Posts

Showing posts from 2016

आठवणींचं जग

आठवणींचं जग कसं वेगळं असतं, बंधनं नसतात, नसतात नियम! कुठे ही जा, केव्हा ही जा... पण काय आहे ना... सगळं 'स्क्रीपटेड' असतं, माहीत असतं काय होणार! कसं, केव्हा, कधी.. सगळं. काहीच बदलता येत नाही... तरी आठवणींत रमायला जास्त आवडतं, कितीही 'स्क्रीपटेड' असलं तरी शेवटी, 'ओरिजिनल' ते 'ओरिजिनल'च असतं. तुमच्या आमच्या सगळ्यांचं, आठवणींचं जग कसं वेगळच असतं! #सशुश्रीके । १४ डिसेंम्बर २०१६

वाट

वाट पाहणे संपत नाही... जागा बदलतात माणसं बदलतात स्वप्न बदलतात वय वाढतं अपेक्षा वाढतात वाढतात नाती वाट पहायची सवय लागते वाट सोडण्याची गरज वाटते वाट दाखवण्याचे धाडस लागत...

काच...

मध्ये एक काच असते कधी साधी कधी काळी असते एक नेहमी... कधी वेगात कधी थांबलेली कधी अर्धी उघडी कधी पूर्ण कधी दुधाळ कधी स्पष्ट कधी स्वच्छ कधी मळकट कधी नंबरी कधी नुसती कधी गारठून...

धप्पा

धप्पा / भोज्जा हा शब्द उच्चारायला जितकी मजा यायची तितकीच भीती असायची आपल्या मागून ऐकायला... तो शब्द ऐकला की परत ये रे आपल्या मागल्या! परत शोधा सगळ्यांना, नियम असले तरी ते पाळतय कोण, काही मुलं साली घरी बसून चहा-पोळी तोडत बसायची काही गच्चीत जाऊन लापायची... पण काही काका / आजोबा मंडळी मदत करायची, कारण नियम त्यांनाही माहिती असावेत!  त्यांच्या ह्या अमूल्या मदतीने कधी कधी ते नको असलेलं राज्य संपायचं! हुश्श... सर्व पकडले गेले, पहिला जो पकडला गेला तो प्रामाणिकपणे राज्य तरी घ्यायचा नाही तर पळ काढायचा, मग तो गेल्यावर त्यानंतरच्यावर राज्य!  असो... जेव्हा 'धप्पा'दायक बातमी साठी आपले हात शिवशिवतात तो क्षण कसला भारी असतो... आणि राज्य घेणारा नेमका चुकून वळून बघणार ह्यासारखं दुर्दैव नाही जगात... हो, असे क्षण पण वाट्याला येतात! पण फार क्वचित, फारच बलवत्तर असावं लागतं नशीब अगदी मोक्याच्या वेळी धप्पा परतवण्याचं!  तर एवढं सगळं का सांगतोय, तर आता भारत सरकारने पण असला जबरदस्त धप्पा दिलाय... आणि तो पण न चिटिंग करता, नियमात राहून!  ज्याला धप्पा दिलाय तो सोडून सगळे खुश, हे राज्य अ...

