अभिनव 'कल्ला' महाविद्यालय, पाषाण, पुणे!

।। श्री ।।

७ सेप्टेम्बर २०१४ / दुपारचे २.२७

अभिनव 'कल्ला' महाविद्यालय, पाषाण, पुणे!

कला महाविद्यालयाच्या नावाखाली… 'कल्ला' होय 'कल्ला' चालायचा आमचा नाम मात्र शिक्षणा बरोबर! आणि शिक्षकांबरोबर ही!

आमचा वर्ग त्यातल्या त्यात लहान…
२० मुलं ३-४मुली बाकी सगळे वर्ग म्हणजे ५०+ मुलं, तिथेच आमचा छान वेळ जायचा! कमी मुलं असल्यानी जाम तोटे पण खूप फायदे! सांगीनच तोटे आणि फायदे पुढे!

पहिलं वर्ष जरा नवीन असल्यानी बर्यापैकी शांतं गेलं…
आदबीनं वागणं वगैरे (नावाला)
वेळेत दिलेल्या गोष्टी करणे (नावाला),
निट हजेरी लावणे! (नावाला)

मग सेकंड ईयर पासून जो काय धुमाकूळ सुरू झाला!
सकाळी पायतोड सायकल मारून मी आणि माझा मित्र,
सगळे यायच्या आत टीचर रूम मध्ये पंख्याखाली सांडायचो,
अगदी थंडीच्या दिवसातही! पब्लीक शेकोटी करत बसायचं
आम्ही मात्र घामाघूम अन आम्ही पंख्याखाली!
रोज सकाळी येताना १३ जाताना १३ किमी! २६ किमी.चा पीळ!
त्याच २६ किमी.चा पीळानी १अर्धा फूट तरी वाढलो असेन मी!

सकाळी सगळे जमल्यावर हजेरी लावायची सोडून हातात फळकुटण आणि गोल्गट्टु घेऊन सेना तय्यार,
आम्या शन्त्या आतल्या पऱ्या आमल्या एक एक करून रणांगणात एक से एक वीर यायला वेळ लागायचा नाही, नीट क्षेत्ररक्षण न झालेल्यास आई बाप कसे जवाबदार असल्याची पदोपदी जाणीव करून देणारे रापचिक शाब्दीक फटके!
त्यात मुली अधे मध्ये सापशिडी च्या सापांवानी तडमडत असायच्या!
प्यालेटच काय धुवायला जा, पाणीच आणायला जा…
कालिजात कोणी कामं करायला येतं व्हय! असा चेहर्यावरती आव आणून डाव रचायचो, भलतेच किडे!
त्यात मित्राची सायकलच झाडावर काय लपव, स्जेकोटी साठी स्तुलांची आहुती काय दे!
कालीजाची ट्येबलंच काय प्यालेट म्हणून वापर, शिक्षकांना त्याच्या जन्मदात्यानीच काय हाक मार!
उच्च दर्ज्याची पापं ही!

सगळे धंदे करून भूक लागली की आमचा बंटी क्यांटीन वाला आठवायचा,
मस्त तळकट हिरेवी मिरची मिठात शृंगारलेली वडा पाव न चहा, चरचारीत प्रकरण!
पोहे, साबुदाणा खिचडी नुसता राडा… (उधारीचा)

सब्मीशनची तारीख असली की गरीब चेहरा करत शिक्षकांच्या समोर सोल्लिड एक्सक्यूजेसची पानं मांडून सट्टा चालू!
मग ज्यांचं सब्मीशन रेडी असेल त्याचा हात उसनी घेऊन गदागदा हलवायचा… आणि चित्र पाडायची चकली सारखी!
ती पण एका रात्रीत!

मुलीतर काय दोन टोकं!
एक तर जाम साधी नाहीतर लैच फटकळ, उगाच मुलींच्या जन्माला आल्या गत!
मी तर फाट्यावर लावायचो प्रत्येक मुलीच्या नावाचं बारसं… विभावरीला हगावारीच काय, न रुही ला ढुई काय!
एकदा तर स्मिता नामक जगदंबेनी सोलीड टफ दिली, अंगावरच धाऊन आली!

आम्हा मित्रांनी (माझ्यासकट) अख्या एका ज्युनिअर वर्गालाच सासुरवाडीचा दर्जा देऊ केलेला,
आणि सुदैवानी कालीजानंतरही सासुरवाडीचा दर्जा बाधीत झाला नाही! ( काही अपवाद वागळता... चालायचंच हो! )
एकूणच ह्या कालिजानी आमच्या आयुष्याला वाट 'दाखवलेली' होती!

To be continued...

- © सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!