द्या तसा प्रकार आहे हा लक्स इतका फेमस आहे की साबण द्या म्हणाले की पूर्वी वाणी लक्स द्यायचे किंवा पाठवायचे!

गोदरेजचा 'सिंथोल' एक मस्त होता राव, लेमन वाला माझा फेवरेट! त्याच्याच भाऊ 'लिरिल'... 
बहिण म्हणालात तरी चालेल! प्रीती झिंटा आठवायची अंघोळ करताना... 
लाला ला लाSSS... मजा! गुदगुल्याच, लिमका वगैरेनी अंघोळ केल्या सारखं फीलिंग यायचं!

हे काही साबण सोडले तर बाकी काही जवळीक साधता आली नाही इतर कुठल्याही साबणाशी!
हो, पण एक साबण विसरलोच, होटेल मध्ये असतात ते मिनी साबण! बहुतेक पांढरे, इतके छोटे की खिशात मावतात, मग त्याच खिश्यातुन घरी ही येतात! 

अब तक ५६, पर याद रहे सिर्फ मोती से लेकर सिंथोल तक...
लक्स से लेकर पीयर्स तक! 

#सशुश्रीके | २९ मे २०१५













Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!