वस्तू

Image
दर वर्षीच माटुंगा मध्ये पाणी साचतं, त्यावर्षी ही तसेच, २००४/०५असेल नीट आठवत नाही, नवीन नोकरीचे पहिले काही वर्ष, त्यामुळे खर्च जरा जपूनच करावा लागायचा... आणि काही महाग वस्तू घेतली की त्याची 'किंमत' जरा दुप्पट असायची. असो... तर झालं काय, मी घेतलेले नवीन बूट! ज्यादिवशी घेतले त्यादिवशी निळं आकाश, दुसऱ्या दिवशी सकाळी ही तसंच, पण दुपारी निळं आकाश राखाडी झालं, आणि संध्याकाळी काळं, धो धो नॉन स्टॉप पाऊस, माटुंग्याची हालत काय झाली असणार ह्या कल्पनेनीच मी भिजलेलो, प्लॅटफॉर्म बदलला, मुख्य रस्त्याच्या अंदाजे ३-४शेवटच्या पायऱ्या पाण्यात विलीन झालेल्या, माझ्या डोक्यात बूट होते, ते मी हातात घेतले... त्या वेळी काही जास्त विचार न करता हातात बूट घेऊन मी घरी जायला निघालो, अंदाज लावत लावत, जाता जाता एक बाटाचं दुकानही दिसलं, चपला होत्या त्यात, पण चपला घेण्याइतके पैसे नव्हते... पाय पुढे गेले, समुद्रात आपण कसे बिंदास चालत असतो... लागलं तर काय लागेल... शंख शिंपले! इथे मामला वेगळा होता, पण तो विचारच नाही! घरी आल्यावर गानू काकांनी मी केलेला प्रकारचा सौम्य भाषेत निषेध दर्शवला! आणि त्यांचं खरं ही हो...

जेल...

Image
जेल... (टीझर) जेल मध्ये आहे तो! गेले कित्येक वर्ष सकाळी कोणी ना कोणीतरी काठी वाजवतो कोठडीच्या सळयांवर, हा अलार्म असावा बहुतेक! पण कशाला हवाय अलार्म, तो झोपलेलाच नाहीये कित्येक वर्ष, डोळे उघडतो... बंद असले की झोपायचं समाधान. जेमतेम १X१ फुटाच्या खिडकीतून येणारा प्राकाशा कडे तो तासंतास पाहात बसे, त्यावरची कडेला आलेली जळमटं काढतो तो अधून मधून, रात्री घु घु आवाज करत वारा खेळायचा त्या छोट्या पण जाड भिंतीच्या किडकीत, तोच काय त्याला विरंगुळा, त्याला निरनिराळी गाणी ऐकू यायची... हसायचा मग, स्टीलचा पेला त्यावर नखाने ठेका देत सकाळ व्हायची, मग सकाळ झाली की तो शांत, पण बाहेरचे आवाज त्याला मुळीच आवडायचे नाहीत, दिवसभर कानात बोट घालून असायचा तो, शांततेशी जणू करार केलेला त्याने, एकाही कैद्याशी एक शब्द बोलला नव्हता तो, त्याबरोबरचे कित्येक कैदी आले न गेले, हा मात्र तिथेच राहिला. कोणी १खून कोणी २ कोणी १०... पण ह्या बिचार्ऱ्याने कोणाचाच खून केलेला नव्हता! . . . . . पण एके दिवशी तो ज्याची वाट पाहात होता तो आला... क्रमश: #सशुश्रीके । १० सप्टेंबर २०१६ –––––––––––––––––––––––––––––––––––...

'समीर' उर्फ 'स्वरूप'

Image
नमस्कार, माझं नाव समीर, हो... माहित्ये जाम कॉमन नाव आहे! पण मला आवडतं, समीर! वय ४६, मागे पुढे कोणी नाही, एकटा जीव सदाशिव. पोटापाण्यासाठी भारतभर फिरलो, आता परत मुंबईत! माझ्या मुंबईत. ३महिन्यापूर्वीच डॉ.प्रधानांकडे जॉब मिळाला. भला माणूस हो! डोळ्यांचा दवाखाना आहे त्यांचा जुना, खुप प्रसिद्ध आहेत आणि तेव्हढेच साधेही, आणि माझ्यासारख्याला जॉब वर ठेवायचे म्हणजे, असो... फोन अटेंड करणे, अपॉइंटमेंट घेणे, दिवसभर हेच काम, त्यांचा अजून एक असिस्टंट आहे पण सध्या सुट्टीवर असल्याने माझ्यावर फुल ऑन लोड, पण माझ्या सारखीच त्यांना हिंदी जुनी गाणी खुप आवडायची त्यामुळे दिवसभर रेडिओ किंवा त्यांच्या काही ठरलेल्या गाण्यांच्या कैसेट्सवर मंद आवाजात एक टू इन वन अखंड चालू असायचा. त्यादिवशिही रेडिओ चालू होताच, बातम्या चालू होत्या, पण त्यादिवशी बातम्यांकडे दुर्लक्ष करणे महा कठीण, कारण मुंबईत जवळजवळ ७ ठिकाणी लोकल ट्रेन मध्ये एका मागोमाग एक स्फोट झालेले, ईमर्जंसी शिवाय बाहेर पडू नये असे आवाहन दिले जात होते, त्यात ऑड-डे होता आणि संध्याकाळची ऑफीसं सुटायची वेळ त्यामुळे प्रचंड जिवितहानीची शक्यता, त्यात फोन आला...

