दही पूरी... नव्या सांगवीत राहायचो तेव्हा सांगवी फाट्यावर ४-५ गाड्या असायच्या...गाड्या म्हणजे, एक चायनीज, २भेळवाले.. वडापाव भजीपाव वगैरे, अश्या गाड्या, पुण्यातुन बसनी आलो की, किंवा संध्याकाळी सायकल वरुन घरी येताना 'अनअव्होईडेबल' अश्या त्या गाड्यांमधल्या त्या भेळवाल्याकडे माझे पाय जाऊन थांबायचे स्टूलापाशी... गम्मत म्हणजे त्या स्टूलावर कधी बसलेल्या भेळवाल्याला मी कधी पाहिलच नाही, बघावं तेव्हा हातात मोठा चमचा, मसाला पूड, पुऱ्या वगैरे वगैरे, अखंड भेळ-पूरी-पुराण चालूच! २ भाऊ होते, राजस्थानी असावेत, एक गायब असला की विचारायचो कुठे गेलाय!? उत्तर असायचं 'गाँव गया है, आजाएगा अगले हफ्ते', दोघांच्या हातात जादू होती...त्या जादूसाठीच गर्दी असायची, एक पाणी पूरी खाल्ली की २री खायच्चच पब्लिक! मला भेळ आवडायची नाही इतकी, कधी भेळ खायची इच्छा झालीच तर मुठभर खारे दाणे टाकायला सांगायचो, पण पूरी रिलेटेड सगळं खायचो, रगडापूरी, शेवपुरी, शेवबटाटादहीपूरी वगैरे... हे सर्व लिहायचा खटाटोप इतक्या साठी की त्याच्याकडे दहीपूरी असली भन्नाट चवीष्ठ ल
Comments
Post a Comment