अचानक

||श्री ||

२२ सप्टेंबर २०१४ सकाळचे ७.५८

अचानक, गरम पाणी आठवलं.. चुलीवरचं! काय मस्त सकाळची थंडी... सरपण गोळा करून, खटपट... काडेपेटी... पडवीतल्या रॉकेल दीवा ज़रा शिम्पडून... चुल तैयार... ते काळपट्ट भांड... जाने कितने बार गरम होके ठण्ड से बचाया होगा उसने! जे मिळेल ते कापड हातात घेउन... पायांचा कौन्स करून... ऐच्छिक पायर्या ओलांडून... विहीर गाठायची... तिकडच्या त्या बुरशी आलेल्या धक्कादायक पृष्टभागाशी कुस्ती करत... साबणाचा वेध घेत, चुलीच्या विझलेल्या धूराचा आविष्कार सूंघत... धब्बाकदिशी आवाज तो बाद्लीचा विहीरीत... तो दंड १-२-१-२ बादली खेचत... अर्ध पाणी परत विहिरीत... अर्ध गरम पाण्यात विलीन... तो पहिला तांब्या... तो झाग, मध्येच कानात रेडियो च्या जाहिराती... तोंडात अथर्वशीर्श... १००%ओला....

आता फ़क्त अथर्वशीर्ष हाच एक 'कोमन फ्याक्टर' सोडला तर बाकीची अंघोळ कोरडीच!

- सशुश्रीके

 

Comments

  1. From Yashodhan Abhyankar - तुझ्या “चुलीमुळे” जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आजी चुलीवर कासंडीत अंघोळीच पाणी गरम करायची. थंडीत पहाटे त्या चुलीशेजारी बसायला मस्त मजा यायची. मी त्या चुलीत कांदे भाजायचो. भाजलेल्या कांद्याची ती खरपूस आणि गोड चव कधीच नाही विसरणार. आता barbeque करताना, मी न चुकता त्यात कांदा भाजतो. काही क्षणापुरते का होईना, ते दिवस जगतो.
    आजीची जागा बाबांनी घेतली. चूलीची जागा पितळ्याच्या बंबांनी घेतली. चूल असो वा बंब, त्या पाण्याचा पहिला तांब्या अंगावर घेताना येणारा मस्त धुरकट वास परत कधीच नाही मिळाला. Water Heater आणि shower च्या जगात तो smoked flavour हरवून गेला. कधीतरी परत त्या पहिल्या तांब्यातल्या पाण्याचा धुरकट वास घ्यायचाय आणि अंघोळीच्या शेवटी, बादलीत उरलेल पाणी ‘जय गंगे भातीरथी’ म्हणत अंगावर घ्यायचय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!