असा रेहमान परत होणे नाही...
साधारण १९९२ चा नोव्हेंबर-डिसेंबर असावा
#सशुश्रीके | २७ सप्टेंबर २०१४ / पहाटेचे ३.२९
छान थंडी, पुण्यातली...
मोडेल कॉलोनी मध्ये...
मित्राच्या घरी...
मोठ्या टेरेस वर सगळे जमलेले,
बर्थडे पार्टी...
धमाल मस्ती संगीतखुर्ची केक आवाज मित्र गर्दी
आणि मी हळूच एका कोपऱ्यात ह्या सर्व मोह मायेतुन ज़रा वेगळा...
तो संगीत खुर्चीचा 'चित्त थरारक' कार्यक्रम संपल्यावर गाण्यांकड़े दुर्लक्ष करत मुलं आणि त्यांचे पालक आपआपलं उदरम भरणम करण्यात मग्न होते,
पण मी वेगळा...
त्या छोट्या टेपरेकॉर्डर पाशी,
माझी छोटीशी
हो हो तोच तो दिवस!
दिल है छोटासा... छोटीसी आशा
रोजा जानेमन, भारत हमको...
रुक्मिणी रुक्मिणी... ये हसी वादियाँ...
A साइड संपली की B...
असा माझा कार्यक्रम चालू होता माझा 'साइड बाय साइड'
ती मेग्नासौन्डची कस्सेट.. अजुन ही आठवते!
तेव्ह्हा रहमान कोण वगैरे काही माहीत नव्हतं!
पण जी काय जादू...
जो काय 'साउंड' होता त्या रोजा मध्ये!
स्वर्गीय!!!
पुढे बॉम्बे, हम से है मुकाबला च्या वेळी रेहमानचा रेहमान साहेब झालेला, सुरभी वगैरे मध्ये त्याची मुलाखत वगैरे म्हणजे... जिंकलच हो!
आयुष्यात २ पुस्तकच मनापासून आणि पूर्ण वाचली आहेत..
सचिन आणि रेहमान,
सचिनला पाहून आणि रहमानला ऐकून शाळेत्ले नंतर कॉलेजचे दिवस...
आता अजूनही सचिन संपला पण रेहमान...
नाही तो अखंड असतो कानात,
डोक्यात, ह्रुदयात, नसानसात रेहमान!
त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल मला बोलणं, किव्वा एकणं कधीच आवडलं नाही... तो हिंदू होता मग मुस्लिम धर्मं का स्वीकारला, हाच विषय लोकं खरडून काढतात, मग त्याची एकच शैली आहे... तोच तोच पणा जाणवतो, इस बार मजा नहीं आया, क्या तेरा रेहमान... आजकल नहीं जमता उसको! असं ऐकलं की माझी सटकतेच!
माझा रेहमान हां माझ्या पुरता मर्यादीत आहे!
त्यानी काहीही केलं ते मला मनापासून आवडतं,
मी वेडा आहे म्हणलात तरी चालेल कारण मी आहेच रेहमान वेडा, आणि मी एकटाच नाहीये...
माझे खुप असे मित्र आहेत की त्यांचा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे रेहमान!
मंदार बिडकर आणि मी... मित्र झालो जीवाभावाचे! कारण फ़क्त रेहमान! गाणं होतं 'गोपाला गोपाला'...
तो गोपाला अजुनही तसाच कानात घुमतो!
आमच्या अनमोल भावेनी आपल्या मुलीचं नाव ठेवले अरमान...
आता का ते विचारलात तर मेलोडी खाओ खुद जान जाओ!
माझ्या एका मित्रानं स्वतःचं टोपणनांव अमितचंद्रन् केलं, कारण काय तर रेहमान साउथचा!
आमचा ग्रुप आहे रहमानिया नावाचा...
रेहमानची गाणी ती पण लाइव परफॉर्म करणं म्हणजे... म्हणजे...
नाही हो नाही, नाहीच उपमा देता येत!
महा कठीण पेक्षा ही पुढचं काही असतं असा प्रकार!
असो... साहेबांचा मुळ प्रवास सुरु झाला रेडियो टीव्ही जिंगल्स, मग तमिळ चित्रपट..
नंतर हिंदी आता इंटरनेशनल...
