Posts

अमृता समीर केतकर.

  ॥श्री॥ उद्या वैलेंटाइन डे म्हणे! 😂 मला काय, आम्हाला...दोघांना कौतुक नाही, असे डे वगैरे मध्ये!  पण लेख लिहितोय अमृतावर असं सम्याला (मित्राला) सांगीतलं तेव्हा तो म्हणाला, वाह वेलेंटाइन निमित्त सप्रेम भेट की काय, तेव्हा त्याला म्हणालो! कावळा बसायला न फांदी तुटायला, म्हण जरी चुकीची असली तरी काय झालं, भापो झाला की आलं त्यात सगळं! ☺ असो... आता मुद्द्यावर येतो!  सौ. अमृता समीर केतकर. हे आत्ताचं नाव... सात फेरों के पहले का नाम बोले तो... कु. अमृता अविनाश गोगटे. गोरी पान, सडपात्तळ बांधा... (आत्ता नाही) 😝 अगदी छान नाटकात सुंदर मुलीचा अभिनय करणाऱ्या पात्रा सारखी! 😍 जवळून फार कमी पाहिली, एकूणच मुलींच्या पासून लांब... त्यामुळे लांबुनच प्रेम वर्षाव करायचो, त्यात आमोद ज्याला आम्ही 'गोट्या' सगळे म्हणायचो तो तीचा चुलत भाऊ माझा क्लास मेट, त्यामुळे जरा अजुनच लांब. हमारा बजाजच्या स्पिरिटवर यायची... १दीवस तीची स्पिरिट मग १दीवस सुरश्रीची (तीची क्लासमेट) असं काहीतरी गणित होतं, त्यांचा ४-५ जणींचा ग्रुप होता, अमृता मला आवडते... हे जवळपास सगळ्यांना माहीत होतं, अमोदला सोडून! नंतर कळालं त्याला,...
Image
 ३१ डिसेंम्बर संपला, नाही नाही संपवला 🤣 वाट बघत होतो कधी एकदा १२ वाजतायत न झोपतोय Fire works वगैरे झाले पाहून , घरी आलो, बेड वर आडवा झालो... पण कसलं काय, च्यायला झोपच लागेना, मग छानसं एक लेटरिंग केलं ते इंस्टा वर रीळ स्वरूपात अपलोड केलं ग आता यापुढं काय, झोपेचं खोबरं झालेलं मग एकच पर्याय रात्री २वाजता दुबई हिंडायला निघालो, बीच वर जायचा प्लॅन होता सकाळचा सूर्य पाहायचं ठरलं पण कसलं काय गाडी हळूच दुबई हार्बर कडे वळवली, तिथे मस्त गाडया वगैरे दिसतात, आणि अडकलो मस्त ट्रॅफिक मध्ये, २तास तिथेच! मग लागली शु, पाण्याची कमतरता नको म्हणून एक fanta आणि sparkling water घेतलेली संपली, शु ची तीव्रता इतकी वाढली की च्युविंग गम चावून चावून जबडा दुखायला लागला! शेवटी दुबई हार्बर सर्विस लेन मध्ये एक पार्किंग मिळाले, तिथे तडीक पार्क करून मेन बिल्डिंग मध्ये घुसलो! आलिशान परिसर, तुरळक बेधुंद पब्लिक आणि काही सेक्युरिटी गार्डस असा तो माहोल! तरातरा चालणारा मी सेक्युरिटी गार्ड दिसल्यावर लग्गेच मंदावलो, अदब पणे विचारलं की बाबा वॉशरूम कुठाय, आधीच अंधार त्यात तो कृष्ण वर्णीय आफ्रिकन, त्याचे फक्त दात दिसले आणि कान...
