केतकरांच्या सम्याचा उद्या वाढदिवस...

ll श्री ll

१२ सप्टेंबर २०१४

केतकरांच्या सम्याचा उद्या वाढदिवस...

१९८२ ते २०१४
अक्खी ३२त्तिशी मांडून बसीन उद्या...

खुप काही पाहिलय.. अनुभवलय... ऐकलय... जमवलय
पण खुप कमी लपवलय...
हे सांगताना अभिमान वाटतो.

माझ्या अश्याच वागण्यानी काही दुरावले...
पण त्यांपेक्षा जास्त कमावले
हे सांगताना अभिमान वाटतो.

मित्र, दुबईतलं घर, एकटी पुण्यात आई,
सगळं बैलेंस करायला नेहमीच नाही जमत...
पण करायचा प्रयत्न रोज चालू आसतो...
हे सांगताना अभिमान वाटतो.

लहान आहे लहान आहे...
तुला काय गरज आहे, बाबांनी कमावून ठेवले आहे...
ऐकून ऐकून स्वत:च्या पायावर आज उभा आहे,
हे सांगताना अभिमान वाटतो.

गाड्या घोड्यांची प्रचंड आवड...
स्केल मोडेल्स जमवताना... खरी गाडी कधी घेइन!
असं म्हणता म्हणता हवी ती गाडी दारात आहे...
हे सांगताना अभिमान वाटतो.

लहानपणा पासूनचे मित्र आणि आत्ताचे मित्र
अगदी पहिला बॉस्स.. ते अत्ताचा बॉस्स...
सर्वांशी जवळचे संबंध जोडून आहे... (१ अपवाद वगळता)
हे सांगताना अभिमान वाटतो.

देवाघरचे, देवाजवळचे, देवासारखे...
सगळे असतात आजूबाजुला
हे सांगताना अभिमान वाटतो

समजुद्दार बायको, ग्वाड पोरगी,
प्रतीभावंत सहकारी...
जिवापाड मैत्री असलेली हृदयं,
अशी धनसंपत्ती असलेला 'श्रीमंत' समीर उद्या ३२त्तिशीत
हे सांगताना अभिमान वाटतो.

'वाढदिवस' म्हणजे आता कमी दिवस
पण प्रत्येक दिवस 'वाढिव' करून सोडणार बघा!
हे सांगताना अभिमान वाटतो.

केतकरांच्या सम्याचा उद्या वाढदिवस...
हे सांगताना अभिमान वाटतो.

- सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!