विधाता

Image
  मध्ये काही महिन्यांपूर्वी 'वाह क्या सीन है' चे ६ भाग लिहिलेले, पण आज लिहायला गेलो तर ज्या चित्रपटाबद्दल लिहितोय तो अक्खा चित्रपटच डोळ्यासमोर आला! असो... लिहून टाकलं मग, खूप जिव्हाळ्याचा 'नॉस्टॅलजीक' विषय डोक्यात घुसला की तो लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. असो... तर लहानपणी घरी काही व्हीडिओ कैसेट होत्या... २०-२५असतील जेमतेम, होमआलोन, डेव्हिड मेजीशीयन, टॉम अँड जेरी वगैरे आणि हिंदी सिनेमामध्ये विधाता म्हणून एक चित्रपट होता, बॉलीवूड इतिहासात काही खास ठसा नसलेला तरी माझ्यासाठी खूपच भारी! कारण पारायणं झालेली पाहून पाहून! सीन न सीन पाठ!  दिलीप कुमार आणि शम्मी कापूरचं सुरुवातीलाच एक मस्त गाणं आहे, दोघे आगगाडीचे चालक आणि कोळसा आगगाडीच्या एंजिनात टाकत 'तकदिर है क्या मै क्या जानू... ये खेल है बस ततबीरो का, होतों की चंद लकीरो का' हे गाणं म्हणत तो 'सफर' सत्कारणी लावतायत. नंतर जगावर नावाच्या खालनायका (अमरीश पुरी) कडून दिलीप कुमारच्या तडफदार मुलाचा खून... (ओबेरॉय) त्याच वेळेस दिलीप कुमारच्या नातवाचा जन्म! मुलाला जन्म देताच आईचा मृत्यू, दिलीप कुमारच्या वाटे...

तू झोप...

अंगाई गाते हं... तू झोप... जा स्वप्नांच्या दुनियेत... भीज पावसात, खेळ चिखलात, मार उड्या गाद्यांवर, कर उद्योग नको ते, पहा कार्टून्स दिवसभर, खा चॉकलेट्टं न बिस्किट्टं, पी कोल्ड्रिंक न आंबट ढाण ताक, चोख ते पेप्सीकोले, काले खट्टे, वाळा न आरींज गोळे, बघ टीवी डोळांच्या काचा होई पर्यंत, ऎक ती धांगड-धिंगा गाणी, फीर त्या भर उन्हात अनवाणी, उशीरा झोप, उशीरा उठ उठ आता तरी उठ, उठ की घालू कंबरड्यात लाथ? आई... आई पाचच मिनटं! अजून माझी बॅटिंग यायच्ये, बॉल हरवला की आलोच! अरे! डोळे उघडले... आता ऑफिस आता चहा कॉफी आता ट्राफिक आणि दगदग आता बॉस आणि प्रेजेंटशन आता क्लाएंट आणि मीटिंग्स आता फायली आणि कॅलक्युलेटर पण, 'अंगाई' पासून... 'उठ रे बाळा' ऐकण्यासाठी तो गळा... मागे वळून पळा... असेल तोच लळा अंगाई गाते हं... तू झोप... #सशुश्रीके | १७ ऑगस्ट २०१६ | ०१.५५

रामायण, महाभारत, कृष्ण...