"कोई कारण होगा!" काल शनिवार, रविवारी सकाळी उठायची गडबड नाही म्हणून मित्र आलेला बिल्डिंग खाली भेटायला, गप्पा गोष्टी करण्यात साडेबारा कधी वाजले कळलं नाही! तितक्यात समोर नवीन दुकान उघडलेले दिसले, मी मित्राला म्हणालो चल जाऊन बघू कसे आहे वगैरे! आत घुसलो न काही गोष्टी घेऊन बिलिंग काउंटर पाशी आलो तर ६/७जण रांगेत उभी.. वळून बघितलं तर मित्र एका स्टाफ ला म्हणाला की २काउंटर आहेत, एक चालू करा रात्रीचे १२:३०झालेत पण गर्दी बघा... हे ऐकत तो स्टाफ हातातले काम।अर्धवट सोडून काउंटर पाशी आला आणि मशीन सुरू केले, मी बेल्ट वर गोष्टी ठेवत असताना मित्रा त्याला म्हणाला... "thank you... आपले जैसे और लोग चाहीये यहा पे... क्यू!?" हे ऐकल्यावर त्या मित्राकडे मिश्किल हसत तो शांत पणे म्हणाला "no sir, i don't want more people to suffer like me!" ऐकून मी तर थंडच पडलो! इतक्या गर्दीत सगळे आवाज बंद होऊन भयाण शांतता जाणवली... पुढे काही नाही गपचूप बिलाचे पैसे देत गेलो दोघे घरी. आता लिहिताना एक भजनाची ओळ आठवली " एक झोली मै फुल खिले है एक झोळी मे कांटे रे कोई कारण होगा......
Image
  पुण्यनगरीतला सशुश्रीके 'वैचारिक किडा' नावाचा चॅनेल आहे त्यात पुणे विषयावर मिलिंद शिंत्रेची मुलखात ऐकत ऐकत हा लेख लिहीत आहे ☺️ पुण्यात ९०साली आलो अगदी कायमचा...२००७पर्यंत टिकलो! टिकलो म्हणजे जरा अतीच झालं माफी... अनुभवलं 👌👌👌 काय ती मस्त थंडी, तो कडक उन्हाळा न तो आगाऊ पावसाळा! ते छोटे रस्ते, ते म्हातारे रोज सकाळी भटकणारे मोठे भिंगयुक्त चष्मे लावलेले, ते पेपरवाले सायकलवीर अचूक ठिकाणी अचूक पेपर पोचवणारे, अप्पा बळवंत चौकात गर्दी करणारे, सारसबागेत १-४निवांत पडणारे, लुना न कायनेटिक नी रस्ता गाजवणारे! किती ही जवळचे गिर्हाईक असले तरी नाही न म्हणणारे... असे पुणे मी पाहिलेलं आहे, छोटे वाडे मोठे वाडे पडलेले टाकलेले टिकलेले सगळे... प्रत्येक वास्तूत ओलावा न आता झालेला दुरावा... जन्म दोहा बालपण आक्षी मुंबई आता कर्मभूमी दुबई पण जे काय पुणे आलेलं मुंबई आणि दुबई च्या मध्ये! त्याने मला घडवलं... त्या डझनभर पेठांमधूनच मला माझा पहिला पगार मिळाला, सकाळ सारख्या अस्सल पुणेरी वर्तमानपत्राने मला माझा दुसरा job दिला! काय दिलं पेक्षा आपण काय घेतलं ह्याला महत्व! पुण्याने मला तत्व दिलं, पुण्य...

