रोज… दररोज!

।। श्री ।।

जगात घडतच असतं असं काहीना काहीतरी…
रोज जगत असतात आपापली जीवं
मनात चालू असतात खेळ रोज
रोज पडत असतं धावणारं मुल
रोज रडत असते वाट पाहाणारी आई
रोज राबतो तो आपल्या मुलांसाठी
रोज हसत असतो भिकारी बघून झोळी
रोज लागत असतं त्या मडक्यात दही
रोज संपत असतं पाणी माठातलं
रोज वाजते ती घंटा त्या मंदिरात
रोज मागतं कोणी सुख
कोणी समृद्धी,
कोणी ऐश्वर्य,
कोणी आयुष्य,
रोज कोणासाठीतरी
अजून ही
रोज खाजवतो पाठ त्या जान्हव्यानी
रोज नाही संध्या त्या 'भवती भिक्षांदेही' नंतर,
रोज तेच पण वेगळं
काय फरक पडतो जेव्ह्हा हा श्वास फूकट
कुठायत नियम, रंग ही खोटं बोलतात हल्ली
जगात घडतच असतं काही ना काही तरी
रोज…
दररोज!

#सशुश्रीके. |
१४ सेप्टेम्बर २०१४ / दुपारचे १.३९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...