Image
रामायण, महाभारत, कृष्ण... दूरदर्शन वर अश्या मालिका होऊन गेल्या... ह्या विषयावर काहीही वाचले / ऐकले / बोलले तरी त्या त्या मालिकेतील अभिनेते डोळ्यासमोर येतात. खास करून पंकज धीर, अरुण गोविल, नितीश भाराद्वाज ही मंडळी किती ही केलं तरी हा अनुभव न येणे कोणालाही अशक्यच! हे खरंतर क दर्जाचे कलाकार होते पण या मालिकांमुळे लोकप्रिय झाले. जसा दारासिंग, आजही हनुमान म्हंटलं की दारासिंग आठवतो. तसंच प्रभातच्या चित्रपटाविषयी त्याकाळी झालं होतं. संत तुकाराम इतका तुफान गाजला होता की विष्णूपंत पागनीस यांना रस्तातून फिरणे अवघड झाले होते लोकं रस्त्यातच पाया पडायची. शिवाजी महाराज म्हंटलं की चंद्रकान्त मांडरे भालजी पेंढारकरांनी शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट बनवले सगळ्यात एक तर चंद्रकान्त नाही तर त्यांचे धाकटे भाऊ सूर्यकान्त श्रीकृष्ण म्हटलं की शाहू मोडक 😊

परत पुढच्या वर्षी...

Image
पाण्याचे थेंब पडून पडून.. लाकूड असो किंवा फरशी, रांगेत छोटे छोटे खड्डे पडतात, त्यात पाणी साचतं, साठतं... गायब होतं! परत पुढच्या वर्षी... तेच छोटे खड्डे परत भरतात... काही एमएम नी मोठे होतात, मागच्या वर्षी पेक्षा काही अंश मिली. जास्त पाणी साचवतात. हे सर्व परत पहायचय, अनुभवायचंय! ‪#‎ सशुश्रीके‬

दिपक मोकाशी

Image
हल्ली मित्र होतात… एफबी फ्रेंड रेक्वेस्ट वरून… अगदी जीवा भावाचे! आली होती अशीच फ्रेंड रीक्वेस्ट… २५०-३०० च्या आसपास असणार लिस्ट केली एक्सेप्ट… काही फ्रेंड्स होते मुच्युअल, आणि त्यात तो ही मी जेव्हा गेलेलो तेव्हाच टर्कीला गेलेला त्यामुळे एकाच वेळी दोघांचे सिमिलर पोस्ट्स / पिक्स पण… तब्बल २ महिने भेटलो नाही, दुबईत घरीच वेळ द्यायची बोम! पण अखेर त्यानी कॉल केला… नवीन घरी शिफ्ट झालेलो करामा दुबईत स्टुडीओतून १बीएचके… मी म्हणालो ये बिंदास! घरीच आहे, बायको म्हणाली अरे काय आपलं घर लागलेलं नाही काही नाही! नंतर बोलाव… पण तो वर उशीर झालेला! साहेब टैक्सी घेऊन पोचलेले… आमच्या गप्पा सुरू… त्या दिवसापासून आजतोवर बस्स गप्पा थट्टा मस्करी पण कधी कटू क्षण… कधीच नाही! कोणी 'डी' म्हणतात कोणी 'दीप्या' कोणी 'मोकाश्या'... आणि मी कधी कधी 'डी-कैप' म्हणतो कारण हां दीपक सदानकदा कैप लाऊन असतो! तासन बघितलं तर हां स्वतालाच टोपी लावत असतो असं म्हणायला हरकत नाही... पण टोप्या इतरांना लावणार नाही हे मात्र तेवढच खरं... दिल का सच्चा है हमारा 'दीपक मोकाशी' अगदी बिंदास 'जोशी किव्...

भूल आया था घडी...

