आक्षी

आक्षी - भाग १

अह्हो ती नको तेव्हा येणारी किव्वा पाहिजे तेव्वा न येणारी नाही, आमचं गाव आक्षी!

सुन्दर मुलीच्या गालावर खळी पड़ते जणू त्याच सारख्या एक भौगोलिक वळणावरच्या रस्त्यावर तो आक्षी चा स्तंभ... त्याच वळणावर ती सुन्दर एसटी (सुंदरच ती... सौन्दर्य मनात असतं बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी असो... ) हां तर मी काय म्हणत होतो..

सुन्दर मुलीच्या गालावर खळ पड़ते जणू त्याच सारख्या एक भौगोलिक वळणावरच्या रस्त्यावर तो आक्षी चा स्तंभ... त्याच वळणावर ती सुन्दर एसटी थांबायची, एसटी थम्ब्ली की पुलंच्या त्या यस्ट्यी सारख्या सर्व घटना पार पाडून झाल्या आणि एकदाचं त्या स्तंभावर ब्यागी ठेवल्या की सुरू व्हायची शर्यंत त्या मे महिन्याच्या सुट्टीच्या अखुड वाटणाऱ्या सुट्टीशी माझी!


त्या स्तंभाच्या पुढेच अगदी १०पावलांवर एक रुपया वडा पाव.. कुमठेकर काकांचा... पोटात कितीही ऐवज असला तरी तो वडा पाव खल्ल्याशिवाय माझी गाडी पुढे जायची नाही... गेले कित्त्येक वर्ष ते वडा पाव एक रुपयालाच विकतात म्हणजे दर वर्षी वाडयाचा आकार कमी व्हायचा...मग काय ३वडे आणि १पाव अहो हाय काय न नाय काय...पण काय असायचा तो...ब्येस्ट इन धिस वर्ल्ड क्याट्येगरी!
तो फ़स्त करत करत पाय तुडवीत मी पुढे आई मागे... मध्येच १० टाळकी... अरे आप्पांचा नातू ना तू... अरे शुभदाचा पोर ना तू... अणि मी अतीमंद हास्य देऊन आई कड़े बोट दाखवायचो! मध्येच चिंचा उचल, झाडाची फांदीच तोड़, येणा जाणाऱ्या वाहनाना अडथळा कसा होइल त्याची योजना, काय विचारु नका! आता मोठे पाणी उमगतं किती (नको इतकी) मस्ती होती अंगात!

असो...

शोर्टकट होता एक... ३-४लोकांच्या वाडीतुन एक छोटी पायवाट, तशी अगदी छोटी नाही पण रीक्षा जाऊ शकणार नाही इतपत छोटी, मस्त नारळ जाम चिंचा वेगवेगळी फुलं असलेल्या झाडांच्या मैफिलीतुन समोर पक्का रस्ता दिसायचा.. बाजुलाच शाळा, देवीचं देऊळ दिसलं की आता २ मिनिटानी घर..माझा वेग अजुन वाढायचा... "अरे समीर हळु, जरा... (पुढचं बोलण ऐकू येई पर्यन्त मी अजुन पुढे तडमडलेलो असायचो) शेणात पाय काय... हातात काठी काय... रैंडम गोष्टींच्या शर्यतीतुन मी त्या फाटका पाशी यायचो... शर्यत संपली! आजी दिसली!

काय सुन्दर होता तीचा चेहरा! मला नाक आधी दिसतं व्यक्तीचं... असलं छान नाक मी कोणाचच नाही पाहिलं आत्ता पर्यन्त! काम करून करून तीच्या पदराला जो काही घामचा सुगंध यायचा... अहहो काय सांगू! नाही नाही... अत्ता डोळेच भरून आलेत टाइप करताना प्रचंड मिचाकाउन मिचकाउन...टीशर्ट..बोटं..डोळे.. ठीके ऍम रेडी अगेन...

क्रमश:


४ सप्टेम्बर २०१४ वेळ सकाळी ५.५५
__________________ __________________ __________________ __________________

आक्षी - भाग २


शर्यत संपली! आजी दिसली!

