Posts

Showing posts from September, 2014

फडणीस सर...

Image
फडणीस सर... मॉडर्न हास्कूल जंगली महाराज रोड... इयत्ता ५वी... विषय चित्रकला... उंच, मानेतल्या शीरा दिसायच्या बोलताना, कपाळावर मस्त २इंची भगवा गंध, फुल बाह्यांचा पण दंडा पर्यंत दुमडलेला शर्ट, जराशी अखुड प्यांट, भयंकर तापट, पण हसले की जाम गोड दिसायचे... आणि हो... लुना वर यायचे, सर्व शिक्षकांमधे एकदम उंच... फिट... एकदम हटके! आमच्या सांगवीच्या खाडे महाराज बाबांचं पोर्ट्रेट केलेलं, अजुन ही मठात आहे! काय सुन्दर केलय... ओइल पेंटिंग... अगदी हुबेहूब! मुंबईतुन पुण्यात आलेलो, ५वीत असेन, चित्रकला उत्तम तयाामुळे मी लाडका, त्यांचा वर्ग भरला की माझ्याकडे आवर्जुन येणार, काय दीवे लावतोय... आणि प्रकाश पडलेला दीसला... की त्यांच्या मिशीतून दिसणारे ते स्मित हास्य यशेची पावती देऊन जायचे! जिंकलो आज... असा काहीसा चेहरा व्हायचा माझा! एक आगाऊ पणा केला होता तेव्हा पालकांना घेउन ये उद्या असं आमच्या हेड मास्तरांनी सांगितलं, तेव्हा वडलांना बाजुला घेउन हलक्या आवाजात काहीतरी सांगितलं आणि बाबा हसले, तो क्षण अजुन ही आहे तसा आठवतो, माझा गुन्हा होता मी कॉपी बाळगल

माझा हेप्यी बडे

Image
॥ श्री ॥ अन्वया वर्जन २.३ प्रसंग... तीच्या आईचा वाढदिवस... केक कापण्यासाठी माझी बायको हातात सुरी घेउन रेडी... ती सुरी दमदाटीने स्वत:च्या ताब्यात घेत अन्वया... आई - आज कोणाचा बर्थडे आहे... माझा! अन्वया - नाही नहीं माझा.. माझा हेप्यी बडे.. मला केक कापायचा... माझा हेप्यी बडे. मी - अग्ग आज आईचा बर्थडे आहे आज!! अन्वया - आsssssss... नायी.... माझा हाप्प्यी बडे केक्क्क्क... मला... ओ_ओ - सशुश्रीके

दिल-से 'सतरंगी' प्रार्थना

Image
॥ श्री ॥ २९ सप्टेंबर २०१४ / रात्रीचे २.३१ यो!!! गाइस इट्स मा वयफीस बर्थडे टूडे... यो! . . हाहाहा... तीशी गाठतायत म्याडम! लै ग्वाड हाय पोग्गी... अन तीची पोग्गी बी... म्हणजेच आमची अन्वया हो! देवाला मागितली एक आणि मिळाल्या दोन, डबल नशीब काढलय बघा मी! अमृतानी पण काढलय, मला 'ओके' म्हणून! असो ही माझी अमृता, आधी गोगटे होती ते आता जगाच्या नियमानुसार आडनाव बदलतं, पण अजुनही गोगटेच आहे हो... . . पुण्यात माझ्या घरी अमुक दिवशी जाणारे मग तुझ्या 'आपल्या' घरी अमुक दिवशी जाईन... असं अगदी सहज पणे बोलून जाते, मग मी तिच्याकडे असा तिरक्या नजरेनी बघतो! मग ती लाजायचं बिजायाचं सोडून, 'ते अजूनही माझं घर आहे हं! असं क्षेपणास्त्र सोडते, आणि मी भंजाळ्तो... नक्की कुठलं घर! . . एक अजुन आठवलं, मला बोलायचं काय आहे अणि मी काय बोलतोय, ह्याचा अचूक नेम बाइसहेबांना असला जमातो... की आजुबाजुच्या लोकांना चक्कर येते, की हे संभाषण काय होतं! साध्यातलं साधं उदाहरण... म्हणजे... एखाद्या व्यक्तीचं भलतच नाव घेउन ज्या व्यक्तीचं नावाबद्द

मोमाइल!

॥ श्री ॥ नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी डोळ्यासमोर मोबाइल घेउन मी बीन बैग मध्ये लोळत होतो... अन्वया खेळत होती माझ्याकडे बघून... "बाबा मोमाइल ठून दे ना.. ठेंनदे मोमाइल!!" "आआआ ठूंन्दे नाआआआ!!!" - सशुश्रीके

असा रेहमान परत होणे नाही...