बडी फुरसत थी उस दिन, भूल आया था घडी इंतजार किया था बहोत, अचानक!... दिन में रात हो गई लगा जैसे छीन गई हो रोशनी, आँखो से मेरी! वो आई थी बिना दस्तक, नाम था उसका, कंबख्त 'निंद' कलाइयोंपे फिरसे गई नजर... भूल आया था घडी. #सशुश्रीके । १४ जून २०१६

भूतकाळ सुरु होतो...

Image
मोकळं आकाश मोकळा तो रस्ता सकाळची वेळ कोवळ्या उन्हाचा तो खेळ सदा सडा प्राजक्ताचा त्यांवर राज्य ते दवाचं कंसात काळजी त्या फुलांची बळी जाई पावली नकळत मागे अंगणात वृंदावनं मुंग्या जणू देती पहारे कधी साखर कधी नारळाचे कधी ताट नैवेद्याचे मागे विहीर दगडी अखंड थंडगार त्यात पाणी काठावर शेवाळं सुंदर जणू सांगे विहिरीची कहाणी गोठ्यात जीव काळे हंबरती तहानेने जोरात साखळी सोडता हळूच वाट जाई थेट हौदात त्यात ठप्प-ठप्प आवाज कधी कैऱ्या कधी नारळ कधी पक्षांचा जीर्ण पानांचा असं शांत ते वादळ अश्या ह्या आठवणी आता झाली ती स्वप्न भूतकाळ सुरु होतो वर्तमान ठेऊन गहाण #सशुश्रीके । ८ जून २०१६

सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…

Image
"घ्या कादंबरी मस्त पहा तरी हातात घेऊन सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…" आणि पुढे बरच काही सांगत होता आणि विकत होता एक 'राज ठाकरे' सारखा दिसणारा माणूस, मी नेमका मोबाइलवरच होतो तेव्हा, संध्याकाळची ट्रेन होती, पुणे-मुंबई. त्याचं ते 'Advertising' ऐकून खूप लोकांचे कान त्याने आकर्षले असणार ह्यात वाद नाही, आईने त्याला हात केला, नेमाडेंचा 'हिंदू' पासून इनामदारांच 'राउ' अशी १०-१२ पुस्तकांना कडेवर घेऊन लोकांना तो आवाहन करत होता… "पहा तरी हातात घेऊन… पैसे नाही हो पडत बघायला! घ्या घ्या… वाचन वाढवा!" आईने 'राउ' घेतलं हातात, मी म्हणालो आईला हळूच "आई हे ओरिजिनल नाहीये…" आणि हेच त्याला ही सांगितलं, तो म्हणाला अहो हेच आहे ओरिजिनल, झेरोक्स वालं पण असतं! पण सध्या नाहीये माझ्याकडे!" मी किंमत विचारली, "अडीचशे फक्त!" मी मनात विचार केला की आता काय ह्याचाशी हुज्जत घालून उपयोग! ह्या प्रिंटींगच्या क्षेत्रात्लाच मी, मला काय हा अम्जाउन सांगतोय! पण असो… आईने भाव करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात मी अडीचशे त्याला देऊ केले. ...

फणस!

Image
    आत्ताच एक क्लिप पाहिली, फणस किती उपयोगी फळ आहे, वगैरे वगैरे! तडीक शेयर पण केला व्हिडिओ... असो, मला काय म्हणायचं होतं ते सांगतो एकदा अक्षीला दुपारी जेवल्यानंतर म्हशीचा चारा असतो ना त्यावर जाऊन खेळायचं, म्हणजे ती फाईव्हस्टार हॉटेल वाली गादी असते ना, तसाच अनुभव! कितीही दंगा करा... मस्त 'सेफ' वाटायलाचं! एके दिवशी त्या पेंढ्यावर गोणपाट होतं, ते नाजरंदाज करत जी काय उडी घेतली मी त्यावर, आणि जो काय बोंबललोय नंतर, त्या गोणपाटा खाली फणस होता हो! एक नाही चांगले २-३होते! पण हे सांगणार कोणाला... रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्याचा पिल्लासारखा कळवळलो न ढुंगण खाजवत दंगा त्या दिवाशीपुरता रद्द केलानी... काय समजलात! #सशुश्रीके | २२ मे २०१६

