ती निळी दुपार!
'ती निळी दुपार!'
#सशुश्रीके. | दिनांक-०९ सप्टेंबर २०१४.
२-३ वाजले असतील, आई आजी मस्त दुपारच्या निद्रेत…
बोरिवलीच्या त्या श्री गणेश अपार्टमेंट मधील अजून एक उनाड दुपार!
कोणीच नव्हतं खेळायला,प्रचंड बोर मारत होतं.
मला काहितरी उद्योग करायचा होताच
काही करून ती दुपार 'सत्कारणी' (वाट) लावायची होती
त्यातच आईने आणलेली कॅमेल ब्रांडची शाई दृष्टीक्षेपात पडली.
फार पातळ प्रकार जर बाबांनी आणलेल्या पार्कर शाईशी तुलना करायची झाली तर!
असो… मनात एक विचारांचं जंगल निर्माण झाले…
जर दुध आटवले तर बासुंदी होते!
आणि ही भिकार कॅमेलची शाई जर आटवली तर नक्कीच पार्करच्या शाईत रुपांतर व्हावयास काहीच हरकत नाही!
घेतली बाटली टाकली पातेलीत
पेटवली शेगडी
गरम होई पर्यंत अजून काही छोटे नाटे उद्योग चालू होते.
तेवढ्यात कड कड असा आवाज आला
त्या पातेल्यातली शाई गायब होती.
किचनचे सिलिंग जणू 'नीला आसमान सो गया… ' हे गाणं गात होतं.
पार्करच्या शाईच्या ऐवजी कोरडा निळा धूर थैमान घालत होता किचन मध्ये!
माझे निळे डोळे लाल व्हायला लागलेले,
पुढची कथा न लिहिलेलीच बरी… आणि लिहिणार तरी कशी!
'ती' निळी शाई पण संपली!
आयुष्यातली पहिली आणि शेवटची 'ती निळी दुपार!'
#सशुश्रीके. | दिनांक-०९ सप्टेंबर २०१४.
Comments
Post a Comment