ती लाल संध्याकाळ!

।। श्री ।।

२१ सप्टेंबर २०१४

ती लाल संध्याकाळ!


किंगसर्कलची गोष्ट १९८४-८५,
संध्याकाळची वेळ, 
रोजच्या प्रमाणे रेडीओ वर गाणी किव्वा मैच काहीतरी लागलेलं असेल,
आण्णा नित्यनियमाप्रमाणे दाढी कारायला बसलेले,
मस्त दणदणीत शरीर,
फुल बाह्यांचा बनियान,
पाठीवर छोटा टोवेल,
लुंगी
आणि मी बारकुसा… 
हाफ बनियान…
हो बस…
तेवढाच पोशाख!
आणि काय प्रचंड आकर्षण दाढी करताना बघायचं,
समोर बसून अगदी,
जसं काही फस्ट डे फस्ट शो, :P
आण्णांची अर्धवट दाढी होते ना होते...
तितक्यात कोणीतरी आले,
दरवाज्याकडे बघत...
आण्णा ब्लेड आणि दाढीचा ब्रश बाजूला ठेवत उठल,
हाच तो क्षण तीच ती वेळ...
माझे डोळे त्या चकचकीत ब्लेड वर
पुढचा प्रकार 'लाल' होता

मी त्या ब्लेड ला अक्षरश: कागदाच्या बोळ्यावाणी हाताळंत…
नको नको >.<
कल्पानाच नाही करवत!

'किल्ल बिल्ल' नावच्या इंग्लिश चित्रपटासारखा...
ब्लैक एंड व्हाईट इफ्फेक्ट ठेऊन,
माझी आजी मला हा किस्सा सांगताना अजूनही आठवते!

देव करो 'ती लाल संध्याकाळ' कुणाच्या आयुष्यात नं येवो!


- सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...