उनाड दुपार

Image
उनाड दुपार - भाग १ झोप... छे!   झोप वगौर म्हातारे लोक्स घेतात! झोपेची वेळ तर फार महत्वाची वेळ, अक्ख गाव झोपलेलं आणि तुम्ही मस्त जेवण जिरवायला मोकळे, ताकाची चूळ भरून... दातात अडकलेले लोणी दातांच्या फटीतून खेचत उनाडगिरीला सुरुवात! पहिली भेट विहिरीला.. त्या अर्धमेल्या छोट्या बादलीला पायाने ढकलून बळजबरी 'आत्महत्या' करायला लावत माझे स्वार्थी दोन हात तिला जीवदान देण्यासाठी परत वर खेचत, का तर तांब्यातले पाणी पुरले नाही म्हणून! आणि अश्या ताज्या थंड पाण्याला कोण सोडणार, त्यातच ते पाणी अर्ध अंगावर, मग ते सुखवण्यासाठी उन्हात काठी आणि टायर घेऊन सुसाट ह्या वाडीतून त्या वाडीत. घाबरायचो नाही कोणालाच भीती मात्र वाटायची त्या भल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक खांबाची, किर्रर्रर्रर्रर्र असा अखंड आवाज, आणि त्यावर वायरांच ते जंजाळ! तिथे आलो की माझा वेग कमी असेल तर वाढायचा आणि जास्त असेल तर कमी व्हायचा! कायतरी विचित्र जागा होती ती... कोकणातलं सूक्ष्म बर्मुडा ट्रायांगल म्हणा ना! असो, रस्त्यावर पडलेल्या आणि गाड्यांच्या चाकांमुळे चिरडल्या गेलेल्या शहीद चिंचा आणि जांभळं पाहून मन कसं जड...

रामभाऊ

रामभाऊ आमच्या शाळेतले शिपाई. नाव रामभाऊ... घंटा वाजवायला, फाईली आणायला, फाईली पोचवायला, पालकांना विद्यारथ्यांचे वर्ग दाखवायला, साफसाफाई वगैरे अगदी सर्वच कामासाठी रामभा...

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते! दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील… पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला. युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप. त्यात माझ्या पुणेरी ड्रायविंगला आई पदोपदी 'मी चालवू का' अशी दाद देत होती, मी म्हणायचो अगं मी चालवतोय तशी चालवली नाही तर आपण आत्ता युनिव्हर्सिटीलाच असतो! फिल्म इंस्टीट्यूटच्या सिग्नलला परत तेच, 'मी चालवू का!?' मी शेवटी वैतागून उतरलो, म्हंटलं 'घे बाई, चालव!' निदान मागे बसून आईच्या शिव्या खाण्यापेक्षा व्हाट्सपिंग/फेसबुकिंग करावं! तर मागे बसल्या बसल्या मंदारचा फोन (माझा मित्र) त्यात त...

"चख ले ये मुरब्बा"