ते तीन बांबू

Image
काय मस्त होते ते लांब लचक भुंग्यांनी प्रेम केलेले उन्हात वाळलेले रात्री पहारा देणारे आमच्या अक्षीच्या फाटकाची भूमिका बजावणारे त्यावर बसून कित्येक आंबे खाल्लेत माझी मूर्ती होती इतकी लहान सहज दोघांच्या मधून जायचो पलीकडे रास्ता काळा कधी वितळलेला कधी ओला सदैव माझी वाट पाहणारा तेव्हाच्या अनवाणी आठवणी  अजून ही आहेत ओल्या आहे एक फोटो अजून ही बाबांनी काढलेला बघतो अधून मधून  चाळता अल्बम दिसतो मी मला आठवणींतला असतील कुठे आता ते ते तीन बांबू! #सशुश्रीके १२ जून २०२२

आजी आजोबा आणि मी...

काय पुण्य केलं आहे मी मागच्या जन्मी काय माहीत... दोन्ही बाजूंच्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं, खूप छळलो त्यांना आणि त्यांनी तितकेच लाड करून परतफेड केली 😊 'आण्णा' बाबांचे वडील, आण्णा म्हणायचे सगळे त्यांना, एक दिवस खूप ठसका खोकला आला, पुढचं आठवत आहे मी थेट माझ्या शेजाऱ्यांकडे होतो, परत घरी आलेलो तेव्हा अण्णांच्या नाकात कापूस आणि ओठांवर तुळशीचे पान होते, आणि मला त्यांना प्रदक्षिणा घालायला लावलेली. त्या दिवसाआधी यांबरोबर रोज मंदिरात जायचो, त्यांच्या मित्रांबरोबर खेळायचो, त्यांच्या मांडीवर जणू सिंहासनावर बसल्या सारखं वाटायचं, पेपर रेडिओ टीव्ही पाहात असताना माझा व्यत्यय नेहमीचा होता त्यांना, पण हसतमुख चेहरा, हे सगळं मला आठवत आहे, मी बालवाडीत वगैरे असून आठवत आहे म्हणजे खरच कमाल आहे! तरी कधीतरी हावरट पणा म्हणून काही किस्से आठवतात का हा प्रयत्न चालू असतो. पण शेवटी माणूसच आहे, असं इतकं कसं आठवेल!  आठवलं की लगेच लिहायचं... पुन्हा आठवेल का? का नाही...ह्या भीतीने का होईना! जास्त किस्से आठवतात ते आईच्या वडिलांचे,  'आप्पा' आप्पा म्हणायचो सगळे त्यांना... भयंकर कडक स्वभाव. उठ म्हंटलं की ...

एक मोठा शेवटचा दिवस!

एक मोठा दिवस शेवटचा दिवस! दुसऱ्या दिवशी दुबईला जायची गडबड उरलेली २ महत्वाची कामे ... होतो कोथरूडला आणि २ पर्याय होते. एक काम होतं पौड रोड वर आणि एक पेठेत! पेठेत ६ नंतर म्हणजे महाभयंकर ट्रॅफिक, त्यात तिळक रोड वर जायचं होतं, काम होतं मित्रासाठी तबला हातोडी विकत घेणे आणि दुसरं काम होतं मिलिंद देशपांडे नावाच्या कॉलेज वर्गमित्राला भेटून त्याकडून त्याने केलेले संस्कृत भाषेतले खेळायचे पत्ते घेणे, (संस्कृत भाषेत पत्ते म्हणजे एक वेगळेपण आहेच पण त्याने केलेले त्यावरचे काम पण खास! लिंक शेर करीन कामाची त्याची लेखाच्या शेवटी) तर ह्या २ कामांपैकी १च काम होणे शक्य होते, मी सजीव माणसाचा विचार केला .. निर्जीव हातोडी घेण्यापेक्षा सजीव माणसाला भेटून त्याला/त्याच्या कलेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.  त्याने पाठवलेला मॅप चालू केला, १-२ दा डियो (दू-चाकी वाहन) थांबून मॅप पाहिलाही... एके ठिकाणी शेवटचे मुख्य वळण आले आहे का हे पाहायला डावा हात खिशात घातला, मोबाईल हातात घेतला, वळण अगदी समोरच पण सिग्नल पण, त्यात समोरची तीन चाकी मालवाहतूक रिक्षा थांबली! मी ही त्याच प्रयत्नात, पण मेट्रोचे काम चालू असलेल्या...