Image
साधारण १९९२ चा नोव्हेंबर-डिसेंबर असावा छान थंडी, पुण्यातली...  मोडेल कॉलोनी मध्ये...  मित्राच्या घरी...  मोठ्या टेरेस वर सगळे जमलेले,  बर्थडे पार्टी... धमाल मस्ती संगीतखुर्ची केक आवाज मित्र गर्दी आणि मी हळूच एका कोपऱ्यात ह्या सर्व मोह मायेतुन ज़रा वेगळा...  तो संगीत खुर्चीचा 'चित्त थरारक' कार्यक्रम संपल्यावर गाण्यांकड़े दुर्लक्ष करत मुलं आणि त्यांचे पालक आपआपलं उदरम भरणम करण्यात मग्न होते,  पण मी वेगळा...  त्या छोट्या टेपरेकॉर्डर पाशी,  माझी छोटीशी  हो हो तोच तो दिवस! दिल है छोटासा... छोटीसी आशा रोजा जानेमन, भारत हमको... रुक्मिणी रुक्मिणी... ये हसी वादियाँ... A साइड संपली की B... असा माझा कार्यक्रम चालू होता माझा 'साइड बाय साइड' ती मेग्नासौन्डची कस्सेट.. अजुन ही आठवते! तेव्ह्हा रहमान कोण वगैरे काही माहीत नव्हतं! पण जी काय जादू... जो काय 'साउंड' होता त्या रोजा मध्ये! स्वर्गीय!!! पुढे बॉम्बे, हम से है मुकाबला च्या वेळी रेहमानचा रेहमान साहेब झालेला, सुरभी वगैरे मध्ये त्याची मुलाखत वगैरे म्हणजे... जिंकलच हो!

युती उपटली... मातीचा भूगा

।। श्री ।। युती उपटली... मातीचा भूगा, आता महाराष्ट्रात राजनैतिक फुगा, मोठा अजुन मोठा, फुटणार मडकी फुटणार टाळकी, रोज रोज ऐकणार आता माझी सटकली, मुतणार काही, काही सोडणार कमनशीबी शेवटी शेतकरी ठरणार, मातीतुन आलात मातीतच जाल, भवानीचा महिमा... शिवाजीची ढाल... त्यांचं पुण्य... तुमचा शिमगा, शेवटी मातीचा भूगा! - सशुश्रीके | २५ सप्टेंबर २०१४ / सकाळचे ११

सचिन सचिन...

।। श्री ।। २५ सप्टेंबर २०१४ / रात्रीचे १२.५३ प्रत्येकाचा देव ठरलेला असतो... त्याच्या त्याच्या वयानुसुनार... माझा होता... 'सचिन... सचिन' अजुन ही आहे :) सचिन सचिन, सचिन आला रे... आईला सचिन!... 10DULAKR...गॉड ऑफ़ क्रिकेट!... ह्या देवानी क्रिकेट विश्वच काय तर लाखो मुलांचं भविष्य पण बदललं असेल...त्याच्या खेळी वर फीदा होऊन करियर चेंन्ज करून... त्याचा आदर्श ठेउन! तोच आदर्श आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची ओढ़ माझ्या नसानसात भरलेली... 'अरे दारिद्र्य येइल अश्यानी...' 'किती कागदं फाडणारेस!?' 'रद्दीत घालवू नकोस असे पैसे' 'अरे इतकं मन लाउन अभ्यास केलास तर... अमुक तमुक...' पण मी टोणगा! आई बापाचं नं एकण हा जणू जन्म सिद्ध हक्क! अगदी 5mm पासून अक्खी पोस्टरं, जिथे तो दिसायचा मी फाडायचो, वेड लागलेलं सचिनच्या चेहऱ्याची 'कोलाज' करायचं, ध्यास एकच त्याला मी केलेलं कोलाज गिफ्ट करायचं... फाडलेल्या पुस्तकांची अणि तीच पुस्तकं न फाडलेली अश्या दोन स्वरूपात! डबल रद्दी!! म्हणजे शक्यतो रद्दी घेतानाच मिळाल्यास २प्रती घ्यायचो, पेपर्स, मासिकं, पोस्टर्स, पोस्

काजवे दिसले...

आज सकाळी सकाळी डोळे खाजवले, आणि काजवे दिसले! काजवे शेवटी कधी बघितलेले आठवतय का!? एका मागोमाग एक, डाटा फोल्डरच्या बाहेर... ओव्हरफ्लो... अंगावर पडलेला सुरवंट! रस्त्यावरचं सुखलेलं शेण, धो धो पावसानंतर च्या लक्ख सूर्य प्रकाशात... सूरुच्या बनातला कुज्लेला पानांचा सुगंध... वाडीतल्या चिखलात पडलेले जाम, फुटलेल्या कौलातुन आलेले सूर्यकिरण, चालता चालता डोळ्याच्या कोपर्यातुन दिसणारा... कवळ्यानी अर्धवट टोचून खाल्लेला आंबा... गंजलेल्या खिडकीतल्या बार मधली जळमटं, सारवलेलं अंगण त्यात दीवाळीतल्या नागिणिचा काळा ठिपका... जणू नजर ना लगे! शेवग्याच्या शेंगाच्या झाडाची फुलं, छोटी छोटी... तुटलेल्या फराश्यांचा तो रचलेला ढीग... लिंगोर्चा, 'हात हातरे' करणारा टांगा वाला, मधेच शीटी...मधेच चाबुक, वाडीत त्या कड़क सुपीक गादीसारख्या जमीनीवर... कैरी पडल्यावर धप्प असा आवाज! पाववालं, दुधवालं, कल्हइवालं, कापुसवालं... गोला सरबत, कुल्फिवालं, मासुलिवालंचा झोपाळ्या वरून 'स्नीक पीक' झोपाळ्याच्या बांबूवरचा भुंगा... शेवाळं आलेला हौद, रस्त्यावरच्या जांभळांचा खून, बैलगाडीच्या चाकाखाली रगडणार्या छोट्य