Image
"चख ले ये मुरब्बा" हे गाणं आणि अमित त्रिवेदी हा खरच एक 'मुरब्बा' आहे 👍👌 आज शफल वर गाणी ऐकत होतो, आणि मुरब्बाचं डूएट व्हर्जन लागलं, लयबद्ध... टीपटाप... सहज... साथीला व्हाओलीन... इलेक्ट्रॉनिक गिटार... बेस गिटार... स्मूद ज्याझ्झ... अमितचा स्वतः चा आवाज... कविता सेठ चा गोड'खारा' आवाज... अँड आइस ओंन केक म्हणजे स्वानंद किरकिरे साहेबांचे शब्द. अमिताभ स्लो मोशन मध्ये त्याच्या 'फॅन' नी आणलेला 'मुरब्बा' चाखतो! काय मस्तय सीन तो, हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा परत एकदा ऐकावच लागतं, कधी कधी तीनदा कधी चारदा. आत्ता ह्या लेखा निमित्त ५व्यांदा ऐकतोय ले...चख ले मुरब्बा किसी का संजोया हुआ तुझ तक आया है ले... चख ले ये मुरब्बा किसी का कदरदारियों का सरमाया है ये दिल मै रख ले रख ले ये... मुरब्बा ह्या कडव्या नंतर जो काय सोलो गिटार पीस आहे! बास रे बस!!! (2:32-2:47) ह्याच अलबम मधल्या बाकीच्या गाण्यांमध्ये अजून वक गाणं पण मस्तय, 'अक्कड बक्कड' गायलंय मोहित चौहाननी... अक्कड बक्कड बंबे बो, एस्सी नब्बे पुरे सौ... सौ ...

सात दिवस

त्या सकाळी म्हणालो... "सात दिवस उरले" आज... "सात दिवस संपले कसे!?" सात दिवस आपले, अडीच दिवस माझ्या पुण्याचे, बाकीचे आमच्या मुंबईचे, सात दिवस संपले! एक उन्हाळा एक लग्न काही मित्र काही नाती कधी एकटा कधी गर्दी रोज आठवण रोज ऑनलाइन आज पण... ऑनलाइन इथे असलो की तिथली ओढ तिथे असलो की इथली असला मी पूर्ण अर्धवट सदा हावरट सगळं हवं हे सात दिवस प्लस मायनस गोळा बेरीज शून्य आई बाबांचे पुण्य सात दिवस उरले पासून सात दिवस संपले सात दिवस हरवले सात दिवस ‪#‎ सशुश्रीके‬ । २७ एप्रिल २०१६

।। प्रश्नावली ।।

बाबा बाबा दमलास का? बाबा बाबा दमलास का? ऑफिसच्या कामांनी थकलास का? जरा मोबाईल बाजूला ठेवतोस का? मग टीव्ही समोर असा बसतोस का? माझ्याशी जरा खेळतोस का? खेळणी जरा मांडतोस का? पत्...

प्लॅटफॉर्म

Image
'प्लॅटफॉर्म' इसी 'प्लॅटफॉर्म' पे... अमीर देखें, देखे हमने गरीबभी. यहां देखी सुबह सुरजसे पेहले, यहां देखी रात चांदके साथ, यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद. यही दिखते थे लोग अंजाने, कोई घबराए, कोई मुस्कुराते, कोई मेरे जैसे, जाने अंजाने, इसी 'प्लॅटफॉर्म' पे... मस्त नाव आहे नई? मला तर जाम आवडतं, (प्लॅटफॉर्म म्हणजे... रेल्वे प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, इतर ही प्लॅटफॉर्म असतात म्हणा पण मुंबईत राहिलेल्या माणसाला एकच प्लॅटफॉर्म माहीत असतो त्यातलाच मी एक, असो...) त्यावर सगळी मंडळी (वाट बघत) असतात! अगदी न जन्मलेल्या जीवापासून ते अंतिम श्वास घेणाऱ्या जीवापर्यंत. तिकीट खिडकीमधले काका/काकू निष्कामकर्मयोगाने तिकिटे देत असतात, आता तर काय, स्वयंचलित यंत्रे पण आहेत... पैसे घाला तिकिट बाहेर... मनात गाणं सुरु, "गाडी बुला राही है, प्लॅटफॉर्म  पे आ राही है". ह्या प्लॅटफॉर्म वर आपापल्या 'मंझिल' साठी लोकलची वाट बघत प्रवासाला सज्ज होतो मुंबईकर, कोणी फर्स्टक्लास मध्ये तर कोणी सेकण्ड तर कोणी थेट टपावर! कोणी पासवाला तर कोणी तिकिट, विना तिकीट...