काय सुन्दर होता तीचा चेहरा! मला नाक आधी दिसतं व्यक्तीचं... असलं छान नाक मी कोणाचच नाही पाहिलं आत्ता पर्यन्त! काम करून करून तीच्या पदराला जो काही घामचा सुगंध यायचा... अहहो काय सांगू! त्या आनंदापाई पायर्या चुकाय्च्या तिथूनच मेली धडपड सुरू... घरात आल्या आल्या अंगणात जायचो का तर... आंबे किती लागलेत बघायला, त्याची शहानिशा झाली की परत धडपडत पडवीत, बाम्बुच्या काठ्यांचा च्विक च्विक आवाज करणारा दणकट पण म्हातारा झोपाळा दिसला की माझ्या अंगात जो काही शम्मी कपूर यायचा! अखंड भरती... आक्षीत माझ्या मस्तीला कधी ओहोटी आलीच नाही... त्या झोपाळ्या वरूनच आजीला आर्डर... आजी भूक लाग्ल्ये... दडपे पोहे / घावन / जेवण जशी वेळ असे तसे वरपाय्ला मोकळा, आजोबा वाडीत / गोठ्यात / विहीरीपाशी असायचे, कायम २एमएम दाढी, धोतर आणि बाटाची सैंडेक चप्पल, पावसात चालता यावं म्हणून जमीनीवर ५-६इंचाच् अंतर सोडून बेवरिस फर्श्या असायच्या.. त्यातला विषम फर्श्या सोडून मी विहिरेच्या दिशेनी धड्पडाय्चो, थंड, बेडकांनी धुमाकुळ घातलेल्या त्या पाण्यात बादली चा धप्प आवाज आला की काय आनंद मिळायचा की बस!

आप्पा, आप्पा म्हणायचो आम्ही सगळे, भयंकर तापट! मी सोडून सगळे घाबराय्चे आप्पांना! २-३ कोकणस्थी शिव्या असायच्या फोडणीला... त्यांच्या बरोबर चिमीला... चिमी ... आमची म्हस... पुलंच्या म्हस सारखीच... जास्त दूध नं देणारी पण जाम गोड... तीच्या नाकात जीभ गेली की असली मजा यायची बघायला, तीच्या पोटावर काठी लावली की मस्त हलवाय्ची तीची काळी केसाळ चमड़ी! गुदीगुदी!!!

मग हां सगळा प्रकार झाला की.. मित्र! नावं पण लक्षात आहेत अजुन! सूर्यकांत, साकेत वगैरे... मुम्बैत असल्यानी उगाच भाव खात काय पण आट्ट्या मारत खेळ सूरू... जाम, पेरू, आंबे, जाम्भळं, करवंद, आवळे अखंड चरचर... मध्येच रस्त्यात भैया दिसायचा... राजू भैया! आजी आजोबा जाम रागवायचे.. घसा खराब होइल, आई रागवेल! मी कसला ऐकतोय!!! जीभ लाल काळी नीळी... सोल्लीड! काही नतद्रष्ट कोळी पोरं खुप त्रास द्यायची बिचार्याला! उगाच गोळे खात एक्स्ट्रा सरबत वगैरे.. मला खुप राग यायचा त्यांचा! पण काय करू शक्लो नाही कधी, भैया कड़े मतिमंद हास्य विस्फारून पैसे देऊन परत घरी यायचो!

आख्या त्या परिसरात दातारंकडेच दूरदर्शन व्हायचे!
क्रिकेट, चित्रपट, ७च्या बातम्या वगैरे सगळे कार्यक्रम निर्लज्जा सारखे जाऊन बघायचो! त्यात अजुन एक गालबोट म्हणजे सारव्लेले शेण कुडतरत बसायचो!... त्यांना हमखास कळायचं... आज समीर इथे बसला असेल! हाहाहा... आणि अजुन एक, त्यांकडे होता फ्रीज! पाहुणे आले की बर्फा साठी पब्लिक दातारांकड़े! हाहाहा... मजा नुसती! दातार काकू सिनेमास्कोप डोळ्यान्नी हे सर्व सहन करायच्या!