अचानक

Image
||श्री || २२ सप्टेंबर २०१४ सकाळचे ७.५८ अचानक, गरम पाणी आठवलं.. चुलीवरचं! काय मस्त सकाळची थंडी... सरपण गोळा करून, खटपट... काडेपेटी... पडवीतल्या रॉकेल दीवा ज़रा शिम्पडून... चुल तैयार... ते काळपट्ट भांड... जाने कितने बार गरम होके ठण्ड से बचाया होगा उसने! जे मिळेल ते कापड हातात घेउन... पायांचा कौन्स करून... ऐच्छिक पायर्या ओलांडून... विहीर गाठायची... तिकडच्या त्या बुरशी आलेल्या धक्कादायक पृष्टभागाशी क ुस्ती करत... साबणाचा वेध घेत, चुलीच्या विझलेल्या धूराचा आविष्कार सूंघत... धब्बाकदिशी आवाज तो बाद्लीचा विहीरीत... तो दंड १-२-१-२ बादली खेचत... अर्ध पाणी परत विहिरीत... अर्ध गरम पाण्यात विलीन... तो पहिला तांब्या... तो झाग, मध्येच कानात रेडियो च्या जाहिराती... तोंडात अथर्वशीर्श... १००%ओला.... आता फ़क्त अथर्वशीर्ष हाच एक 'कोमन फ्याक्टर' सोडला तर बाकीची अंघोळ कोरडीच! - सशुश्रीके  

'लकी डे'

Image
।। श्री ।। २२ सप्टेंबर २०१४ आज 'लकी डे' आहे महिन्यातून एकदा तरी असतोच! म्हणजे काय… लकी डे म्हणजे 'लकी अली'च्या गाण्यांचा दिवस हा माणूस पहिल्यांदा आला 'ओ सनम' घेऊन तेव्हाच वेगळं काहीतरी असं जाणवलच! जसं रोजा द्वारे रेहमान नी कम्माल केली तेवढी ह्यानी नसली केली तरी हा कम्माल आहे मी आणि माझ्या सारख्या काही मंडळींसाठी! अरेबिक शैली झळकते गाण्यांमधून। बेस गिटार बाप! गाण्यांचा अर्थ पण कडक! आवाज रहमान आणि मोडर्न मुकेश सारखा काहीतरी… कदाचित मी चुकीचा असेन! तुम्हीच पारखा एक गाणं आहे त्याचं त्याच्या आत्ता पर्यंतच्या ४०-५० गाण्यांपैकी 'मेहबूब' लेखाच्या शेवटी लिरीक्स ओततोय… आज सकाळी ३दा सांडलोय आणि आत्ता लिहितानाही सांडतोय :) त्याची 'मिलेगी मिलेगी मंझील', 'आप पार अर्ज ही', 'अन्जानी राहो मै…' ही गाणी पार ९०फूट खोल नेतात मला! असो… हा माणूस प्रसिद्ध मेहमूदजींचा पोट्टा… एक वादग्रस्त गोष्ट सांगायची झाली तर म्हणे त्यांनी स्वताच्या मुलाला कुठल्याही शाळेत घातले नाही! गुगल करा जास्त माहिती साठी… Quite Interesting बोल्लीवूड

ती लाल संध्याकाळ!

।। श्री ।। २१ सप्टेंबर २०१४ ती लाल संध्याकाळ! किंगसर्कलची गोष्ट १९८४-८५, संध्याकाळची वेळ,  रोजच्या प्रमाणे रेडीओ वर गाणी किव्वा मैच काहीतरी लागलेलं असेल, आण्णा नित्यनियमाप्रमाणे दाढी कारायला बसलेले, मस्त दणदणीत शरीर, फुल बाह्यांचा बनियान, पाठीवर छोटा टोवेल, लुंगी आणि मी बारकुसा…  हाफ बनियान… हो बस… तेवढाच पोशाख! आणि काय प्रचंड आकर्षण दाढी करताना बघायचं, समोर बसून अगदी, जसं काही फस्ट डे फस्ट शो, :P आण्णांची अर्धवट दाढी होते ना होते... तितक्यात कोणीतरी आले, दरवाज्याकडे बघत... आण्णा ब्लेड आणि दाढीचा ब्रश बाजूला ठेवत उठल, हाच तो क्षण तीच ती वेळ... माझे डोळे त्या चकचकीत ब्लेड वर पुढचा प्रकार 'लाल' होता मी त्या ब्लेड ला अक्षरश: कागदाच्या बोळ्यावाणी हाताळंत… नको नको >.< कल्पानाच नाही करवत! 'किल्ल बिल्ल' नावच्या इंग्लिश चित्रपटासारखा... ब्लैक एंड व्हाईट इफ्फेक्ट ठेऊन, माझी आजी मला हा किस्सा सांगताना अजूनही आठवते! देव करो 'ती लाल संध्याकाळ' कुणाच्या आयुष्यात नं येवो! - सशुश्रीके.