अनोळखी ओळख

खुप वर्षे झाली आज लिहीन नंतर लिहीन असं म्हणता म्हणता आज योग आला लिहायचा हे... अनोळखी ओळख बोरिवलीच्या 'श्री गणेश' बिल्डिंग मधला तळ मजला, बंद घर... काचा फुटलेल्या, त्या घरा समोर खेळायचो आम्ही मुलं, चेंडू जायचा आत एका घरात, कित्येकदा तो गेलेला चेंडू मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, ते प्रयत्न करत करत आत डोकावायचो... पूर्वी दरवाज्याच्या वर एक आडवी खिडकी असायची त्यातून की कुठून तरी आठवत नाही पण आत शिरलेलो, प्रचंड धूळ जळमटे वगैरेंनी श्रीमंत झालेलं ते घर!  मालक आर्किटेक्ट किंवा तसल्याच काही क्षेत्रात असावा. सुबक टुंबदार (फोम बोर्ड / थर्माकोलचे) बंगले आठवतात! आजूबाजूला छान छोटी छोटी झाडे, पार्किंग मध्ये गाडी...  आणि चेंडू हातात... बाहेर मित्र वाट बघतायत न मी त्या छोट्या बंगल्यांकडे बघत बसायचो. कोणालाही सांगितलं नाही की मी काय पाहायचो आत, आत चेंडू जायची वाट बघायचो! गेला की मी जाणार आत हे ठरलेलं. नंतर कळलं की मालक अमेरिकेत वगैरे असतो, फ्लॅट आहे पडूनच. नंतर आम्ही मुंबई सोडलं, आता ह्या गोष्टीला २९/३० वर्ष होतील. ते घर आहे तसेच राहीलं आहे मनात, ती धूळ बंगल्यावरची... काय कडक फिनिश! तो जो काय मा...

वाट बघा

वाट बघा... सकाळी अलार्मची अलार्म नंतर पाण्याची मग सुरूच दूध वाल्याची पेपर वल्याची नाश्त्याची चहा/कॉफीची गरम पाण्याची गरम इस्त्रीची रिक्षाची बसची ट्रेनची त्या मिळाल्या की नीट उभं / बसायला मिळायची स्टेशनसच्या स्टेशनची लिफ्टची लंच टाईमची वरकिंग अवर्स संपण्याची परत उलटा प्रवास.. अशी वाट बघत बघत ५/६दिवस संपायचे मग लगेच वाट... वीकेंडची! आज नो वाट जस्ट थाट! जस्ट रिलॅक्स... सगळं कसं आरामात असा तो १ दिवस कोणाचे तर २! त्या १/२ दिवसासाठी अख्खा आठवडा बघायला लागायची वाट अशोक मामाने तसेही म्हंटलच आहे बनवाबनवीत म्हणजे काय... वाट बघा! अश्या वेगवेगळ्या वाटा येत जात असतात! त्याशिवाय काय आहे म्हणा! वाट बघण्याशिवाय हातात काय असतं म्हणा? बघतो आता वाट कंमेटची न लाईक्स ची 😂 दुसरं काय हातात आसतं म्हणा! हा एक फोन सोडलं तर तुमच्या हातात ही काहीच नाहीये! 😆 #सशुश्रीके २०२०/०२/१०

राम आणि श्याम दोन साबण असतात...

 राम आणि श्याम दोन साबण असतात माझ्या न्हाणीघरात, एक आवडता एक नावडता, दोन्ही असतातच, एक संपायला लागला की त्याच्या पाठीवर दुसरा अगदी *विक्रम वेताळ* टाईप्स... हे लिहायचं विशेष कारण म्हणजे आज हे दोघे संपले! पहिल्यांदाच वेळ आली ही माझ्या ३८ वर्षांच्या स्वच्छ चकचकीत कारकिर्दीत!!! ब्रेक मिळतो दोघांना जेव्हा दिवाळी येते मोती किंवा म्हैसूर नावाचा आडदांड भाऊ येऊन त्यांना आराम देतो... पण ह्यावेळी हे दोघे माझ्या आळशीपणा मुळे शहीद झाले! हातात घेताच काही क्षणातच ह्या निष्ठुर जगात गायब आता नवीन साबण येणार उद्या न्हाणीघरात... नवीन दिवस नवीन सगळं... नवीन राम नवीन श्याम ची वाट बघणार आणि मग दोघे नवीन रामची! स्वच्छ राम-श्याम भक्त #सशुश्रीके 🤣