क्रमश:


५ सप्टेम्बर २०१४ वेळ सकाळी १०.५५
__________________ __________________ __________________ __________________

आक्षी - भाग ३

दातारांच्या बरोब्बर समोरची वाडी म्हणजे चिटणिसांची वाडी,
सोल्लिड प्रकार! अंगणात जंगी गाड्या! खुप मोठी वाडी अगदी समुद्रापर्यंत लांब! खुप नाराळांची टापटीप रंगवलेली झाडे, झोपाळे, खेळायला सुन्दर परिसर, साथीला घोड़े, गाई, म्हशी आणि हो हरीण पण होतं! फुल ओन लक्ज़री बंगला, पार्ट्या वगैरे असायच्या कधी कधी.. खेड़ेगावत असलं काही असतं ह्याचं उत्तम उदाहरण! रेशमा नावाची मुलगी होती त्यांना... प्रचंड लाड असायचे तीचे! त्यांच्या इथे काम करणारी मुलं माझे सवंगडी... त्यामुळे मस्त एंट्री असायची मला कार्यक्रमांना!

पण माझा जीव अडकलेला असायचा तो बापट आजोबांकड़े! एकटेच असायचे छोटसं घर होतं... खुप गोष्टी नुसत्या कोंबलेल्या, लहान मुलांची पुस्तकं, रंग रंगोटी ची साधनं, हार्डवेयर, योगसाधना संबंधीत गोष्टी... खाकी आखुड प्यांट, जरासा मळकट फुल्ल बाही बनियान आणि हातात काठी. मी नाही आलो की येता जाता आजी आजोबांशी माझी चौकशी करायचे... जाम लाड करायचे मला नं कळु देता! म्हातारी मंडळी कितीही कंजूस वाटत असली तरी कसले भलतेच प्रेमळ असतात! त्यानी त्यांच्या कडची एक छान इंग्लिश डिक्शनरी... मस्त चित्र असलेली मला देऊ केली होती! दिवासातले ४-४तास मी ते चाळत बसायचो! मग कालांतरानी ते कुठे गायब झाले.. मला आत्ता.. आत्ता जाणवले! माझे आजी आजोबा पण नाहीत त्यांची विचारपूस करायला!

असो

बापट हाउसच्या समोर होतं इंदुमतीचे दुकान, ४-५ रुपये खिशात असले की तिथे धावायचो मी, मुठ भरून लिम्लेटच्या गोळ्या किंवा मेलोडी किंवा कॉफ़ी बाईट्स, पेप्सी कोले. त्यांच्या घराला लागुनच शंकराचं मंदीर होतं.. तिथले चणेफुटाणे फस्त करत करत रस्त्यावर धुंदीत मी समुद्राच्या दिशेने निघायचो, खुप वेळा असला धुंदीत असायचो की समोरचं वाहन बाजूनी जायचं आणि मी रस्त्याच्या मध्ये! जणू मीच एक वाहन... पण गावातले लोकं भी लैच जाम सप्पोरटीव... छान स्माइल देऊन वगैरे टाटा बाय बाय करायची!

समुद्राची वाट संपली की त्या सुरुच्या बनात जाम भीती वाटाय्ची! घनदाट झाडी, भरतीच्या लाटांचा प्रचंड आवाज, उन सावलीचा खेळ, माझ्या फाटक्या चपलांमधुन टोचणारी
वाळु आणि सुकलेल्या सुरुची पानं. तिथेही राजू भैयाची हजेरी असायची, पैसे संपले असले तरी 'बाद मे देता हु' ह्या हुलकावणीवर हमखास एक दोन गोळे सरबतं ढोसाय्चोच. भुट्टावाला पण असायचा कधी कधी.. काय मस्त वास यायचा... मस्त हवा.. पेंटिंग मध्ये लाल रंगाच्या लहान ब्रशनी फराटे मारल्यासारखे ते निखारे! बास बास... कातिल प्रकार असायचा... मुंबई अणि इतर ठिकाणांहुन आलेले विचित्र पब्लिक दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचे गालबोट लावून जायचे... विचित्र पब्लिक का जन्म घेतं हा प्रश्न तेव्हापासून पडतोय मला!

समुद्रावरचा मनसोक्त टाइमपास झाला / ओहोटी वगैरे असली की शंख शिंपल्यांच्या गुप्तधनासह मी घरी यायचो, प्रचंड भूके सकट!