'फ़्रॉक छान आहे!'

।। श्री ।। नाव - अन्वया / वय - २ नेहमीप्रमाणे उशीर झालेला! नेहमीप्रमाणे माझी स्वताशीच बडबड चावी? खिशात असेल, डबा कुठाय… (आतून आवाज) टेबलावर मीच आणून टांगून ठेवलेला शर्ट बघून हळूच एक आवाज 'फ़्रॉक छान आहे!' बायको आणि मी दोघे एकमेकांकडे पाहून! अग्ग तो शर्ट आहे फ़्रॉक नाही काही! परत हळूच एक आवाज… ''शर्ट छान आहे!' #सशुश्रीके | २१ सप्टेंबर २०१४ / सकाळचे ८.५५

त्या दिवशी नीळा स्वेटर घालणारा मी…

।। श्री ।। १७-१८ सप्टेंबर २०१४ त्या दिवशी नीळा स्वेटर घालणारा मी… . . २ ओक्टोबर… १ दशकापुर्वीची गोष्ट, अक्ख्या भारतात गांधी जयंती म्हणून सरकारी सुट्टी... त्याच सुट्टीच्या निमित्ताने मी आणि 'ती' भेटलो आउटडोर स्केचिंग साठी... पुणे यूनिव्हर्सीटी… सैगमध्ये ग्रीटींग, मनात भीती, हातात स्केच बुक…  तीच्या पण… आणि तिच्या बाजूला मी, ३ फूट लांब, तेव्ह्हा काय जास्त डेरिंग नाही केलं… मग युनीव्हरसिटी केंटीन बाहेर वडापाव खाता खाता म्हणालो 'मला तुला काही तरी सांगायच' ती म्हणाली 'चल एक रोउंड मारू युनीव्हरसिटी मध्ये', तेव्हा मी गाडी तिला चालवायला सांगितली …कारण २ गोष्टी एकत्र नव्हत्या करायच्या मला! अन मारला हातोडा 'खूप आवडतेस मला तू' ती म्हणाली 'ओके' हातोड्याचा आवाजच आला नाही! नंतर घरी आल्यावर मित्रानी विचारलं 'ओके' म्हणजे काय 'हो' की 'नाही'? मग मी फोने केला… तेव्हा कळालं ओके म्हणजे 'हो!' हळूच का होइना हतोडा मारला मी! . . त्याचाही आधी… 'सागर किनारे' पासून 'पेहला नशा' ची कैस्सेट बनवणारा म

तो रस्ता!

Image
।। श्री ।। १६ सप्टेंबर २०१४ / संध्या ५.३९ तो रस्ता! खूप आवडायचा मला… तो किंग-सर्कल चा चढणीचा रस्ता - स्टेशन ला जाणारा त्याला रस्ता म्हणतोय कारण बहुतेक स्टेशन्सना पायऱ्या असतात, कोणी धावत यायच्चं वरून… वर जाणारे त्या पाईपान्ना धरून चढायचे सर्व प्रकारचे लोक, म्हातारे कोतारे, लहान सहान सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार त्या वाटेवर! किती ही उन असलं तरी काळोख असायचा चढताना उजवीकडे प्रचंड झाडे झुडपे डावीकडे स्टेशन ची भिंत सताठ त्या रस्त्यावर त्या ट्रेन च्या प्रवासाची टीकिटं लोळत पडलेली असायची त्यांच्या बरोबर कधी कधी भिकारी पण… रात्री जाम फाटायची…  बल्ब त्या सुरक्षित जाळीतून अंगावर पडणार आता असं वाटायचं नंतर जॉब साठी सकाळी ९.०३ ची लोकल पाकडायला मोठी पावलं टाकून जाणे येताना मात्र थकून भागून अंग घेऊन जायचा तो उतार… त्या चढणीवर घुसण्या आधी 'किंगसर्कल' असं लिहिलेली इंग्लिश पिवळी कमान आता नाहीये ती काढली असं कळालं :( त्या भयंकर मुंबईच्या पावसात इतके वर्ष तो भोगदा टाईप मारर्ग  तग धरून होता हेच विशेष! डांबरी वाट होती काळाच्या ओघाने त्यालाही भेगा पडलेल्या आधीच चढ त्यात ड