म्हणतात ना संगीताला भाषा नसते! तसच...
तमीळ मधले .०१% शब्द माहीत असले तरी,
सर्व गाणी चाली आणि बारकाव्यासह ह्या मानवी ज्युक्बोक्स मध्ये कैद आहेत माझ्या!
अमुक अमुक गाण्यात ३ऱ्या मिनिटाला हा ठेका ऐक्लास का तू,
किव्वा सुरुवातीला अमुक अमुक जी ट्यून आहे तशीच त्याने अमुक अमुक गाण्यात वापरली आहे,
अश्या अखंड बारकाव्यांची देवाण घेवाण आमच्या रेहमान वेड्या जगात चालू असते!
त्याचा पुढील कार्यक्रम कधी आहे,
त्याचे नवीन चित्रपट कधी येणारे,
त्याच्याकड़े कुठलं नवीन वाद्य आलय...
अश्या विषयांची रेलचेल whtsapp ग्रुप वर अखंड चालू असते!
त्याच्या एफबी आणि ट्विटर पेजच्या अपडेट्स साठी सगळे आतुर असतात!
रेहमान बद्दलचा आदर अजुनच वाढतो जेव्हा त्याच्या शांत आणि मृदु व्यक्तिमात्वाचे किस्से जेव्हा वारंवार ऐकायला मिळतात...
कधीही कुठल्याही वादग्रस्त प्रकरणात त्याचा सहभाग नसतो! तो संगीतानी उत्तर देतो... जसा सचिन बैंटिंग करून द्यायचा!
त्याच्या संगीतानी तो आम्हाला घडवातो सावरतो आनंदीत करतो! दु:खात सुख दाखवतो...
तो देव आहे आमच्यासाठी!
पूर्वी पेक्षा सध्या कॉम्पिटीशन वाढल्ये...
शेवटी हे स्पर्धा जगच!
शंकर एहसान लोय, इलाय्यराजा, अमित त्रिवेदी,
सलीम सुलेमान, जातीन ललित, प्रीतम,
शांतनु मोइत्रा, विशाल शेखर
आणि अजुन काही संगीत दिग्दर्शक जबरदस्त काम करत आलेत...
काही अजुन करतायत,
पण रेहमान आणि इतर हे गणित आहे आपलं!
मला कोणी रेहमानच्या गाण्यांची तारीफ़ करताना ऐकलं की इतका आनंद होतो! की मग त्या माणसाला रेहमानची इतर गाणी कशी अजुन चांगली आहेत, मग ती ऐकवण्यात अणि स्वतः मंत्रमुग्ध होऊन ऐकण्यात जो काही परमानंद मिळतो त्याची स्वर्गाशीच तुलना!
त्याचं सर्वात आवडणारं गाणं विचारलत तर...
त्यासरखा खोल विषय माझासाठी अजुन कुठलाच नाही,
तरी त्यातल्या त्यात on loop वाले काही ट्रैक्स आहेत, उदाहणार्थ...
कभी ना कभी मधलं - तुम हो मेरी निगाहों पे छाए
न्यूयॉर्क नगरम / बोम्बे ट्यून / मौसम एंड इस्केप - स्लम डॉग मिल्लीनिअर / शब्बा शब्बा - दौड़ / मांगता है क्या - रंगीला / स्वदेस / देस की मिटटी - बोस / दो कदम और सही - मिनाक्षी / ये हसी वादिया - रोजा / तू बोले.. - जाने तू या जाने ना / ऐसे ना देखो - रांझणा / रेहना तू... - डेल्ही6
ही लिस्ट वाढतच जाइल... आता थांबतो!
मी थांबलो तरी चालेल...
पण हा माणूस नं थांबो त्याच्याकडून त्याच्या भक्तांना...
अखंड अमृतमयी संगीत-श्रीखंड लाभत राहो!
असा रेहमान परत होणे नाही,
आम्ही परख्ला...
आता तुमची बारी...
रेहमानजी!
तुम्हारी अदाओं पे मै वारी वारी... मै वारी वारी!
तुम्हारी अदाओं पे मै वारी वारी... मै वारी वारी!
Yesssss......zakasss. Jiyo Rahman!
ReplyDelete_/|\_
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete