युती उपटली... मातीचा भूगा

।। श्री ।।

युती उपटली... मातीचा भूगा,
आता महाराष्ट्रात राजनैतिक फुगा,
मोठा अजुन मोठा,
फुटणार मडकी फुटणार टाळकी,
रोज रोज ऐकणार आता माझी सटकली,
मुतणार काही, काही सोडणार
कमनशीबी शेवटी शेतकरी ठरणार,
मातीतुन आलात मातीतच जाल,
भवानीचा महिमा... शिवाजीची ढाल...
त्यांचं पुण्य... तुमचा शिमगा,
शेवटी मातीचा भूगा!

- सशुश्रीके | २५ सप्टेंबर २०१४ / सकाळचे ११

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!