आईने दरवाजा उघडला

त्या समोरच्या राखाडी फळ्यावर ची अक्षरं नाचायला लागली हातातली पेन्सील तोंडात चावून रबराचा तुकडा पडला खाली मधली सुट्टीची घंटा वाजली मी दप्तर उचललं गपचूप कोणाला न सांगता शाळेच्या पायर्यांवरनं अलगद फाटका बाहेर मोशन ब्लर गाड्या दप्तर हळू हळू पाठीवरून कंबरेवर चालत चालत मध्येच वेग कमी जास्त जंगली महाराज रोड - मोडर्न कोलेज - पोलिस लेन… रस्ता संपायचं नाव घेत नव्हता वडार वाडीच्या बाजुचा क्येनॉल चा ओबड धोबड रस्ता पकडला आता कंबरेवरचं दप्तर ढूंगणा पर्यंत घामाघूम मी शोर्टकट ची कुम्पणं, पाला पाचोळा, पाइपं, दगडी आणि अजून काही नको नको त्या प्रकारांचा अडथळा पार करत एकदा दिसली आमची बिल्डींग आत्ता ३रा मजला! प्रचंड धीर करत एक एक पायरी… चेहरा प्रचंड लाल… कानात्नं धूर, कसाबसा हाताची मुठ घट्ट घट्ट करत दरवाजा धाड धाड धाड आई आई… आईने दरवाजा उघडला माझा चेहरा पाहून आई 'काय झालं? आत्ता घरी कसा आलास तू!?' मी आईकडे बघून… दप्तर सोडलं… 'झाली!' #सशुश्रीके | १५ सेप्टेम्बर २०१४ / दुपारचे ५.०९

रोज… दररोज!

।। श्री ।। जगात घडतच असतं असं काहीना काहीतरी… रोज जगत असतात आपापली जीवं मनात चालू असतात खेळ रोज रोज पडत असतं धावणारं मुल रोज रडत असते वाट पाहाणारी आई रोज राबतो तो आपल्या मुलांसाठी रोज हसत असतो भिकारी बघून झोळी रोज लागत असतं त्या मडक्यात दही रोज संपत असतं पाणी माठातलं रोज वाजते ती घंटा त्या मंदिरात रोज मागतं कोणी सुख कोणी समृद्धी, कोणी ऐश्वर्य, कोणी आयुष्य, रोज कोणासाठीतरी अजून ही रोज खाजवतो पाठ त्या जान्हव्यानी रोज नाही संध्या त्या 'भवती भिक्षांदेही' नंतर, रोज तेच पण वेगळं काय फरक पडतो जेव्ह्हा हा श्वास फूकट कुठायत नियम, रंग ही खोटं बोलतात हल्ली जगात घडतच असतं काही ना काही तरी रोज… दररोज! #सशुश्रीके. | १४ सेप्टेम्बर २०१४ / दुपारचे १.३९

ॐ मित्राय नम:

ll श्री ll १४ सप्टेम्बर २०१४ रात्रीचे १.१० तुम्हाला 'कथा' या चित्रपटातला नसरुद्दीन शाह आठवतो का!? बरं राहिलं ... गोलमाल मधला रामप्रशाद लक्षमणप्रसाद शर्मा... अह्हो तो अमोल पालेकर! हां... तसाच आहे नीलम! डिट्टो... दुनिया मै अगर कोई सीधा है त ो हमारा नीलम नंदकुमार नागराळे! मुळचा बेनाड़ी, निप्पाणी वाला... नंतर कोल्हापूर... पुणे... मुंबई आणि आता सध्या दुबईत असतात साहेब. मी त्याला पहिल्यांदा भेटलो आमच्या फर्स्ट इयरच्या क्लास मध्ये... त्या पाषाण नामक हिरव्या गार परीसरातल्या आमच्या अभिनव *कल्ला* महाविद्यालयात... अतिशय सिंसीयर, डोळ्याला चश्मा, सडपातळ बांधा, डोक्यांवर केसांचा ढीग, असाइग्नमेंट्स वेळेत पूर्ण करणारा, जवळपास १००% हजेरी लावणारा एक आदर्श विद्यार्थी! परले-जी ची असाइनमेंट होती बहुतेक, काय केलेली! वाह... पेशंस म्हणजे काय हे त्याच्या कडून शिकलो... मला एका जागी बसणं म्हणजे काय असतं हे माहीत नव्हतं, हां मात्र बसला की ३-४तास उठायचा नाही... आम्ही पाणी आण, पल्येट धू, मुतायलाच जा वगैरे... पण हा असाइनमेंट मनासारखी झाल्याशिवाय क्वचितच जागेवरून उठलेला दिसायचा. ज़रा

