दिल-से 'सतरंगी' प्रार्थना

॥ श्री ॥

२९ सप्टेंबर २०१४ / रात्रीचे २.३१


यो!!! गाइस इट्स मा वयफीस बर्थडे टूडे... यो!
.
.
हाहाहा...
तीशी गाठतायत म्याडम!
लै ग्वाड हाय पोग्गी...
अन तीची पोग्गी बी...
म्हणजेच आमची अन्वया हो!
देवाला मागितली एक आणि मिळाल्या दोन,
डबल नशीब काढलय बघा मी!
अमृतानी पण काढलय, मला 'ओके' म्हणून!
असो ही माझी अमृता, आधी गोगटे होती
ते आता जगाच्या नियमानुसार आडनाव बदलतं,
पण अजुनही गोगटेच आहे हो...
.
.
पुण्यात माझ्या घरी अमुक दिवशी जाणारे मग तुझ्या 'आपल्या' घरी अमुक दिवशी जाईन...
असं अगदी सहज पणे बोलून जाते,
मग मी तिच्याकडे असा तिरक्या नजरेनी बघतो!
मग ती लाजायचं बिजायाचं सोडून,
'ते अजूनही माझं घर आहे हं!
असं क्षेपणास्त्र सोडते, आणि मी भंजाळ्तो...
नक्की कुठलं घर!
.
.
एक अजुन आठवलं,
मला बोलायचं काय आहे अणि मी काय बोलतोय,
ह्याचा अचूक नेम बाइसहेबांना असला जमातो...
की आजुबाजुच्या लोकांना चक्कर येते,
की हे संभाषण काय होतं!
साध्यातलं साधं उदाहरण...
म्हणजे... एखाद्या व्यक्तीचं भलतच नाव घेउन
ज्या व्यक्तीचं नावाबद्दल सांगायचय त्याची माहिती देणे,
मग 'ह्या' व्यक्तिबद्दल समीर बोलतोय
हे शांत पणे ज्याला माहिती मी सांगत आहे त्यास सांगणे!
काय समजलात!???
असो आमच्या हीला नक्की समजलं असणार,
ह्या बद्दल शंका नाही.
बरं ही जाम घाबरट..
त्यात मी गाडी चालवत असताना
तीच्या बाजूने तीचे 'मनाचे ब्रेक' चालू असतात,
रामदास स्वामींचे मनाचे श्लोक लिहिले,
अमृताचं भलतच...
आणि तेच मनाचे ब्रेक मी सोडतो,
जेव्हा ती गाडी चलवते!
हाहाहा जाम धम्माल,
हीच लेन का ठेवल्येस,
अशीच का नाही जात्येस वगैरे,
तीला गाडी चलावाण्याचा आनंद मी बाजुला असताना...
केवळ अशक्य!
असो, हे सर्व आत्ताचं सांगतोय...
पण लग्ना आधी आणि साखरपुड्या नं
ती होती पोळ्यांची...
फुलके!
आई म्हणजे एक एक फुल्का फुगा असल्या वानी फुलवायची...
अहो फुगवायची काय! अजुन ही फुगवते... मला काळजी अम्रुताला जमेल का नहीं!
अणि अहॊ काय संगता,
सेम टू सेम!!!
काय फुलके बनवते ही बाई,
अफलातून.
तर एक 'मोठी' चिंता होती ती..
सो त्या एक 'मोठ्या' चिंतेचा मी लवकरच,
'चल हट हवा आने दे' केला होता.
.
.
त्याही आधी अजुन एक चिंता किवा भांडणाचे कारण म्हणजे, यायचीच नाही हो फिरायला...
आता गर्लफ्रेंड हाय म्हणलं तर हिन्डाया फिराया मजा येते नाय का, पण नाही, फेयर इनफ...
आता मी बी पोरीचा बाप आहे,
आत्ता अमृताची बाजू पटते :P
जाम गुणी पोर हो, जामचं!
असं आमचे सासरेबुआ लै वेळा सांगू शकतात!
एक उत्तम लेक म्हणून मी तीचा सत्कार करू ईछितो तीच्या / माझ्या सासू सासऱ्यांच्या उपस्त्थितीत, शाल श्रीखंड आइसक्रीम अश्या चुकलेल्या गणितातल्या अचूक पायऱ्या चढल्या बद्दल मन:पुर्वक आभार!!!
हो.. कळालंय मला की तुम्हाला नसेलच कळालं...पण आमच्या हीला नक्की कळालय अशी आशा करून मी आपले २ शब्द इथेच जवळपास संपवतो...
.
.
हे अमृता तुला ह्या जगातले सर्व ब्रेक्स मिळोत,
तुला सहनशक्तीची लौटरी लागो,
तुला समजूद्दारिचे पास्त्ते आणि पिझ्झे मिळोत...
आणि हो लेटेस्ट आणि महत्वाचे!
तुझ्या हाताची जादू तुझ्या कलाक्रुतींमधून लोकांपर्यंत पोहोचो अशी दिल-से 'सतरंगी' प्रार्थना!
.
.
लव यू बेबस... हैप्पी वाला बर्थडे एंड सीया एवरीडे! <3




- साशुश्रीके 





Comments

  1. अमृताच्या पाककलाकृतीचे प्रमुख पाहुणे श्री.फुलक्यांना योग्य भाव देत आज ikea भेट देऊन एका सुंदर Dining tableचे नियोजन करण्यात आले आहे
    वाढ दिवसाच्या टेबलभर शुभेच्छा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!