जुनं ते सोनं

आक्षी बद्दल किलोभर लिहून झालंय... काही सोडलं असेन असं वाटत नाही, पण तरी इतका जीव अडकलाय तिथं काय विचारायची सोय नाही, असं वाटतं एक पेरेलल जग असावं तिथं आपलं, म्हणजे कसं पटकन डोकावता यावं कधी ही कुठून ही.. अशी एक खिडकी नाहीतर दरवाजा. घरी कधी नावडती भाजी किंवा काही खास मेनू नसेल की लगेच त्या दरवाज्यातून हळूच आत जायचं की वर्तमान बंद न भूतकाळ सुरू... आजी मला बघणार... हसणार! "आली का माझी आठवण, आज काय करू... पानगी की दडपे पोहे!?"मी मला बघणार... डोळ्यात माझ्या असली चमक जणू आजी नाही कुठला तरी तारा बघतोय!!!   आजी... आजी काय सुंदर होती माझी आजी काय सांगू, किती सांगू! आई शप्पत सुंदर होती, अतीशयोक्ती नाहीच... ती बोलत नसली तर तिच्या बांगड्या बोलत असायच्या, विळीवर भाजी चिरताना... अंगणात शेण सारवताना... म्हशीला पेंढा घालताना... अखंड बांगड्यांचा आवाज... 'अगदी सराऊंड साउंड / डॉल्बी डिजिटल' कधी पुढून कधी बाजूने! त्या बांगड्या कधी थांबलेल्या आठवत नाहीच. अशी ही ऑडिओ स्वरूपातली चरचरीत आठवण झोपेचा अलगद गोड खून करते. हे आठवण प्रकरण, स्पेशली आजी आणि आक्षी... हे वाईट्ट कॉम्बिनेशन आ...

'टर्म्स अँड कंडीशन्स अप्लाय!'

मुंबईत होतो तेव्हा लोकल मधून प्रवास करायचो तेव्हा चाळी /इमारती दिसायच्या... त्यांच्या खिडक्यांमधून पंखे दिसायचे... काही श्रीमंत काही गरीब  प्रत्येक खिडकी वेगळी वेगळं सगळं काही सेकंद दुसऱ्या घरात डोळे अडकायचे, काय असेल त्यांचं जग ह्याचा विचार काही सेकंद स्वतःच्या जगाचा विचार बाजूला ठवून असं दुसऱ्यांच्या जगात डोकवायचं मला कधी कधी वाटतं की असं सहज शक्य असतं विचार करणं तसं दुसऱ्या माणसात आपण जाऊन कसं वाटेल!? म्हणजे दुसरा आपल्यात त्याच्यात आपण! दृष्टिकोन सोडा... थेट आत्मा चेंज... धिस इज बीयोंड सायन्स आय नो...  काय होईल असं झालं तर!? अजब ना... रिक्षा वाला... चहा वाला पासून थेट तेंडुलकर अंबानी वगैरे एक्सपेरिअन्स डिजाईन / प्रोडक्ट.. व्ही आर वगैरे हे सगळे बेसिक प्रकार... प्रायव्हसी इज इशू! पण करा ना असा विचार विचार करायला नो बौन्ड्रीज थिंक वाईल्ड... जग मोठं आहे... आपलं मनाचं जग छोटं आहे!  आत्ता ठरवलं तर तुम्ही तुमच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यात जाऊ शकता... हे भारी आहे! हवं युरेका पेक्षा मोठं आहे! #सशुश्रीके ला वेड लागलं आहे का वगैरे असा विचार होऊ शकेल हे वाचून, पण आत्माला परिसीमा ...