कॉन्फेशन बॉक्स

|| श्री || १३ सप्टेम्बर २०१४ / पहाटे २.३० कॉन्फेशन बॉक्स मध्ये समीर सांगतो... म्हणे... मित्तर आजकाल ठोक्त्यात.. लेका किती लिहितोस, लोकांचा वाचण्याचा वेग... अणि तुझा लिहिण्याचा वेग... ज़रा दमानं घे की! म्या इचार केला.... थांबला तो संपला! जमलं तर वाचा... कधीच काही फुकट जात नाही, हर एक चीज की तकदीर होती है, आपल्या शब्दांच बी असच की, नशीबात किती शब्द ऐकले / सांगितले / वाचले, हिसाब असणार... पर्र जोडाक्षरं लै महत्वाची! त्यी नसली तर अवघड जातं की नाय बग्गा! साथ द्या... मग तो/ती साथ द्येेनार नक्की! नियमच हाय हां... पटलं तर घ्या, नायतर इन्दरधनुस हाय्च... असून नस्ल्यावानी... काय समज्लाव!? शेवटी कोर्ट बर्खास्त.. बस बोम्ब्लत्त ह्या सम्याला सांगुन काय उपयोग नाय! उडतं गाढव न पोहनारं घुबड परवडलं! - सशुश्रीके @३२

केतकरांच्या सम्याचा उद्या वाढदिवस...

ll श्री ll १२ सप्टेंबर २०१४ केतकरांच्या सम्याचा उद्या वाढदिवस... १९८२ ते २०१४ अक्खी ३२त्तिशी मांडून बसीन उद्या... खुप काही पाहिलय.. अनुभवलय... ऐकलय... जमवलय पण खुप कमी लपवलय... हे सांगताना अभिमान वाटतो. माझ्या अश्याच वागण्यानी काही दुरावले... पण त्यांपेक्षा जास्त कमावले हे सांगताना अभिमान वाटतो. मित्र, दुबईतलं घर, एकटी पुण्यात आई, सगळं बैलेंस करायला नेहमीच नाही जमत... पण करायचा प्रयत्न रोज चालू आसतो... हे सांगताना अभिमान वाटतो. लहान आहे लहान आहे... तुला काय गरज आहे, बाबांनी कमावून ठेवले आहे... ऐकून ऐकून स्वत:च्या पायावर आज उभा आहे, हे सांगताना अभिमान वाटतो. गाड्या घोड्यांची प्रचंड आवड... स्केल मोडेल्स जमवताना... खरी गाडी कधी घेइन! असं म्हणता म्हणता हवी ती गाडी दारात आहे... हे सांगताना अभिमान वाटतो. लहानपणा पासूनचे मित्र आणि आत्ताचे मित्र अगदी पहिला बॉस्स.. ते अत्ताचा बॉस्स... सर्वांशी जवळचे संबंध जोडून आहे... (१ अपवाद वगळता) हे सांगताना अभिमान वाटतो. देवाघरचे, देवाजवळचे, देवासारखे... सगळे असतात आजूबाजुला हे सांगताना अभिमान वाटतो समजुद्दार बायको

'स्पून'

नाव - अन्वया | वय - २ नीलम नावाचा मित्र आहे माझा, अन्वया त्याला नीयम काका म्हणते, तो घरी आला कीव्वा त्याच्याकडे आम्ही गेलो की आम्हाला विसरतेच म्हणून सुरश्रीने (नीलम ची अर्धांगिनी) अन्वयाला शिकवलं 'तू कोण आहेस मनी? ( लाडाने मनी ) तू आहेस नीलम काकाची चमची.. कोण आहेस!? चमची!' असं ५वेळा घोकमपट्टी केल्यावर...काही वेळानी तीला विचारलं 'तू नीलमची कोण गं!?' तीच्या डोळ्यासमोर ५किलोचं प्रश्नचिन्ह! परत विचारलं.... २-३ दा विचारल्यानंतर त्या रहस्यमय मुखातून २शब्द आले 'स्पून' #सशुश्रीके

'गोपाला गोपाला'

।। श्री ।। ११ सेप्टेम्बर २०१४ काय रे काय ऐकतोयस मी म्हणालो ये ऐक… कानातला एक इर्फोन काढून मी मंदारला दिला त्याचे डोळे चमकले! गोपाला गोपाला! ( 'हमसे है मुकाबला' वालं ) मी डोळ्यांनी त्याला हो म्हणालो! अक्ख गाणं ऐकलं काही नं बोलता! बस तेव्ह्हा पासून जिगरी वाला… माझं लास्ट इयर तो १ वर्ष जुनियर क्लास मधला, पण त्यांनी १२वी वगैरे केलेलं, मी १०वी नंतर घुस्लेलो! पण ३ वर्षांनी रोज हाय हेल्लो करून ही शेवटच्या वर्षी असे नीट बोललो! ते म्हणतात ना दर आए दुरुस्त आए टाईप्स! दोस्त भाऊ सखा शत्रू अवघड साधा आगाऊ हळवा भगवा अपूर्ण अजून बरच काही अगदी माझा क्लोन! 'की नई' आणि 'की काय' हे आमचं नाव एकमेकांच्या फोन डिरेक्टरीत्ल्! हो हो… बरोबर वाचलयत 'की नई' आणि 'की काय' आम्ही भेटलो की आजूबाजूच्या समंत सभ्य समाजाला वाटायचं की २ वेडे भेटलेत! बाआआआआआआआअर्र्र्र्र! असं जोरात किंचाळत वगैरे! बाल्गन्धर्व, गुड-लक, घाटावर, घरी कुठेही भेटलो तरी असच! बाआआआआआआआअर्र्र्र्र! त्याची सुंदर बुटकी आजी होती, मागच्या वर्षी देह सोडला. माझी ओळख झाल्या पासून मंद्याला ( मंद

