'स्पून'

नाव - अन्वया | वय - २

नीलम नावाचा मित्र आहे माझा,
अन्वया त्याला नीयम काका म्हणते,
तो घरी आला कीव्वा त्याच्याकडे आम्ही गेलो की आम्हाला विसरतेच
म्हणून सुरश्रीने (नीलम ची अर्धांगिनी) अन्वयाला शिकवलं
'तू कोण आहेस मनी? ( लाडाने मनी ) तू आहेस नीलम काकाची चमची.. कोण आहेस!? चमची!'
असं ५वेळा घोकमपट्टी केल्यावर...काही वेळानी तीला विचारलं
'तू नीलमची कोण गं!?'

तीच्या डोळ्यासमोर ५किलोचं प्रश्नचिन्ह!
परत विचारलं.... २-३ दा विचारल्यानंतर
त्या रहस्यमय मुखातून २शब्द आले
'स्पून'

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!