ॐ मित्राय नम:
ll श्री ll
१४ सप्टेम्बर २०१४ रात्रीचे १.१०
तुम्हाला 'कथा' या चित्रपटातला नसरुद्दीन शाह आठवतो का!? बरं राहिलं ... गोलमाल मधला रामप्रशाद लक्षमणप्रसाद शर्मा... अह्हो तो अमोल पालेकर! हां... तसाच आहे नीलम!
डिट्टो... दुनिया मै अगर कोई सीधा है तो हमारा नीलम नंदकुमार नागराळे!
मुळचा बेनाड़ी, निप्पाणी वाला... नंतर कोल्हापूर... पुणे... मुंबई आणि आता सध्या दुबईत असतात साहेब.
मी त्याला पहिल्यांदा भेटलो आमच्या फर्स्ट इयरच्या क्लास मध्ये... त्या पाषाण नामक हिरव्या गार परीसरातल्या आमच्या अभिनव *कल्ला* महाविद्यालयात... अतिशय सिंसीयर, डोळ्याला चश्मा, सडपातळ बांधा, डोक्यांवर केसांचा ढीग, असाइग्नमेंट्स वेळेत पूर्ण करणारा, जवळपास १००% हजेरी लावणारा एक आदर्श विद्यार्थी!
परले-जी ची असाइनमेंट होती बहुतेक, काय केलेली!
वाह... पेशंस म्हणजे काय हे त्याच्या कडून शिकलो...
मला एका जागी बसणं म्हणजे काय असतं हे माहीत नव्हतं,
हां मात्र बसला की ३-४तास उठायचा नाही...
आम्ही पाणी आण, पल्येट धू, मुतायलाच जा वगैरे...
पण हा असाइनमेंट मनासारखी झाल्याशिवाय क्वचितच जागेवरून उठलेला दिसायचा. ज़रा लैच सिंसीअर!!!
मग नीट ओळख झाल्यावर कळाले की माझ्या घरापासून जवळच राहतो, मी सायकलनी यायचो, त्यानी ही सायकल घेतली.. त्याच्या स्वभावाला अणि व्यक्तिमत्वाला कोंट्रास्ट असलेली रेसिंग सायकल घेतली... माझी हर्कुलस एम्टीबी अणि त्याची स्ट्रीट हॉक... रोज १३किमी चा मोठा छोटा उतार चढण युक्त रस्ता कापत आम्ही सकाळी ८वाजता पोहोचायचो कोलेजात, थंडी असो गरमी असो की पावसळा... क्वचीतच आम्ही बसचा प्रवास केला असेल!
नीलमची भाषा हां एक मस्त विषय होता तेव्ह्हा... कर्नाटक बॉर्डर वरचा असल्यानी त्याच्या मराठीला कन्नड़ वळण होते... *होय नव्हे* असलं काहीतरी विचित्र / विरोधाभास असलेलं मराठी.. मी जाम खेचायचो त्याची त्याच्या *होय नव्हे* वरून! तो पण काय बोलणार! आधीच कमी बोलायचा... पण मी त्याला बोल बोल सांगुन बोलायला भाग पाडायाचो... अजुन ही तेच करतो मी... पण आता तो आपल्या पेक्षा ही सुंदर मराठी बोलतो! निवेदन वगैरे अगदी प्रोफ्फेशनली करतात साहेब... उगाच नाही टीचर्स डे च्या वेळी शिक्षक आणि नंतर जीएस झाले नीलम नंदकुमार नागराळे! तिथेच नं थांबता अप्रतीम हस्तलेखन... आणि आता केलीग्राफर असा लौकीक मिळवला आहे!
थर्ड ईयर च्या आधी साहेबांना एक मुलगी आवडायची... नाव नाही सांगत.. पण मुलगी अगदी कोंट्रास्ट..
म्हणजे आमचा नीलम अगदी साधा म्रुदू आणि ती एकदम तीखट, प्रकरण जास्त पुढे नाही गेले, पण अजुनही आठवलं की मजा येते त्याची खेचायला, थर्ड इअर ला मात्र नीलमनी मला माझी प्रियतम्मा पटवायला लैच मदत केली राव! टीचर्स डे च्या दिवशी माझा प्रोजेक्ट 'उत्तम प्रोजेक्ट कशाला म्हणतात त्याचं उदाहरण' म्हणून अक्ख्या वर्गाला दाखवला, जो वर्गाला दाखवला त्यापेक्षा तीला दाखवला असं म्हणायला हरकत नाही, येता जाता... ती आली रे, ती चाल्ली रे वगैरे सूचना द्यायचा! लाखमोलाची मदत हो त्याची... म्हणून परतफेड म्हणून माझ्याच प्रियतमेच्या सखीशी त्याचे रुणानुबंध जुळवण्याचे प्रयत्न केले! आणि जिंकलो! हो हो... नीलमला पोरगी पटली चक्क! कोणाला काय त्याला पण विश्वास बसे ना ह्याचा!
असो... नीलम नंतर कॉलेजचा जीएस भी झाला...प्रचंड प्रामाणिकतेने व्यवहार करणे.. गेदरिंगची जवाबदारी... काही अपयश पण बरच यश घेउन आणि वेळच्या वेळी असाइनमेंट्सचा बोजा सांभाळत नीलमने त्या जीएस नामक पदावीचे सार्थक करून दाखवले!
असो... सुरुवातीला तो मावशीकड़े रहायचा मग आमच्याकडेही राहिला जवळ जवळ वर्षभर, मग भाड्यानी पाषाण मध्ये नंतर पेठेत राहिला, असं करत करत कोलेज संपले, मी सकाळ पेपर्स मध्ये कामाला होतो, मी तो जॉब सोडला तेव्हा त्यानी सकाळ पेपर्स मुंबई ज्वाइन केलं, मग मी मुंबईतला जॉब सोडला दुबईत गेलो...तेव्हा तो मुंबईत आला...आता तब्बल ६वर्षानी मागच्या वर्षी पासून साहेब दुबईत आहेत! मस्त रियल लाइफ 'फॉल्लो' चालले आहे असं म्हणायला हरकत नाही! काही मित्र असतातच असे, झाले की शेवटपर्यंत साथ देणारे, तुमच्या बरोबर असणारे... खुप भांडलो असु... मी तर जाम फालतू कारणांवरून भांडायचो, पण आता ती स्टेज पार कॆल्ये, त्याचे माझे मत जुळत नाही असे क्वचीतच होते, असा दोस्त मिळणं महाकठीण... गम्मत म्हणजे अजुन ही लोकांना एक मोठा नं उलगडणारा प्रश्न पडतो!.. समीर आणि नीलम अश्या दोन भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती मित्र कसे असू शकतात!
त्या महाअवघड प्रश्नाचं हे जरासं लांब लचक पण प्रामाणिक उत्तर
ॐ मित्राय नम:
© सशुश्रीके.

Comments
Post a Comment