अरुण म्हणायचे सगळे...

Image
अरुण म्हणायचे सगळे,  पळण्यात्लं नाव 'श्रीकृष्ण' श्रीकृष्ण केशव केतकर. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षी असताना देवा घरी गेले. तसा जरी मोठा असलो तरी नव्हतोच! अजून ही नाहिये… एका मुलीचा बाप असून ही असं बोलतोय. पण काय आपण खोट्या हुशार्या नाय मारू शकत! बाबा होते एक सेलीब्रीटी, १४ वर्षे बाहेरगावी होते, त्यामुळे दाढी मिशी वगैरे तांबुस, मस्त वळण असलेले केस! बर्यापैकी हाईट, व्यवस्थित झीरो फ्येट शरीर, सरळ तरतरीत नाक, बोरिवलीच्या आमच्या बिल्डिंग मध्ये एन्ट्री मारली की पर्फूमच्या सुगंधांनी मजले बहरायचे! आणि 'अरुण आला वाटतं' अशी कुजबुज सुरू व्हायची! बदाम / पिस्ते / शर्टस / खेळणी आणि बरच काही घेऊन ते सुपर ड्यूपर व्यक्तिमत्व दारात उभं राहिलं की माझे डोळे बंद व्हायचे नावही घ्यायचे नाहीत! १२०च्या स्पीड नी विदाउट ब्रेक्स धडक! वर्षातून १-२दा वाट्याला यायचे! मग नंतर मला ही बोलावलं क़तारला! मे महिन्यात अर्धी सुट्टी गावाला आणि अर्धी दोहा क़तार… फुल ओन कोंट्रास्ट! मला जेवढं ओळखता आलं बाबांना त्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांचा स्वभाव! सरळ मार्गी, कोणाच्याबद्दल कधी व

शनिवारची भजनं

।। श्री ।। ९ सेप्टेम्बर २०१४ दुपारचे १२.५३ शनिवारची भजनं आम्ही रहायचो सांगवीला, शनिवार वाड्यापासून २०किमी असेल दर शनिवारी खळीकरांकडे नित्यनेमानी भजनाला जायचो आम्ही, संध्याकाळी ६ ला निघायचो ७ पर्यंत पोहोचायचो, शनिवार वाड्याच्या उजवीकडे होते त्यांचे घर, ३रा मजल! नो लिफ्ट! मी धडाधाड ३ मिनटात वरती… पण मध्ये आजोबा/आजी मंडळींना सांभाळून, कारण त्यांची संख्या जरा जास्त असायची आम्हा मुलांपेक्षा. छोटसं होतं घर, ७-८+ लोकं जमली की बेडरूम मध्ये एन्ट्री करायला लागायची! खळीकरांना दोन मुलं, एक मुलगा जो भजनं सोडून दूरदर्शन बघणे पसंत करायचा, मुलगी लग्न होऊन सासरी पण कधी कधी असायची भजनाला, काकू हॉल मध्ये बसून ऐकायच्या भजनांना, पायांना त्रास होतो, म्हणून काही मंडळी बाहेरच खुर्चीत बसून आनंद घयायची. 'श्री योगीराज महाराज' आणि 'श्री नग्नभैरव महाराजांची' त्यांना सिद्धी होती, त्यांच्याकडून खळीकर काकांना दृष्टांत व्हायचा आणि ते सर्व भजनं एका डायरीत लिहून ठेवायचे! एवढीच माहिती आहे मला, ३००/४००+ भजनं लिहून घेतली असतील! खळीकर काका पेटीवर, राजेंद्र काका वायोलिन, गानू काका

अभिनव 'कल्ला' महाविद्यालय, पाषाण, पुणे!

