त्या दिवशी नीळा स्वेटर घालणारा मी…

।। श्री ।।

१७-१८ सप्टेंबर २०१४

त्या दिवशी नीळा स्वेटर घालणारा मी…
.
.
२ ओक्टोबर… १ दशकापुर्वीची गोष्ट,
अक्ख्या भारतात गांधी जयंती म्हणून सरकारी सुट्टी...
त्याच सुट्टीच्या निमित्ताने मी आणि 'ती' भेटलो आउटडोर स्केचिंग साठी...
पुणे यूनिव्हर्सीटी…
सैगमध्ये ग्रीटींग,
मनात भीती,
हातात स्केच बुक…  तीच्या पण…
आणि तिच्या बाजूला मी, ३ फूट लांब,
तेव्ह्हा काय जास्त डेरिंग नाही केलं…
मग युनीव्हरसिटी केंटीन बाहेर वडापाव खाता खाता म्हणालो
'मला तुला काही तरी सांगायच'
ती म्हणाली 'चल एक रोउंड मारू युनीव्हरसिटी मध्ये',
तेव्हा मी गाडी तिला चालवायला सांगितली
…कारण २ गोष्टी एकत्र नव्हत्या करायच्या मला!
अन मारला हातोडा 'खूप आवडतेस मला तू'
ती म्हणाली 'ओके' हातोड्याचा आवाजच आला नाही!
नंतर घरी आल्यावर मित्रानी विचारलं 'ओके' म्हणजे काय 'हो' की 'नाही'?
मग मी फोने केला… तेव्हा कळालं ओके म्हणजे 'हो!'
हळूच का होइना हतोडा मारला मी!
.
.
त्याचाही आधी…
'सागर किनारे' पासून 'पेहला नशा' ची कैस्सेट बनवणारा मी...
.
.
त्याचाही आधी…
अस्सैनमेन्ट्स बरोबर तीच्यासाठी ग्रीटिंग्स बनवायचा सपाटा लावणारा मी..
.
.
त्याचाही आधी…
आयुष्यात पहिल्यांदाच डोळ्यात डोळे घालून तीरंदाजी करून लक्ष्य साधायचा प्रयत्न केरणारा मी...
.
.
त्याचाही आधी…
तीला पार्किंग मध्ये येताना पाहण्यासाठी वेळेच्या आधीच कॉलेजला यायचा दिनक्रम रचणारा मी...
.
.
त्याचाही आधी…
तीची झलक बघायला तीच्या क्लास च्या आजुबाजुला उगीच काहीतरी शोधणारा मी...
.
.
त्याचाही आधी...
आमच्या कॉलेजच्या गणपतीच्या आरतीच्या वेळी लांबुन चालत येणारी ती... काळी साडी... अजुन ही आठवत्ये
( अत्ता लिहिताना लक्षात आलं... गणपतीची आरती आणि काळी साडी! असो...  ) ४-५ मैत्रिणींबरोबर येत होती...
फुल ओन फीदा होणारा मी...
.
.
त्याचाही आधी...
बोलता बोलता मित्राच्या तोंडातून (तीचा चुलत भौ) 'ती' आमच्या कॉलेज ला एडमिशन घेत्ये असं कळाल्या वर मनात गार्डन सजवणारा मी...
.
.
त्याचाही आधी...
म्हणे तीने मला पाहिलेलं!!
.
.
कुठे!??
.
.
'ती'ने एका एक्स्हिबीशनला म्हणे माझा फोटो पाहिलेला...
वंदना फडके नामक सीनियर स्टूडेंटचा पोर्ट्रेट हा विषय आणि मॉडेल होतो...
मी
.
.
त्याच्या आधी…
मी... मीच होतो पण स'मी'र मधला 'मी' ओळखला 'ती'ने :)
.
.
तीच आज माझी मिस्सेज, एक माय, एक सुन...
पण अजुनही माझी पहिली आणि एकमेव गर्लफ्रेंड! :)
या १० वर्षात काही रुसवे फुगवे, पण खूप आनंदाचे धागेदोरे गोळा करत,
अजून ही प्रेमाचा स्वेटर विणतोय दोघे मिळून!
आमच्या सुंदर कन्यारत्नासाठी,
माझ्या आईसाठी,
तिच्या आई वाडलांसाठी,
मित्रपरीवारासाठी.
इथे मी नाही आम्ही :)
.
.
हे सगळं आज का लिहिलं मी?
काहीच कारण नाही असं कसं!?
रोज लिहू शकतो…
.
.
आजून ही जपून ठेवलाय त्या दिवशीचा तो नीळा स्वेटर मी… :)

© सशुश्रीके.

Comments

  1. वा!! मस्त लिहिले आहे!!👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!