तो रस्ता!


।। श्री ।।

१६ सप्टेंबर २०१४ / संध्या ५.३९

तो रस्ता!
खूप आवडायचा मला…
तो किंग-सर्कल चा चढणीचा रस्ता - स्टेशन ला जाणारा
त्याला रस्ता म्हणतोय कारण बहुतेक स्टेशन्सना पायऱ्या असतात,
कोणी धावत यायच्चं वरून…
वर जाणारे त्या पाईपान्ना धरून चढायचे
सर्व प्रकारचे लोक, म्हातारे कोतारे, लहान सहान
सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार त्या वाटेवर!
किती ही उन असलं तरी काळोख असायचा
चढताना उजवीकडे प्रचंड झाडे झुडपे
डावीकडे स्टेशन ची भिंत
सताठ त्या रस्त्यावर त्या ट्रेन च्या प्रवासाची टीकिटं लोळत पडलेली असायची
त्यांच्या बरोबर कधी कधी भिकारी पण…
रात्री जाम फाटायची… 
बल्ब त्या सुरक्षित जाळीतून अंगावर पडणार आता असं वाटायचं
नंतर जॉब साठी सकाळी ९.०३ ची लोकल पाकडायला मोठी पावलं टाकून जाणे
येताना मात्र थकून भागून अंग घेऊन जायचा तो उतार…

त्या चढणीवर घुसण्या आधी 'किंगसर्कल' असं लिहिलेली इंग्लिश पिवळी कमान
आता नाहीये ती
काढली असं कळालं :(
त्या भयंकर मुंबईच्या पावसात इतके वर्ष तो भोगदा टाईप मारर्ग  तग धरून होता हेच विशेष!
डांबरी वाट होती काळाच्या ओघाने त्यालाही भेगा पडलेल्या
आधीच चढ त्यात डावी उजवी कडून खचलेला
भलताच म्हातारा झालेला माझ्या लहानपणीच
आता काय अवस्था असेल देवास ठाऊक…
I really miss that thing!

काय माहीत कधी जाईन त्या वाटेवर परत? तो रस्ता…
खूप आवडायचा मला


© सशुश्रीके.














Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...