ती शिंकं…

ती शिंकं…

साधारणपणे १९८९-९० ची गोष्ट
खरे कुटुंबीयांकडे राहायचो मी
बोरिवलीतच…
राहत्या घराजवळून ३ बिल्डींग्सच्या अंतरावर
सकाळी काका अमोल (माझा वर्ग मित्र) त्याचा मोठा भाऊ, खरे काका
सर्वांची घाई आपापल्या कामाला बाहेर पडायची!
माझ्या तोंडात ब्रश… बेसिन जवळ उभा
त्यात पोटात जरा आवाज येऊ लागला
'हुरडा' पडण्याची वेळ झाली होती माझ्या लक्षात आले! /// ओ_ओ असा काही चेहरा झालेला माझा

पण आत आधीच अमोल गेलेला…
मनात म्हणालो… हम्म अजून ५मिनट तरी तग धरावा लागेलच!

आणि तो दुर्दैवी क्षण
… ती शिंकं
काय पाप केलेले काय माहीत
असली भयानक अवस्था विचारू नका!
तोंडात ब्रश…
तो सफेद झाग उडू नये त्या सुंदर परिसरात म्हणून झालेले अतोनात प्रयत्न
आणि त्या प्रयत्नामुळे जो काय प्रसंग जाहला चड्डीत!

बास रे बास!

काही क्षण आयुष्यात का येतात असा तो क्षण आणि…
ती शिंकं!
#सशुश्रीके


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...