आप्पा बाहेर असले तर आजी कडून पाहिजे ते गीळायला मिळायचं.. पण आप्पा असले की शुभंकरोती आणि भीमरूपी रामरक्षेला शोर्टकट नाही... एकदातर मी 'नाही म्हणणार' असं उत्तर दील्यावर त्यांच्या अंगात बैल गाडीचे बळ आल्यासारखे धावले माझ्या दिशेने! आणि मग मी माकडासारखा आहे तिथून उडी मारून धूम ठोकाय्चो! एकदा हा प्रसंग रस्त्यावर आला... गावच्या पोस्टमनच्या हस्तक्षेपामुळे मी बचावलो!

पण भीमरूपी रामरक्षेला शोर्टकट नाही... हीच मुख्य बातमी! मगच सातच्या ठळक बातम्या! त्याच्या आधीचं 'आमची माती आमची माणसं' मुक्या अवस्थेतच बाद व्हायचं!

क्रमश:


६ सप्टेम्बर २०१४ दुपारचे ३.४२

__________________ __________________ __________________ __________________

आक्षी - भाग ४

खेडेगावच ते!
लाईट हाय काय नाय काय…
नो टायमिंग!
गुरुवारी तर जवळपास अक्खा दिवस 'लाईटी' जायची
रेडीओ वाजता वाजता बंद!
चालू झाला की 'लाईटी' आली!
झोपाळा होताच गरमीची ऐशी तैशी करायला!
नही तर हौद!
आणि भर दुपारी तासोनतास डुम्बाया काय मजा यायची! ते नाही जमलं तर सारवलेल्या अंगणावर लोटाभरून पाणी शींपडून ताणून द्यायचं!
रात्र मात्र 'लाईटी' गेल्यावर भुतं दिसतात आणि ती असतात का नसतात
ह्या प्रश्नाच्या रंगमंचावर माझ्या सावलीसकट मी पावलं ताकयचो!
त्यात मित्र आणि आजी/आजोबा उगाच भीती दाखवणार,
भीती म्हणजे भूतांची वगैरे नव्हे!
दरोडेखोरांची! खरया खरया लुटालुटी म्हणे!
पण 'लाईटी' आली की अपुन शेर ना परत!

दिवळीत तर काय मज्जाच!
उटणं काय! सकाळी सकाळी सनई रडीओ वर बिस्मिल्ला साहेब
कसलं तरी फळ अंघोळीच्या वेळी पायानी चिरडून अंघोळ वगैरे!
कडूलिम्बाचा पाल्याचा लाडू काय! हे सर्व झालं की मस्त आजीच्या हातचे दडपे पोहे... फराळ...मग फटाके...आऐ फुल टू धम्माल!

सुट्टी अर्धी संपायला यायची तशी चेहर्यावर उदासीनता यायची,
कैलेंडर बघून बघून उगाच उदासीनता अजुन उग्र करून आजीच्या कुशीत शीरायाचो, अजुन ही ती मीठी इतकी घट्ट लक्षात आहे...
आयुष्यात असले क्षण परत येत नाहीत याची जाणीव तेव्हा नसते! असो...
जसं जसे परत जायचे दिवस येतात तसेच पुन्हा कधी येणार याचं गणित सुरु...
हो हो ते गणित भारी परफेक्ट जमायचं! काठावर पास होणाऱ्या ह्या जीवाला ते भारीच जमायचं!

बघता बघता सुट्टी संपायला यायची...
१आठवडा..
४दिवस...
उद्या जाणार हे पाहून आजीच्या डोळ्यात माझ्या आधीच पाणी, सकाळी सकाळी तो रिक्शावाला आला की अगदी नको तो सीन जसा आपण फॉरवर्ड करतो तसं तसं करावसं वाटायचं!

मग काय... पुढच्या सुट्टीची स्वप्न रंगवत प्रवास घडायचा!
आक्षी गाव नव्हे एक स्वप्ननगरी होती माझ्यासाठी! एक महिन्यात वर्षभर जगुन यायचो! आता कोणीच नाही तिथे, आजी आजोबा नंतर पडून होतं घर... आता ते पण नाही, उरल्यात आठवणी.

कधी जमलं तर नक्की भेट द्या
आणि हो... लाल डब्यानीच जा!
अलीबाग - नागाव च्या मध्ये आहे...
आक्षी!

#सशुश्रीके

Comments

  1. surekh..dolyasamor kokan ubhe raahile.. sadhya maze blog war post lihine kami zalay pan purvi ek chhota post taakla hota.
    http://yogesh-korde.blogspot.in/2013/03/blog-post_3.html

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...