आज जरा जुन्या ओल्या विषयात हात घालतोय!

।। श्री ।।

आज जरा जुन्या ओल्या विषयात हात घालतोय! 


पावसाबद्दल काहीतरी गुगल करत असतना ही जुनी बातमी वाचली  
Heavy rains on Monday threw life out of gear in Mumbai, bringing back memories of July 26, when an unprecedented 911 millimeters of rainfall brought life in the financial capital to a halt.

बापरे… अजून ही आठवण काढली तरी अक्खा दिवस डोळ्यात थैमान घालतो!

शनिवार रविवार हक्काची सुट्टी असून ही सोमवारी Presentation असल्यामुळे आणि मी त्या Presentation चा अविभाज्य link असल्यानी मरत / मारत / मरवत / मारून घेत (काय योग्य वाटेल ते विश्लेषण वाचावे) होतो.
अखंड २ दिवस काम करून असली चीड चीड झाली होती कि विचारू नका! आणि पुण्यात घर असल्यानी मुंबईतून कधी एकदा गुरुवारी बाहेर पडतोय अशी दर गीरुवारची कहाणी! मी बॉस ला सांगितलं! बाबा मी काय आता आज काम करणार नाहीये मी चाललो पुण्याला पर्वा हजर होईन परत. सुदैवानी तो ही 'जा' म्हणाला! मी ताडकनी ब्याग उचलली (वीकेंड ओफ्फिस मध्ये असणार ह्याची खात्री असल्यानी स्वतः बरोबर ब्रश आणि टोवेल वगैरे सगळं होतच)
झोप तर मरणाची येत होती… थोबाडावर पाण्याचा मुक्तछंद आविष्कार करून मी निघालो घाई गडबड - रिक्षा - ट्रेन - दादर वोल्वो… गर्दी नव्हती कारण मुंबईतून सकाळी पुण्यात जाणारी मंडळी कमीच

नवी मुंबई गाठलं पाउस सुरू, लोणावळा लोकांचे फोन रिंगू लागले, चेहरे जरा सीरीअस होत जात होते, पण मी बिंदास होतो… घरी जाण्याचा आनंद आणि कानात ए. आर. रहमानची गाणी, मग कसल काय! नेहमीच्या ठिकाणी उतरलो पुण्यात पाउस नव्हता घरी आलो… आई म्हणाली तू कसा अलास आत्ता! मी म्हणालो बस… न्यूज बघ मुंबईत खूप पाउस… वगैरे…

आणि अक्खा दिवस तेच… तेच नुसता पाउस पाउस १ दिवस गेला २ गेले ३रा मी घरीच! आनंद व्यक्त करू की काळजी… पावसानी थैमान मांडलेले! आठवड्याच्या त्या पावसाच्या बालात्कारानी मुंबई पार 'डूम्बई' झालेली माझे मित्र जे ओफ्फिस मध्ये अडकलेले ते तिथेच, जे घरी पोचलेले ते इतरांच्या मदतीला धावत होते! आणि मी पुण्यात हात्तात कॉफ्फी घेऊन फक्त न्यूज बघू शकत होतो!

त्या शनिवार आणि रविवार च्या एक्ष्ट्रा वर्कलोड मुळे मी जो घरी जायचा निर्णय घेतला त्यानी मला वाचवलं! पण सगळे तेवढे नशीबवान नव्हते.

कधी कधी अती वर्कलोड आला की मी तो दिवस / आठवडा आठवतो आणि मरवून घेण्यापेक्षा हसत खेळत कामाला 'लागतो'

#सशुश्रीके. |
२६/०८/२०१४ संध्याकाळ ७.२४मि.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...