पांघरूण

भयंकर झोप येत असते, हा देह त्या पलंगावर स्वतः ला खिंडीत ढकलून दिल्या सारखा कोसळतो... आणि महा भयंकर कंटाळा येतो ते पांघरूण घ्यायला... नीट घडी करून पायाखाली असलेले! कोण देणार का ते पांघरूण अंगावर...  आता झोप आणि माझ्यात कटुता निर्माण व्हायला सुरुवात ते पाय मध्यस्थी करू पाहतात, पण ते हात थोडीच आहेत, हातांचा न्यूनगंड न मनाचा आळशीपणा तसाच! पाय मात्र लढा देणे सोडत नाहीत, अर्धी खिंड जिंकली... घुडघ्यापर्यंत पांघरूण येतं!  १० मिनिटांच्या ह्या ओढाताणीत झोपेचा खून होतो... पुढचे १/२ तास पांघरूण अंगावर असून ही निद्रा नाराज महोत्सव चालू असतो! शेवटी नकळत कधीतरी निद्रा देवता प्रसन्न होते!  सकाळी जाग येते तेव्हा पुन्हा त्याच पांघरुणाचे ऋण पलंगाखाली धारातीर्थी झालेले असते! ह्या पांघरुणाला कोणीतरी अक्कल द्या रे... तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं, पण ह्या विषयात कोणी काहीच केलं नाही अजून ही!  निषेध निषेध निषेध समस्त झोपमोडी संघटना सदस्य #सशुश्रीके ह्यांच्याकडून बेअक्कल पांघरूण समाजाचा त्रिवार निषेध

कौतुक

Image
  कोणाचं तरी #कौतुक करताना कधी कधी इतकं भरून येतं.. शब्द अपुरे पडतात! काय सांगू.. किती सांगू? सहज सुंदर असतं सगळं तेव्हा... भावना सांडतात कधी मृदू कधी भसकन म्हणजे... कौतुक करताय तुम्ही, मनापासून करताय! ह्यातच आलं की सगळं! कौतुक भारीच असतं करून बघा... म्हणजे मनापासून असेल तरच बरं का! #कौतुकअसेही! #सशुश्रीके
Image
आज सायकल चालवताना फूटपाथ वर एक किचेन मिळाली.. #Lego ची - शार्क माश्याची किचेन! . . मागच्या वर्षी पार्कात चालतांना एक खेळण्यातली टॅक्सी मिळाली ती पण मरसिडीज! . . दोन्ही गोष्टी माझ्या प्रचंड आवडीच्या, म्हणजे स्केलमॉडेल गाड्या आणि लेगोचे मिनी फिगर्स. . . त्यात मर्सेडिज ची टॅक्सी आणि लेगो मधला मिनिफिगर शार्क! दोन्ही दुर्मिळच, अगदी ऑनलाईन ही आऊट-ऑफ-स्टॉक वाला प्रकार असो आपल्याला कशाची ओढ आसेल तर तुमच्या कडे ती गोष्ट येते कधी ना कधी, कधी लगेच कधी उशीरा पण येतच! . . तर आज हे असं झालं, खुश होतो मनातून, घरी आल्या आल्या सांगितलं अमृताला "काय मिळालं बघ!"   तर तिने तोंड वाकडे करून सांगितलं... "आता ज्याने ती कीचॆन पाडली असेल तो शोधायला गेला त्याच फूटपाथ वर तर त्याला मिळणार नाही ती!" मग मला राग आला... पण अमृता म्हणाली ते ही चुकीचे नाही ते जाणवले! पण काय आता उशीर झालाय... परत सायकल चालवत तिथे जायचा उत्साह नाही माझ्यात असो . . अजून एक सांगावस वाटत ते असं की, ज्या वस्तूची तुम्ही काळजी घेत नाही किंवा लक्ष देत नाही ती गोष्ट 'गायब / हरवू' ही शकते . . जसं माझं ड्रायविंग लायसन्स...