।। श्री ।। ७ सेप्टेम्बर २०१४ / दुपारचे २.२७ अभिनव 'कल्ला' महाविद्यालय, पाषाण, पुणे! कला महाविद्यालयाच्या नावाखाली… 'कल्ला' होय 'कल्ला' चालायचा आमचा नाम मात्र शिक्षणा बरोबर! आणि शिक्षकांबरोबर ही! आमचा वर्ग त्यातल्या त्यात लहान… २० मुलं ३-४मुली बाकी सगळे वर्ग म्हणजे ५०+ मुलं, तिथेच आमचा छान वेळ जायचा! कमी मुलं असल्यानी जाम तोटे पण खूप फायदे! सांगीनच तोटे आणि फायदे पुढे! पहिलं वर्ष जरा नवीन असल्यानी बर्यापैकी शांतं गेलं… आदबीनं वागणं वगैरे (नावाला) वेळेत दिलेल्या गोष्टी करणे (नावाला), निट हजेरी लावणे! (नावाला) मग सेकंड ईयर पासून जो काय धुमाकूळ सुरू झाला! सकाळी पायतोड सायकल मारून मी आणि माझा मित्र, सगळे यायच्या आत टीचर रूम मध्ये पंख्याखाली सांडायचो, अगदी थंडीच्या दिवसातही! पब्लीक शेकोटी करत बसायचं आम्ही मात्र घामाघूम अन आम्ही पंख्याखाली! रोज सकाळी येताना १३ जाताना १३ किमी! २६ किमी.चा पीळ! त्याच २६ किमी.चा पीळानी १अर्धा फूट तरी वाढलो असेन मी! सकाळी सगळे जमल्यावर हजेरी लावायची सोडून हातात फळकुटण आणि गोल्गट्टु घेऊन सेना तय्यार, आम्या शन्त्य

रानडे काका

Image
रानडे काका... बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही करणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो ९२नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे. दोन मुलं होती त्याना, अमित दादा त्याची मोठी बहीण... आणि काकू, पेठेत घर होतं, लम्ब्रेटा होती त्यां च्याकडे, छोटसं घर, अगदी दिवसा पण ट्यूब लाईट लावावी लागायची इतका कमी प्रकाश, खरं तर इतकं कधीच गेलो नाही, पण बाबांच्या फोटो काढण्याच्या आवडी मुळे अजुन ही आठवतय घर. एलबम्स चाळत बसलो की मध्येच दिसतात फोटो रानडे परीवाराचे. रानडे काकांचा इलेक्ट्रॉनिक गोष्टी रिपेयर करण्याचा बिसिनेस होता, जोडीला बाकीचे छोटे मोठे उद्योग पण करायचे उदा. संध्याकाळी सैंडविच, बुधानी वेफेर्स वगैरे विकणे. दिसायला टिपिकल कोकणस्थ, शाखेत असतात तशी शरीरयष्टी, टक्कल, पण जेवढे केस होते त्यांची वेणी घालता येइल असे, जाम फन्नी वाटायचे मला, हेलमेट मधे असले की असं वाटायचं की... कल्पना करा ना... मला नाहीच सांगता येते! गळ्यावर रुमाल बांधलेला असायचा... बाबा आणि त

*शाब्दिक कोट्या*

|| श्री || *शाब्दिक कोट्या* कधी कधी कळतात लोकांना पण काहीना..  नाही कळालं की मला कळुन चुकतं की ह्यांना कधी त्या शब्दांचा पुष्पगुच्छ देऊ नए बे दूणे शून्य होतो बे शब्दांची गर्दी होते मग किती ही एकटा असलास तरी... लिफ्ट मध्ये! उणे *ड* मजला आला की ढकलुन द्यावासं वाटत अश्या पब्किकला © सशुश्रीके

आक्षी

आक्षी - भाग १ अह्हो ती नको तेव्हा येणारी किव्वा पाहिजे तेव्वा न येणारी नाही, आमचं गाव आक्षी! सुन्दर मुलीच्या गालावर खळी पड़ते जणू त्याच सारख्या एक भौगोलिक वळणावरच्या रस्त्यावर तो आक्षी चा स्तंभ... त्याच वळणावर ती सुन्दर एसटी (सुंदरच ती... सौन्दर्य मनात असतं बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी असो... ) हां तर मी काय म्हणत होतो.. सुन्दर मुलीच्या गालावर खळ पड़ते जणू त्याच सारख्या एक भौगोलिक वळणावरच्या रस्त्यावर तो आक्षी चा स्तंभ... त्याच वळणावर ती सुन्दर एसटी थांबायची, एसटी थम्ब्ली की पुलंच्या त्या यस्ट्यी सारख्या सर्व घटना पार पाडून झाल्या आणि एकदाचं त्या स्तंभावर ब्यागी ठेवल्या की सुरू व्हायची शर्यंत त्या मे महिन्याच्या सुट्टीच्या अखुड वाटणाऱ्या सुट्टीशी माझी! त्या स्तंभाच्या पुढेच अगदी १०पावलांवर एक रुपया वडा पाव.. कुमठेकर काकांचा... पोटात कितीही ऐवज असला तरी तो वडा पाव खल्ल्याशिवाय माझी गाडी पुढे जायची नाही... गेले कित्त्येक वर्ष ते वडा पाव एक रुपयालाच विकतात म्हणजे दर वर्षी वाडयाचा आकार कमी व्हायचा...मग काय ३वडे आणि १पाव अहो हाय काय न नाय काय...पण काय असायचा तो...