शनिवारची भजनं
।। श्री ।।
९ सेप्टेम्बर २०१४ दुपारचे १२.५३
शनिवारची भजनं
आम्ही रहायचो सांगवीला,
शनिवार वाड्यापासून २०किमी असेल
दर शनिवारी खळीकरांकडे नित्यनेमानी भजनाला जायचो आम्ही,
संध्याकाळी ६ ला निघायचो ७ पर्यंत पोहोचायचो,
शनिवार वाड्याच्या उजवीकडे होते त्यांचे घर,
३रा मजल! नो लिफ्ट! मी धडाधाड ३ मिनटात वरती…
पण मध्ये आजोबा/आजी मंडळींना सांभाळून,
कारण त्यांची संख्या जरा जास्त असायची आम्हा मुलांपेक्षा.
छोटसं होतं घर, ७-८+ लोकं जमली की बेडरूम मध्ये एन्ट्री करायला लागायची!
खळीकरांना दोन मुलं,
एक मुलगा जो भजनं सोडून दूरदर्शन बघणे पसंत करायचा,
मुलगी लग्न होऊन सासरी पण कधी कधी असायची भजनाला,
काकू हॉल मध्ये बसून ऐकायच्या भजनांना,
पायांना त्रास होतो, म्हणून काही मंडळी बाहेरच खुर्चीत बसून आनंद घयायची.
'श्री योगीराज महाराज' आणि 'श्री नग्नभैरव महाराजांची' त्यांना सिद्धी होती,
त्यांच्याकडून खळीकर काकांना दृष्टांत व्हायचा आणि ते सर्व भजनं एका डायरीत लिहून ठेवायचे!
एवढीच माहिती आहे मला, ३००/४००+ भजनं लिहून घेतली असतील!
खळीकर काका पेटीवर, राजेंद्र काका वायोलिन, गानू काका तबला, मी झांजा
भजनांना सुरुवात व्हायची, सगळे ध्यानस्थ, प्रसन्न वातावण
गोगटे काका… फाटक स्वामी… असे कोणाचीना कोणाची तरी सिद्धी प्राप्त झालेले व्यक्ती!
गोगटेंना गजानन महाराज / फाटक स्वामींना मोरया गोसावी…
काय तल्लीन व्हायचे!
जब तेरा धीरज छुट जाये, मन को कुछ भी सहा नं जाए। तब मन भज ॐ नम: शिवाय!
आणि मग ॐ नम: शिवाय! ॐ नम: शिवाय! ॐ नम: शिवाय! वर ती मंडळी जी काय ट्रांस मध्ये जायची!
अंग हात डोके सर्व अगदी नाणं पडल्यागत व्हायचा खुळा नाद!
मी आणि माझ्या वयाची मुलं जाम हसायचो!
पण ते हसणं माफ व्हायचं ( माफ होत असेल असो… )
पण जाम दैवी अनुभव!
कधी कधी काही कारणास्तव गानू काका / राजेंद्र काका नसायचे,
मग फक्त मी झांजा आणि खळीकर काका पेटीवर,
तबला कुटायला जाम ईच्छा व्हायची!
मुळीच येत नसूनही कधी कधी कूटायचो आणि उगाच वाह वाह मिळवायचो!
माझी आवडती भजनं गायचे ते तेव्हा माझे डोळे मोठ्ठे व्हाय्चे… मस्त स्माईल द्यायचे खळीकर
मेरा भोला साई ॥ बाबा साई ॥
दे दे लगन दिल की ॥ तू मनसे भजले साई ॥ध्रु॥
मनका अंधेरा तेरा ॥ दूर करे साई ॥
जीवनकी आस तेरी ॥ पूरी करे साई ॥
उसकी शरणमे जाना ॥ पार करे साई ॥1॥
श्रध्दा रख दिलसे ॥ तेरा खुश रहे साई ॥
जीवनमे सबुरी रखना ॥ राह देखे साई ॥
तनमन तू झौक दे ॥ चिंता करे साई ॥2॥
करमगती छोड दे उसपे ॥ क्रिपा करे साई ॥
मिलेगा सबसे छुटकारा ॥ साथ रहे साई ॥
लाज तेरी जाने ना देगा ॥ दौडे तेरा साई ॥3॥
हे भजन मला आवडायचं त्यामुळे ती गायचेच दर वेळी
आणि त्यामुळे इतरांना पण आवडायला लागललं,
माझी काही आवडती भजनं म्हणजे…
जगदवंद्य अवधुत दिगंबर ॥ दत्रात्रय गुरु तुम्हींच ना ॥
अनन्य भावे शरणागत मी ॥ भवभय वारण तुम्हींच ना ॥ध्रु॥
______________________________ _____
आई जगदंबे कृपा करा ॥ कुलस्वामिनी कृपा करा ॥
गुणवर्धिनी लोकशोभिणी ॥ मोक्षदायिनी कृपा करा ॥ध्रु॥
______________________________ _____
गुरुबीन कौन बतावे वाट ॥ बडा बिकट यमघाट ॥ध्रु॥
______________________________ _____
सद्गुरु वाचोनी, सापडॆना सोय ॥ धरावे ते पाय, आधी त्यांचे ॥ध्रु॥
______________________________ _____
जब तेरा धीरज छुट जाये ॥
मनको कुछ भी सहा न जाये ॥
तब मन भज ॐ नमः शिवाय----4 वेळा ॥ध्रु॥

कालांतरानी काकुंच्या तब्येतीमुळे म्हणा,
त्यांनी बदललेल्या घरामुळे म्हणा,
भजनं बंद झाली!
पण…
ती अजून ही आहेत…
मनातल्या ज्युकबोक्स मध्यॆ जशी ऐक्ल्येत तशी!
अजून ही आहेत…
ती शनिवारची भजनं!
© सशुश्रीके.

______________________________
आई जगदंबे कृपा करा ॥ कुलस्वामिनी कृपा करा ॥
गुणवर्धिनी लोकशोभिणी ॥ मोक्षदायिनी कृपा करा ॥ध्रु॥
______________________________
गुरुबीन कौन बतावे वाट ॥ बडा बिकट यमघाट ॥ध्रु॥
______________________________
सद्गुरु वाचोनी, सापडॆना सोय ॥ धरावे ते पाय, आधी त्यांचे ॥ध्रु॥
______________________________
जब तेरा धीरज छुट जाये ॥
मनको कुछ भी सहा न जाये ॥
तब मन भज ॐ नमः शिवाय----4 वेळा ॥ध्रु॥
______________________________
जगदवंद्य अवधुत दिगंबर ॥ दत्रात्रय गुरु तुम्हींच ना ॥
अनन्य भावे शरणागत मी ॥ भवभय वारण तुम्हींच ना ॥ध्रु॥
______________________________
कालांतरानी काकुंच्या तब्येतीमुळे म्हणा,
त्यांनी बदललेल्या घरामुळे म्हणा,
भजनं बंद झाली!
पण…
ती अजून ही आहेत…
मनातल्या ज्युकबोक्स मध्यॆ जशी ऐक्ल्येत तशी!
अजून ही आहेत…
ती शनिवारची भजनं!
© सशुश्रीके.
Comments
Post a Comment