लॉकडाऊन २०२०

लॉकडाउन सुरू आहे, बाहेर पडता येत नाही मुलांना... घरी किती खेळणार!? पण एक असाही फायदा माझी पोर, अन्वया म्हणते... एम लविंग धीस फॅमिली टूगेदरनेस, बिग हग्स... उनो गेम्स, कार्ड्स... पिलो फाईट्स!  पण... आय हेट वर्चुअल / ऑनलाइन स्कूल, पण माझा स्क्रीन टाइम वाया जातो  पासून... "बाबा फोन कडे बघ" स्क्रीन लॉक उघडायला की नेटफ्लिक्स सुरू... आवडते कार्टून / शोज पाहायला मोकळी! आई रोज नवीन नवीन पदार्थ करत्ये... आज काय पास्ता उद्या काय केक! हे सगळं चालू असताना घरी गंभीर करोना विषय पण मग लगेच "आय हेट धिस करोना, कधी संपणार हे!?" मग विचार येतो..  हे संपेल नक्कीच कधीना कधी, पण गार्डन मध्ये खेळणारी मुलं, सगळ्यांच्या तोंडावर मास्क्स असणार! अंतर ठेवून खेळणार की काय मुलं आता... होच मुळी... निदान पुढे १ दीड वर्ष तरी हे सगळं नॉर्मल असणार! ह्या 'निगेटिव्ह' मधून पण 'पोझीटीव्ह' वेचून काढणं चालू आहे गेले दीड महिने आणि अजून किती महिने जाणारेत असे माहीत नाही. आपलं ठीक आहे हो, लहान मुले, वयस्कर नागरिकांची मनस्थिती बद्दल विचार केला की मन जड होतं. आणि... पोलीस, डॉक्टर्स, डिलिव्हरी बॉइज,...

खेळ आठवणींचा!

आठवणी नेहमी मागे असतात  मी नेमका उलटा, आठवणींच्या मागे मी असतो    एखाद्या प्रसंगी कुणाची ना कुणाची आठवण येतेच म्हणजे आता नसलेली व्यक्ती,  आजी आजोबा बाबा काही जुने मित्र  मग ते सल्ले ही देतात  'रिऍक्ट'ही होतात  आठवणींत असलेलले हावभाव, त्यांचे संवाद  तो साऊंडबोर्ड वाजतो तडीक जाम मजा वाटते! उदाहणार्थ... मॅच चालू असेल शेवटच्या टप्प्यातली  काही कमी बॉल्स मध्ये अशक्य वाटणारी धावसंख्या असेल  तर नेहमी बाबांची आठवण येते,  ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आशा ठेऊन असायचे.  असे अनेक परत परत घडणारे प्रसंग येतात आयुष्यात  त्या त्या क्षणी तो तो माणूस येऊन डोकवून जातो  #सशुश्रीके 

नशीबवान मी...

काही वर्षांपूर्वी आक्षीला गेलेलो, जुनं घर पहायची इतकी सवय होती... त्याच ठिकाणी आता आलिशान बंगला दिसला, पूर्ण नव्हता झाला, पण शेवटच्या टप्प्यात, मी गाडीतून उतरलो... कामगार येत जात होते, मी जणू काही मालकच असा शिरलो जागेत, बंगल्याच्या उजव्या बाजूने मागच्या बाजूला गेलो. आनंद आणि दुःखाचे असे काही तरी विचित्र कॉम्बिनेशन मनात खेळ करू लागले, जुन्या घरावरची कौलं, लोखंडी मोरपिशी रंगाचे खिडकितले गंज, काही लाकडं... थोडक्यात भंगारा साठी जमवलेल्या पण माझ्यासाठी असलेल्या लहानपणापासूनच्या आठवणी अश्या जमिनीवर एकावर एक रचलेल्या! डोळ्याचा कैक मेगापिक्सेल असलेला कॅमेरा मॅक्सिमम लेवल च्या अँगल मधून पॅन करत करत विहिरीपाशी आलो, दगडी आणि जेमतेम फूटभर उंची असलेल्या गोल कठड्यावर आता ३फुटी गोल भिंत पण आली होती! रहाट मात्र ठेवलेला आहे तसा होता... नशीबच त्याचं! असो, आनंद ह्याचा की अश्या अवस्थेत का होईना निदान त्या आठवणी त्या दिवशी पाहायला मिळाल्या, दुःख ह्याचं की त्या कायमच्या जाणार कुठेतरी. वस्तू काय, वास्तू काय... जीव असतो त्यांच्यात! म्हंटल तर निर्जीव, पटलं तर सजीव! आणि नाशिवंत, म्हणजेच अंत आहेच प्रत्य...

भयाण Corona

काय ना... २०२० वर्ष असलं उलथापालथ करणारं असेल असं वाटलं नव्हतं... वर्षाचा ३राच महिना! वर्क फ्रॉम होम करून ११ दिवस होतील आज, फक्त २दा बाहेर पडलो आहे ह्या दिवसात, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मनुष्य मनुष्याला इतका घाबरायला लागेल!  १० काय १०मिनिटे जरी एकटा असलो की कसं तरी व्हायचं, चुकल्या चुकल्या सारखं, आता सवय होत चालली आहे!  किती वाईट ना, जग बदललं काही महिन्यांत, आता आपण बदलत आहोत, घरी रहा... सुरक्षित रहा च्या नावाखाली सगळे स्वखुशीने काही नाईलाजाने दबले गेले आहेत. वर्क फ्रॉम होम आहेच पण ज्यांना शक्य नाहीत त्यांचे हाल, घरी बसून ज्यांना पगार हा पर्याय नाहीये त्यांचे! सकाळी संध्याकाळी त्यांसाठी प्रार्थना करतोय, निदान एवढं तरी नक्कीच करू शकतोय, ज्या संस्था अश्या लोकांना मदत करत आहेत त्याचे शतशः आभार. उगाच / अत्यावश्यक कारण नसताना लोकं बाहेर पडतायत त्यांना हे कळत नाहीये की ते ह्या विषाणूच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संपर्कात त्यांचे मित्र / नातेवाईक... अहो ते सोडा पत्नी-मुले ही येऊ शकतात आणि पुढे सांगायची गरज नाही, सगळ्यात वाईट गोष्ट अशी की लक्षणे उशीरा कळतात आणि तो पर्यंत उशीर ...

Lockdown!

ह्या Lockdown मुळे नक्की काय होतंय कळत नाही, घराबाहेर पडायला उत्सुकता आणि कुतुहलता आहे पण हिम्मत नाही, घरात बसून काम होतंय, family togetherness का काय ते असतय ते होतंय पण तरी हुरहूर बाहेर न पडता येत ह्याची, अगदी "कससच होतंय" असं म्हणतात तसं काही तरी होतंय का काय कळायला मार्ग नाही . रुग्ण वाढत आहेत, मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा 'मारणाऱ्यांची संख्या' - ह्यांच काय करावं कळत नाहिये! बँक कर्मचारी, डॉकटर, नर्सेस... झालच तर डिलिव्हरी देणारे, बिचारे... त्यांना पण असतील की पोरं बाळं, जे लोकं इथून तिथे गेले ह्या काळात ते अडकलेत! काही तर देशाबाहेर अडकलेत!!! असला सगळा विचार येतो रोज... हातात मोबाइल, डोळ्यासमोर टीव्ही, ढुंगणाखाली सोफा, वेळेवर चहा जेवण, ऑफिस मधल्या नकोत्या लोकांचे चेहरे दिसत नाहीत, सगळं कसं स्वप्नातलं घडत असताना... 'सगळं ठीक आहे पण सगळं ठीक नाहीये' असं काहीसं जीवन झालंय!  नजर लागलीय बघा जगाला आपलीच!  त्यात एक नावीन युक्तिवाद का काय ते हेतोय, Nature is taking his revenge! प्रदूषण कमी कमी होत चालले आहे वगैरे, प्राणी रस्त्यावर आणि आपण गुहेत!  आनं...