अरुण म्हणायचे सगळे...

अरुण म्हणायचे सगळे, 
पळण्यात्लं नाव 'श्रीकृष्ण'
श्रीकृष्ण केशव केतकर.

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षी असताना देवा घरी गेले.
तसा जरी मोठा असलो तरी नव्हतोच! अजून ही नाहिये…
एका मुलीचा बाप असून ही असं बोलतोय.
पण काय आपण खोट्या हुशार्या नाय मारू शकत!

बाबा होते एक सेलीब्रीटी, १४ वर्षे बाहेरगावी होते,
त्यामुळे दाढी मिशी वगैरे तांबुस, मस्त वळण असलेले केस!
बर्यापैकी हाईट, व्यवस्थित झीरो फ्येट शरीर, सरळ तरतरीत नाक,
बोरिवलीच्या आमच्या बिल्डिंग मध्ये एन्ट्री मारली
की पर्फूमच्या सुगंधांनी मजले बहरायचे!
आणि 'अरुण आला वाटतं' अशी कुजबुज सुरू व्हायची!
बदाम / पिस्ते / शर्टस / खेळणी आणि बरच काही घेऊन
ते सुपर ड्यूपर व्यक्तिमत्व दारात उभं राहिलं की
माझे डोळे बंद व्हायचे नावही घ्यायचे नाहीत!
१२०च्या स्पीड नी विदाउट ब्रेक्स धडक!
वर्षातून १-२दा वाट्याला यायचे!
मग नंतर मला ही बोलावलं क़तारला!
मे महिन्यात अर्धी सुट्टी गावाला आणि अर्धी दोहा क़तार…
फुल ओन कोंट्रास्ट!

मला जेवढं ओळखता आलं बाबांना त्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांचा स्वभाव!
सरळ मार्गी, कोणाच्याबद्दल कधी वाईट बोलायचे नाहीत आणि चिंतायचे तर मुळीच नाहीत,
अगदी नो एन्ट्री मधून गेले पोलिसांनी पकडलं तरी घूस वगैरे न देता पावती द्या दंड द्यायला तयार,
प्रचंड मैत्री जपणारे…
चहावाला असो, पंकचर वाला असो किव्वा कोणी मोठा बिजिनेसमन…
सगळ्यांशी समान, सर्व नातेवाइकांकडे आवर्जून जाणे, म्हातार्या लोकांसाठी आदर.
मला कधीच असं बाबांनी का केलं असेल असा प्रश्न पडलाच नाही!

चहा बाबांचा वीक पोइन्ट होता… रात्रीच्या ३वाजताही त्यांना तो चालायचा,
कोणाच्या घरी गेले कि स्वताहुन सांगायचे नाही मिळाला तर,
आणि ज्यांना माहित होता ते काही न विचारता आधी चहा करायला लागायचे!

गाड्यांचे जाम वेड… बाबांचे मित्र म्हणत... 'अरुण काय हुबेहूब चित्र काढायचा गाड्यांची'
१४वर्षात ७-८ गाड्या टोयोटा, डेट्सन, निस्सान, होंडा,
कंपनी च्या मोठ्या गाड्या!
जाम मजा यायची त्यांच्या बाजूला बसून वाळवंट बघायला!
खूप स्कॅल मोडेल्स पण घेऊन द्यायचे मला! एकूणच जाम लाड ह्या बाबतीत!
एके दिवशी मी जरा जास्तच गाडी गाडी करत होतो म्हणून सर्व गाड्या माळ्यावर ठेऊन दिल्या आईने!
तर मी छोटीशी पिन घेऊन त्यात शर्र्टचं बटण घुसवून खेळायला लागलो…
हा प्रकार बघून बाबांना दया आली आणि लगेच अख्खा गाड्यांचा खजाना आणून ठेवला माझ्या समोर.

भक्ती पण तेवढीच… देव धर्म, रोज सोहळं घालून पूजा,
क़तार मध्ये असताना तिथल्या धर्माचा आदर म्हणून नमाज पण करायचे,
सर्व मित्र होते, पाकिस्तानी, ब्रिटीश, अमेरिकन, फ्रेंच सर्वांशी अगदी उत्तम मैत्री
खूप फोटो आहेत त्यांचे, सुरुवातीला अल्जेरिया तिथून फ्रांस मग क़तार…
९२ साली बाबा कायमचे भारतात परतले, आम्ही बोरीवली सोडलं
कारण बाबांना 'पोलिसीस्टिक कीडणीस' नामक आजार डीटेक्ट झालेला,
म्हणून धकाधकीच्या जीवनातून शांततेसाठी 'पुणे' गाठले!

पुण्यात आल्यावर लुना मग स्कूटर, मला स्प्लेन्डर घेऊन दिली,
२००१ कीडनी फैल्युर नंतर डायेलीसीस, उपचार सुरु…
स्वत:ला एकटं डायेलीसीसला जाता यावं म्हणून ओम्नी पण घेतली
ह्या सर्व गदारोळात माझ्या चुलत आजीचा ९०वा वाढदिवसही साजरा केला आमच्या घरी.
आठवड्यातून २दा डायेलीसीसला जाणे, आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
माझं शेवटचं वर्ष कोलेजचं
बेस्ट वर्कचं अवार्ड घेऊन घरी आलो
बाबांना धावत धावत सांगायला बेडरूम पर्यंत गेलो
थकले होते, म्हणाले उद्या बोलू…
ती शेवटची भेट.

अरुण म्हणायचे सगळे, पळण्यात्लं नाव 'श्रीकृष्ण'
श्रीयुत चे कै. श्रीकृष्ण केशव केतकर झालेले.

अजून ही अरुणच म्हणतात सगळे. 





#सशुश्रीके
| १० सेप्टेम्बर २०१४

Comments

  1. टचकन पाणी आणलंस रे..

    ReplyDelete
  2. आज कळलं तू असा का घडलास! 😊

    ReplyDelete
  3. बाबांविषयीचा हळवेपणा प्रत्येक ओळीत जाणवतोय ..बाबा असतोच असं ..हृदयात वसतो , धमण्यांतून वहात असतो अजूनही ! गेला नसतो कुठेच .. असतो आपल्यातच !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!