रानडे काका

रानडे काका...

बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही करणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो ९२नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे.

दोन मुलं होती त्याना, अमित दादा त्याची मोठी बहीण... आणि काकू, पेठेत घर होतं, लम्ब्रेटा होती त्यांच्याकडे, छोटसं घर, अगदी दिवसा पण ट्यूब लाईट लावावी लागायची इतका कमी प्रकाश, खरं तर इतकं कधीच गेलो नाही, पण बाबांच्या फोटो काढण्याच्या आवडी मुळे अजुन ही आठवतय घर. एलबम्स चाळत बसलो की मध्येच दिसतात फोटो रानडे परीवाराचे.

रानडे काकांचा इलेक्ट्रॉनिक गोष्टी रिपेयर करण्याचा बिसिनेस होता, जोडीला बाकीचे छोटे मोठे उद्योग पण करायचे उदा. संध्याकाळी सैंडविच, बुधानी वेफेर्स वगैरे विकणे.

दिसायला टिपिकल कोकणस्थ, शाखेत असतात तशी शरीरयष्टी, टक्कल, पण जेवढे केस होते त्यांची वेणी घालता येइल असे, जाम फन्नी वाटायचे मला, हेलमेट मधे असले की असं वाटायचं की... कल्पना करा ना... मला नाहीच सांगता येते! गळ्यावर रुमाल बांधलेला असायचा... बाबा आणि त्यांची मस्त जमायची, दोघांना चहाची आवड, आणि नॉन स्टॉप जुन्या गप्पा ठोकत बसायचे!

साल ९९ नंतर मात्र बाबांच्या आजारपणा मुळे ज़रा भेटी गाठी मंदावल्या, एकदा दोनदा होस्पितलमध्ये पण आले होते... 'काय रे समीर... कसे आहेत बाबा, हे घे... ' असं म्हणुन हातात जणू काही सुदामा पोहे देतोय श्रीकृष्णा साठी असं काही तरी पिशवीेतुन द्यायचे आणि आईशी गप्पा मारून टाटा बाय बाय... पण अखंड प्रसन्न मुद्रा. 'काय हो चालायचंच..' असा त्यांचा ठेका होता आयुष्यात.

नंतर कळालं काकू गेल्या, मुलगी लग्न होउन दुसऱ्या घरी आणि मुलाचं लग्न होऊन मुलगा पण... अगदी हिंदी / मराठी रडक्या चित्रपटासारखं!

रानाडे काका...  आता मला माहीत नाहीत ते कुठे आहेत, आणि खरं सांगू का, इच्छा ही नाही! मला नाही बघवणार त्यांचे हाल, माझ्याबद्दल तुम्हाला कसं वाटत असेल i dont care... पण असे 'रानाडे काका' माझ्या आठवणीत 'न'असलेलेच बरे!

#सशुश्रीके. । 
६ सप्टेम्बर २०१४ रात्रीचे ११.२७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!